Jump to ratings and reviews
Rate this book

Lampan #1

Vanvas 12th Edition

Rate this book
Product Condition: No Defects.

Paperback

First published January 1, 1994

Loading...
Loading...

About the author

Prakash Narayan Sant

5 books47 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
243 (66%)
4 stars
86 (23%)
3 stars
27 (7%)
2 stars
7 (1%)
1 star
4 (1%)
Displaying 1 - 26 of 26 reviews
Profile Image for Makarand Gosavi.
30 reviews2 followers
December 8, 2018
प्रकाश नारायण संत आणि लंपन ह्यांच्याविषयी मला एका सोशल साईट वरच्या चाहर्चेतून कळले आणि उत्सुकता चालवली. जरा मग वनवास आणि बाकी ३ पुस्तकांविषयी त्या म्याड गुगलला विचारले आणि चक्क पुलंचा अभिप्राय. मग वनवास वाचायला घेतले आणि चक्क त्या म्याड लंप्याचा फॅनच झालो. जवळपास एका बैठकीत म्याड सारखं वाचून काढलं आणि वाचताना आपोआपच माझे शालेय दिवस डोळ्यापुढे उभे राहत होते.

चक्र का काय ह्या कथेमध्ये त्या लंप्याला त्याचे म्याड मास्तर कविता म्हणत सहज बोलून जातात की, 'आताचा जो तुमचा आनंद आहे तो तुमच्या आयुष्यातला खरा आनंद आहे. तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हे सगळं हरवून गेलेलं असेल. मग फक्त....' हे ऐकून लंप्याच्या डोक्यात नेहमीप्रमाणे चक्र फिरत राहतात आणि त्याला स्वाभाविक प्रश्न पडतो की मग मोठा कशाला व्हायच आणि तो बैचेन होऊन जातो आणि त्याची बैचेनी वाचून आपल्या ही पोटात खड्डा की काय पडतो आणि गंप्याला सांगावंसं वाटतं की अरे बाबा भविष्याच्या चिंतेत आताच्या आनंदावर बोळा फिरवू नकोस म्हणून!!! ह्या पुस्तकाशी एवढे आपण गुंततो.

गंप्याला एका कथेत जेव्हा बराच ताप येतो आणि तापलेल्या अवस्थे भास होऊन त्यांनाच खरे मानून जे बरळत असतो त्याचे वर्णन एवढे अप्रतिम की माझी तापलेली अवस्था डोळ्यसमोरून तरळून गेली.

पु.ल. म्हणतात त्या प्रमाणे ह्या कथा एकदा नाही, दोनदा नाही १५७३ वेळा जरी वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतील. अगदी खरं आहे हे!!!!!
Profile Image for Harshvardhan Waghdhare.
2 reviews60 followers
September 15, 2017
Vanvas is a gem from Marathi literature. Lampan and his short stories will take you back to your mad school days. The curiosity about the world while growing up is very well penned by Prakash Sant. Beauty in simplicity and with great details are the take aways.
Oajhh and Chakra are my personal favourites. Happy reading :)
Profile Image for Deepa Patil.
22 reviews9 followers
January 4, 2021
खुप सुंदर.... लंपू च्या mad नसलेल्या mad जगात आपण सहज वावरतोय त्याच्या सोबत असं वाटतं पुस्तक वाचताना ... किलवर एक्क्या सारख्या तोंडाचा बोका ( कसलं भारी वर्णन आहे हे :)), तेविसशे आठ गोष्टींची लंपन ने केलेली सतराशे साठ पारायणे आणि त्याची असंबद्ध विचारांची सुसंगत "साखळी" ... सगळंच अप्रतिम!
Profile Image for Rohit Harip.
55 reviews6 followers
May 24, 2017
पुस्तक वाचताना या मॅड लंपुच्या प्रेमात सात हजार दोनशे सदुसष्ट वेळा आपण पडतो,
बघा तुमची शाळा आठवते का ?
Profile Image for Abhay Bage.
7 reviews
February 29, 2020
मॅडसारख केलय ह्या पुस्तकान... ह्या जन्मात परत परत एकोणीसशे सत्तावीस वेळा वाचायला लागतय हे...
187 reviews5 followers
January 10, 2026
एक निखळ, आनंददायी, आवर्जून वाचावे असे पुस्तक

प्रकाश नारायण संत यांनी या पुस्तकात लंपनच्या निरागस बालपणाचं मजेशीर चित्रण केलंय. त्याचं शाळेतल्या वेगवेगळ्या गोष्टींचं बारीक निरीक्षण वाचून मला माझे शाळेतले दिवस आठवले.

मॅड शब्दाचा वापर एका मराठी पुस्तकात एवढ्या मजेशीर पद्धतीने करण्यामध्येच लेखकाच्या कल्पकतेची कमाल दिसते.

