विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती - विन्स्टन चर्चिल लंडन : विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती म्हणून ब्रिटिश युद्धनेता विन्स्टन चर्चिल यांची जागतिक बुद्धीवंताच्या समितीने निवड केली आहे. ही निवड युरोपमधल्या चोवीस देशातील शास्त्रज्ञ, कलावंत, राजकीय नेते यामधून केलेली आहे. दुसऱ्या क्रमांकावर अल्बर्ट आईन्स्टाईन, डी.एन.ए. च्या रचनेचा शोध लावणारे फ्रान्सिस क्रिक आणि जेम्स वॅटसन हे डॉक्टर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईड, पोप जॉन पॉल (दुसरे) आणि कलावंत पाब्लो पिकासो हे त्रिकूट आहे. (रूटर) (अेशियन एज, १७/७/९७)