Jump to ratings and reviews

dhuni

अध्यात्म व साधना या विषयांवर जगन्नाथ कुंटे यांनी या पुस्तकात लेखन केले आहे. देहाची आसक्ती सोडून अहंकार, भय अशा भावनांच्याही पलीकडे जाणऱ्या अवस्थेचे त्यांनी वर्णन केले आहे. पुण्यात घडलेली ही एक सत्यकथा आहे. असे कुंटे यांनी प्रारंभीच नमूद केले आहे.

अच्युत हा या कथेचा नायक. त्याची ही धुनी साधनेची आहे. साधकाने साधनेची धुनी अखंड पेटती ठेवावी. बाकी सारं सदृरुंवर सोपवावे, ते सगळे करून घेतात, या श्रद्धेतून हे लेखन झाले आहे. एका वेगळ्या विश्वाचे प्रयत्यकारी दर्शन घडवणारी ही कहाणी आहे.
ती प्रचीती देते, दिशा दाखवते आणि त्या विश्वात गुंतवून ठेवते.

Paperback

Published January 1, 2014

Loading...
Loading...

About the author

Jagannath Kunte

6 books37 followers

Ratings & Reviews

What do you think?

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
15 (53%)
4 stars
11 (39%)
3 stars
2 (7%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
1 review
November 19, 2020
अध्यात्म आणि साधना या विषयांवर जगन्नाथ कुंटे यांनी विपुल लेखन केलेलं आहे. त्यांनी चार वेळा नर्मदा परिक्रमा केलेली आहे. अतींद्रिय अनुभवविश्वाची ओळख करून देणारे लेखक स्वामी जगन्नाथ कुंटे यांचं ‘धुनी’ हे पुस्तक इबुक माध्यमातून प्रकाशित झालं आहे. सर्वसामान्य माणसाचं अनुभवविश्व मर्यादित असतं. भारतात आध्यात्मिक प्रगतीसाठी संसारावर तुळशीपत्र ठेवून साधनेच्या यज्ञात त्यागाची समिधा टाकणारे अनेक साधक आहेत. साधकानं साधनेची धुनी अखंड पेटती ठेवावी... बाकी सारं सद्‌गुरूंवर सोपवावं, ते सगळं करून घेतात या श्रद्धेतून ‘धुनी’ आकाराला आलं आहे. पुण्यात घडलेली ही एक सत्यकथा आहे असं कुंटे यांनी प्रारंभीच नमूद केलेलं आहे.
‘धुनी’चं मुखपृष्ठ अतिशय बोलकं तरीही उत्कंठावर्धक आहे.
कथेचा नायक अच्युत नर्मदातीरी बेशुद्धावस्थेत लोकांना सापडतो. त्याच्या मुखावरचं तेज पाहून लोक त्याला स्वामी म्हणायला लागतात. तोही त्यांच्यात मिसळतो. रात्री डफ वाजवत ‘मेरा जुता है जापानी’, ‘आ चाल के तुझे मैं लेके चलू’ यांसारख्या लोकप्रिय गाण्यांचा आधार घेऊन तो लोकांना जीवनविषयक तत्त्वज्ञान समजावून सांगतो. अच्युत, साधक जगन्नाथ, पुण्यातला एक तरुण साधक आणि त्याची पत्नी अशा निवडक पात्रांच्या जीवनातले घटनाक्रम वाचकांना खिळवून ठेवतात. अच्युत या मुख्य पात्राच्या तोंडी असलेल्या संवादांमधून लेखक साधनेविषयी आणि साधनेच्या नियमांविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी वाचकांपर्यंत पोहोचवतो.
इतर दैनंदिन कामांइतकीच साधनासुद्धा गरजेची आहे. मोह, अहंकार, वासना यांसारख्या विकारांची आहुती दिली तरच साधनेची धुनी प्रज्वलित ठेवता येऊ शकते. साधकानं नित्यनेमानं साधनेला बसावं. साधना करवून घेणं सद्गुरूंच्या हाती आहे. वासनांचा क्षय होणं हीच साधनेची फलश्रुती आहे. विवेकानं मार्ग निघतो आणि नामस्मरणामुळं विवेक जागा होतो.
तरुण साधक विकारांवर मात करण्यासाठी गुरूच्या शोधात घराबाहेर पडतो आणि गिरनार इथं अच्युतला भेटतो. अच्युतकडे मार्गदर्शनाची विनंती करतो. अच्युत साधकाला पुण्यात पत्नीकडे परत पाठवतो. तेव्हापासूनची या सर्व पात्रांची वैचारिक परिक्रमा वाचकाला झपाटून टाकणारी आहे.
फकिरांची जीवनशैली, फक्कडांची फिरती रसोई, टिक्कड, गांजाची मळणी या साऱ्या वर्णनातून कथानक पुढे सरकतं. साधकांच्या मनातल्या इच्छांची पूर्तता होण्याचे किंवा अडचणींचं निवारण आपोआपच होण्याचे प्रसंग अचंबित करणारे आहेत.
गिरनार पर्वतातल्या गुहा, सिद्ध, नारेश्वर, गरुडेश्वर, माहूरगड, इंदोर, पुण्यातल्या धनकवडीमधली श्री शंकर महाराज समाधी, पाताळेश्वर, ॐकारेश्वर अशा विविध स्थळांचा परिचय जाताजाता सहज होतो.
‘न’मन अवस्था म्हणजे देहाची आसक्ती सुटून अहंकार, भय अशा भावनांच्याही पलीकडे जाणारी अवस्था… या अवस्थेचं वर्णन अनेक वेगवेगळ्या प्रसंगांतून लेखकानं केलं आहे.
लेखकानं समाजातली भोंदूगिरी, बुवाबाजी, दांभिकता, चुकीच्या रूढीपरंपरा यांवरही आसूड ओढले आहेत. लेखक म्हणतो की, सद्गुरूंकडे वैराग्य असायला हवं. ज्याच्याकडे वैराग्य आहे तोच खरा गुरू. आश्रम, मठ बांधून जे निर्वाह चालवतात त्यांना ‘साधू’ म्हणता येणार नाही.
वाचकांना विचारप्रवृत्त करून अंतर्मुख करणारं हे लेखन. साधनेनं चित्त हळूहळू शुद्ध होतं. साधनेनं पुण्य मिळत नाही, पापाचा मात्र नाश होतो... म्हणून साधकानं साधनेची धुनी आयुष्यभर सतत पेटती ठेवली पाहिजे याची जाणीव करून देण्यात लेखक यशस्वी ठरतात.
Profile Image for Aniket Patil.
525 reviews24 followers
October 26, 2017
Similar on the lines of previous themes. Topic is how to do sadhana in regualr uninterrupted manner. If you havent read anything of this author then this is different for you, and you may like it. but having read 2 books already this seems ok ok.
Displaying 1 - 3 of 3 reviews