पण हे लेखन केवळ विनोदी नसून लंपनच्या वायला साजेसा हळवेपणाही अनेक घटनांमधून आपण अनुभवतो. आई - मुलगा, आजी - नातू, वडील - मुलगा, भाऊ - बहीण या नात्यांमधील ओलावा या पुस्तकात अगदी सुरेख टिपला आहे. त्यांच्या कुटुंबातील खेळकरपणाही लोभस आहे. जसे की लंपन आपल्या वडिलांचे पुस्तकप्रेमाविषयी सांगतो;

"
पुस्तक वाचणं, टेबलाकडं बसून लिहिणं आणि इकडंतिकडं सहलीला जाणं या सगळ्यांत आमचे बाबा म्हणजे नंबर एक ! बाबा पुस्तक वाचत असले की मग गंमत येते कधी कधी. पुस्तक तोंडासमोर धरून ते घरात कुठंही आणि केव्हाही बसलेले असतात. कुठं की दूर गेल्यासारखे. त्यांच्या त्या पतंगासारखं त्यांच्यासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं,

"बाबा, चहा घ्या."

"तिकडं कपाटात आहे..." ते नक्की म्हणणार.

"बाबा, आंघोळीला चला."

"ठेव तिकडं..."

मग आई स्वैपाकघरातून म्हणते,

"अहो, सकाळी उठल्या उठल्याच आंघोळ झाली आहे तुमची."

"येताना घेऊन येतो," बाबा म्हणणारच.


आता असं गोंडस कुटुंब वाचकाला कसं नाही आवडणार बरं!

Nostalgia वर पैकीच्या पैकी मार्क मिळवणारे अनेक प्रसंग पुस्तकात रंगविले आहेत. उदाहरणार्थ हे पुस्तक वाचताना लहानपणीचे काही पत्त्यांचे डाव आणि त्यात वापरलेल्या वेगवेगळ्या युक्त्या यांची छान उजळणी झाली.

" मी म्हणजे पत्ते खेळणार नंबर एक. मला खूप डाव येतात. पण लेडिस म्हणजे मला एकदम आवडणारा. दोघादोघांची टीम, पहिल्यांदा चारचारच पत्ते वाटायचे, ज्याची पाळी असेल त्यानं हुकूम बोलायचा. मग उरलेली चारचार पानं वाटून खेळायला सुरुवात.

दिसायला एकदम साधा, सरळ आणि सोपा, कंटाळवाणा, पण हुकूम बोलण्यातच सगळी मजा असते. आधी तो फक्त चारच पानांवर बोलायचा असतो. उरलेली पानं हुकूम बोलल्यावर मग मिळणार. त्यामुळं हुकूम बोलायच्या आधी आपल्या मिडूकडं कोणकोणती पानं आहेत हे समजणं महत्त्वाचं, भिडू बावळट असेल तर काय त्याच्याकडं कोणकोणती पानं आहेत ते जीव गेला तरी समजायचं नाही. पण भिडू गोष्टीतल्या मुला-मुलींसारखा चाणाक्ष, चतुर, चलाख असेल, तर मग मात्र काही विचारू नका, मजाच मजा, भिडू आणि आपण दोघं नसून एकच आहोत, आपल्या हातात चार पानं नसून आठ पानं आहेत, असंच होतं. मग आपण कायम जिंकणारच. दगडावरची रेघ की काय, तेच."


एकविसाव्या शतकातला वाचक म्हणून 'वनवास' वाचताना हे जाणवतं की लंपन च्या लहानपणी मोबाईल आणि इंटरनेट नव्हतं हे फार बरं झालं. नाहीतर त्याचं बालपण असंच छान राहिलं असतं का अशी जरा शंका वाटते.

असो. एकंदरीत एक निखळ, आनंददायी, नक्की वाचावं असं पुस्तक :)

ता. क. - यावर आधारित वेब सीरिज पण चांगली आहे असे ऐकले. त्याचीही उत्सुकता आता आहे.
Profile Image for In.
159 reviews1 follower
July 11, 2021
प्रकाश नारायण संतांचं वनवास म्हणजे चपखल उपमांचा आणि अचूक वेधक वाक्यरचनेचा सुंदर मिलाफ आहे. पौंगंडावस्थेतल्या मुलाचं भावविश्व इतकं सुरेख जमून आलेलं आहे की, प्रत्येक कथेसरशी मला माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी आठवल्या. आपण मोठे झालो की अनेक गोष्टी काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. 'वनवास' सारखी पुस्तकं आठवणींचे ते पदर हळुवारपणे मोकळे करत जातात. ह्याबद्दल संतांचे आभार मानावे तितके थोडे.

लंपनच्या किशोरवयातला कालखंड उलगडताना, त्या कालच्या समाजाच्या सहजतेची आणि नात्यातल्या गोडव्याची पण नव्याने ओळख होते. कुठलाही अभिनिवेश न राखता असणारी मैत्री, अगदीच अर्धा घटका टिकणारी लुटुपुटुची भांडणं आणि थोडंसं उपहासात्मक, खोडकर असूनही कुठेही कुत्सित न होणारं, एकमेकांच्या जवळिक��नं, आपुलकीनं राहणारं गाव आपल्यासमोर लेखक उभं करतो.

