'स्पर्श' series focuses on teenagers' and initial twenties' life of people with Marathi four-liners. पुनः स्पर्श is a sequel to the popular 'Charoli' book by Siddharth Joshi. 'टुकार' सारखा एखादा टणक शब्द वापरून पुढारलेली मंडळी कुमार-युवक वयातल्या पोरासोरांचं मन जाणण्याचं प्रयत्न पण करत नाही. डिप्लोमा करायला आलेला एखादा उनाड मुलगा त्याला काय करायचंय जीवनात हे किती लवकर ठरवून आलेला असतो नाही? १८-१९ च्या वयात प्रेमात पडलेला आणि दुसरीकडे प्रेमाचंच 'निमीत्त' लावून ढासळलेल्या करीयरकडे पाहणारा तरुण.. हे सगळं हातात थोडीना असतं? ते काही का असे ना, पण मग मनात विचार काय येत असतील? आजू-बाजूच्या गोष्टींनी मनात काय 'इंप्रेशन' टाकलं असेल त्या तरुणाच्या? थोडीफार जरी असं 'वेडं-वाकडं' जगला असाल तर हे कळणं सोपं आहे.. बाकीच्यांना समजेल तेव्हा खूप उशीर होऊन जातो.. -सिद्धार्थ जगदीश जोशी