रहस्यमय व गूढ कथेच्या शोधात असणाऱ्या वाचकांची भूक वाढविणारं पुस्तक म्हणजे कृष्णचंद्र होय. यामध्ये नारायण धारप यांनी आपल्या रहस्यमय लेखनातून सुडाच्या एकमेव भावनेने महिलेला झपाटलेल्या एका अघोरी शक्तीचा शोध घेणाऱ्या कृष्णचंद्राला वाचकांसमोर आणलं आहे.
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
एका बैठकीत वाचून होण्यासारखे आटोपशीर आणि तेवढ्याच पात्रतेचे पुस्तक. या कथांमध्ये किंचितापणे शेरलॉक होम्सची जाणीव होते. बाकी पुस्तक एकदम झकास, दोन्ही कथा कुठेच कमी पडत नाहीत.
भाषा शैली खूप छान आहे आणि वाचकाला पुस्तकात खिळवून ठेवण्याची कला लेखकाला खूप चांगलीच अवगत आहे. तरीही कुठे तरी पुस्तकातले विषय गरजेपेक्षा जास्त ताणल्या गेले किंवा गरजेपेक्षा जास्त लंबवल्या गेल्यासारखे वाटले. कृष्णचंद्र हे भयकथांच्या संग्रहा पेक्षा मला ते काळ्या जादू ने जास्त प्रभावित झालेले जाणवले.. पुस्तक वाचताना भीती पेक्षा कुतूहल आणि उत्सुकता जास्त निर्माण झाली.
दुसऱ्या कथेत कीर्ती ला का बंदी केले होते, त्यांच्या काळ्या जादूच्या प्रयोगात तिचे काय स्थान होते आणि अझाथोथ ला नेमके तिच्या पासून काय हवे होते हे शेवट पर्यंत पूर्णपणे स्पष्ट झाले नाही, त्यावर वाचक फक्त अनुमान लावण्या पेक्षा काही करू शकत नाही.
Such a good book...small..neatly represented. Its no wonder that narayan dharap's books has its own charishma..this is my first marathi book after ages but it was worth reading ..I really enjoyed reading it ❤