हरवलेला लखोटा वर्ष कोणते होते ते आठवत नाही. बेकर स्ट्रीटवरच्या घरी शरद ॠतूतल्या एका मंगळवारी सकाळी दोन पाहुणे आले. साऱ्या युरोप खंडात ख्यातनाम असलेले दोन पुरुष. त्यांतला एक दिसण्यात मनस्वी वृत्तीचा, धारदार सरळ नाकाचा, गरुडासारखी तीक्ष्ण नजर असलेला हुकुमी गृहस्थ होता. एकदमच सांगून टाकतो - इंग्लंडचं पंतप्रधानपद दोन वेळा भूषवणारे लॉर्ड बेलिंजर. दुसरे किंचित काळपटलेले, रेखीव चेहऱ्याचे, नीटनेटके, रुबाबदार मध्यमवयीन गृहस्थ म्हणजे नेक नामदार ट्रेर्लानी होप होते. युरोप-विषयक व्यवहाराचे ब्रिटिश सेक्रेटरी. सतत प्रगतिपथावर असलेले एक मुत्सद्दी. होम्सने विसकटून ठेवलेल्या कागदांच्या पसाऱ्यात ते दोघे कोचावर बसले. दोघांचेही चिंतातुर चेहरे पाहिल्यावर काहीतरी तातडीच्या गæ