आजवर झालेल्या युद्धांतील, सर्वात प्रदीर्घ व संहारक युद्धाची ही कथा आहे. व्हिएतनाम, लाओस व कंबोडिया या प्रदेशात गेली तीस-एकतीस वर्षे संघर्ष आहे. अमेरिकेचे सैन्य दक्षिण व्हिएतनाममधून काढून घेतल्यानंतर दक्षिण व्हिएतनाम व कंबोडिया या देशात लढाई जोरात उफाळलेली आहे. ‘नॉमपेन्ह’ मध्ये प्रिन्स सिंहनुक याचे आगमन व सायगाव सरकारात ‘राष्ट्रीय मुक्ती आघाडी’चा प्रवेश, या न्याय्य गोष्टी घडल्याखेरीज या दोन्ही देशात शांतता येणार नाही.
या झगड्यात अमेरिकेच्या अप्रबुद्ध जागतिक राजकारणाचे धागे, प्रथमपासून तो आजतागायत गुरफटलेले आढळतात. निवडून येताना प्रत्येक अमेरिकन अध्यक्षाने, व्हिएतनाम प्रश्नाशी सोईस्कर हिसकाहिसकी केलेली आढळून येते. परंतु हो-चि-मिन्ह याचे अनन्यसाधारण नेत