Jump to ratings and reviews
Rate this book

वाचत सुटलो त्याची गोष्ट [Vachat Sutalo Tyachi Goshta]

Rate this book
वाचत सुटलो त्याची गोष्ट - एका लेखकाच्या ग्रंथवेडाची सफर

245 pages, Paperback

First published April 23, 2017

Loading...
Loading...

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
8 (28%)
4 stars
9 (32%)
3 stars
10 (35%)
2 stars
1 (3%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 7 of 7 reviews
11 reviews
December 28, 2023
माझं कमी होणारं वाचन हे पुस्तक वाचल्यानंतर वाढलं .
हे पुस्तक वाचताना एक गोष्ट वारंवार जाणवत राहिली,

आजची आपली इंटरनेटच्या जगातील पिढी खुप सुदैवी आणि दुर्दैवी आहे .

आपल्याला पाहिजे ती पुस्तके एका क्लिकवर मोबाईलवर घरबसल्या वाचायला मिळतात . पुस्तके शोधण्यासाठी पुर्वीसारखं भटकावं लागत नाही . अगदी जुनी पुस्तके सुद्धा आपल्याला भेटू शकतात . लेखकाचे पुस्तक मिळवण्यासाठीचे प्रयत्न वाचल्यानंतर वाटतं खरंच आपण किती सुदैवी आहोत . कोणतंही पुस्तक आज आपल्याला घरबसल्या मिळू शकतं . दुर्दैवी यासाठी की एवढी पुस्तके उपलब्ध होत असुनही वाचणारे वाढण्याऐवजी कमीच होत आहेत . लक्ष वेधून घेणाऱ्या इतक्या गोष्टी आजच्या जगात आहेत की शब्दांची किमया आज काहीजणांवर चालतच नाही .

मला वाटायचं मी बरीछ पुस्तकं वाचतो . मी चांगला वाचक आहे पण हे पुस्तक वाचल्यानंतर माझा भ्रमाचा भोपळा चांगलाच फुटला . त्याना पुस्तके मिळवण्यासाठी झटावं लागायचं . तेवढं आपल्याला करावं लागत नाही . पुस्तके सहज उपलब्ध होत असुनही माझं वाचन किती सुमार आहे हे जाणवलं .

फक्त एक गोष्ट जरा खटकली . अनेक ठिकाणी सरळ पुस्तकांची यादी दिल्यासारखी दिली आहे . इतर ठिकाणी जशा त्या पुस्तकांबाबत किस्से किंवा गोष्टी सांगितल्या आहेत तसं प्रत्येक ठिकाणी असायला हवं होतं .

मुख्य म्हणजे पुस्तक वाचलं की माणूस बदलत जातो . त्यांच्या आयुष्यात वाचनामुळे कसा बदल होत गेला त्याला कोणती पुस्तके कारणीभूत ठरली हे जास्त सविस्तरपणे वाचायला आवडलं असतं . लेखकाला आत्मचरित्र लिहायचं नाही म्हणून कदाचित त्या गोष्टी टाळल्या असाव्यात पण त्यानेच खरं पुस्तक समृद्ध झालं असतं . कारण आजकाल पुस्तकांच्या याद्या इंटरनेटवर करोडोनी आहेत .
Profile Image for Dhananjay Kulkarni.
147 reviews6 followers
March 9, 2020
This is a book in Marathi. This is a very long list of very large number of books (about half written in Marathi and other half in English) that the author read during his lifetime. The list comes categorized by topic and accompanied with his comments, recommendations, and critique. This book gave me a lot of pointers on which other books I should read.
Profile Image for Sharayu Gangurde.
163 reviews43 followers
August 4, 2017
एकंदरीत छान सुटसुटीत पुस्तक वाटलं. त्यांचं ग्रंथ वाचन फार अफाट आहे आणि त्यातल्या त्यात माझ्या ओळखीच्या पुस्तकांचा उल्लेख वाचून अजून छान वाटलं. पुस्तक वाचताना सतीश काळसेकर यांनी लिहिलेल्या "वाचणाऱ्याची रोजनिशी" या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली. अशी पुस्तक वेडी माणसं आणि त्यांचं ग्रंथवेड सर्वांनी वाचायला हवं आणि जोपासायला देखील हवं.
Profile Image for Umesh Deshpande.
17 reviews23 followers
November 16, 2017
एकदा वाचण्यासारखे..मे ज्या उद्देशानं घेतल होत ते नाही मिळालं.. पण त्यातून वेगवेगळे असे किती तरी genre असतात जे आपण वाचत नाही . हे पुस्तक वाचल्यावर ते वाचण्याची जास्त इचछा झाली..या पुस्तकात त्यांनी किती, कोणत्या, लेखकांची पुस्तके वाचली त्याचा लेखाजोखा आहे.
9 reviews
July 16, 2020
If you want to know what to read, this is a great reference book. Author has given details of books which he read.
Profile Image for Ashok Deobhakta.
34 reviews
Read
February 26, 2022
Very interesting book! The author records how he pursued his passion of reading books!
A good guide, to know about wonderful books
Displaying 1 - 7 of 7 reviews