आपण मोठं झाल्यावर पुनःश्च जुन्या आठवणींमध्ये डोकावून त्याच निरागसतेला शब्दात बांधणे सोप्पे काम नाही. परंतु वनवासातील प्रत्येक कथेत योग्य तो भाव आणण्यात लेखक कमालीचा यशस्वी झाला आहे.

योगायोगाने हे पुस्तक वाचून झाल्यानंतर सिटी ऑफ गॉड पाहण्यात आला. ह्या पुस्तकाचा गोडवा आणि त्या चित्रपटातल्या मुलांच्या आयुष्याचा विचार केल्यावर अधिकच गोड वाटला. हे संतांचं माझ्या वाचनातील पहिलंच पुस्तक, आता नक्कीच त्यांची अजून पुस्तकं वाचली जातील हे खरं
Profile Image for Rushikesh Gaikwad.
1 review
December 31, 2024
This book is a treat to the readers who ofter indulge in their childhood memories…Lampan’s curiosity about everything and way of looking at things is just portrayed amazingly in this book…Also, Lampan’s feelings about Sumitra are beautifully expressed in this book and I love that, he is not quite sure what he is feeling but reader finds it very interesting,relating and satisfying….Just an amazing book to indulge in the villager life of Lampan.
Also the pain of staying away from his mother and father in such an early childhood age and how it is dealt by the tiny curious mind is brilliantly illustrated in this work…
Must read for once
Profile Image for Aniket Patil.
525 reviews23 followers
October 16, 2017
After a long wait for the book. Finally I got it and just finished it. I am expecting much more from this book. There is no doubt the life and innocence of Lampan portrayed in a very good form. However, it is not that intriguing , I found shala and Dunayadari more absorbing and I can imagine same scenario in my life while reading both the books. But with vanvas ,the level was not even near. Although comparing Shala and Vanvas is not my intention, but expectation of mine not satisfied.
Profile Image for Arti.
5 reviews
June 6, 2017
The book, set in a quaint town, warms you with sweet experiences- sometimes silly, sometimes mundane at other times peculiar. The author's childhood memories are often close to our own.

Loved the book.
40 reviews
April 4, 2025
The stories are so refreshing that no matter how many you read you will feel like you have read it already. The Story revolves around central character "Lampya" who is living with his grand-parents and walks the reader through his adolescence life using stories.
3 reviews
January 20, 2017
one of the best book in the genre. Gives goosebumps about growing years and wonderful simple lives back then.
Profile Image for अनिकेत.
394 reviews23 followers
April 1, 2026
#१२. लंपनचं म्याड विश्व “वनवास”

एकोणीस गुणिले एकोणीस अधिक एक वेळा वाचलं तरी कंटाळा येत नाही असा किशोरवयीन लंपनचा हा प्रवास आहे.१३ भागांत विभागलेले लंपनचे त्या वयातले अनुभव वाचणं व त्यात आपण आपलं कुमारवय शोधत फिरणं हे म्हंजे एकदम बेष्टच आहे!

रात्र जागुन खेळलेले पत्त्यांचे डाव,गप्पा-गाणी,मित्रांसोबत खेळलेले मैदानी खेळ,मारामाऱ्या,शाळेच्या आठवणी,सहली,मास्तरांचं दटावणं, क्वचित मारही, मोट्ठ्या लोकांचं न कळलेलं वागणं व त्यावर पडणारे प्रश्न सगळं झरझर डोळ्यांपुढुन सरकत गेलं.

लंपनच्या या वयात येण्याच्या काळात बाहेरील जगाबद्दल वाटणारं कुतूहल,मनात रुजु पाहणारी प्रेमभावना,सुप्त आकर्षण,या साऱ्यातुन आपसुक उमटणारे प्रश्न,गुंता,भीती अशा बऱ्याच गोंष्टींचा एकत्र अनुभव तो घेतो आहे.मुख्य म्हणजे हे वाचताना कुठंही अवघडल्यासारखं न वाटता त्याची नवतारुण्यसुलभ मानसिकता,निरागसता,त्यातुन निर्माण होणारी मिश्किलता आपल्याला सहज सुखावुन जाते.

लंप्या इतरांप्रमाणेच काही न् बाही निमित्त होऊन मोठ्यांच्या तावडीत सापडतो,धपाटे खातो,कधी केलेल्या तर कधी न केलेल्या चुकांबद्दल बोलणी खातो.हे सगळं त्याच्या मधाळ भाषेत तो आपल्याला सांगतो ते अगदी शब्दमधुर आहे.कुठं उसना आव नाही,आक्रस्ताळेपणा नाही,सगळं अगदी कुणाहीबाबत नेहमीचंच घडत असल्यासारखं आहे.प्रत्येक कथा वेगळी, वेगळ्या विषयावरची स्वतंत्र आहे.

आईपासून दुर राहिल्यानं कधीमधी तिच्या आठवणीनं तिच्या मायेसाठी व्याकुळलेल्या लंपनची खुप कीव येते,पण त्याचे आजी-आजोबा व आजुबाजुचा इतर गाव-गोतावळा त्या जाणीवेची धार फार तीव्र होऊ देत नाहीत.एकंदरीत,आई-वडील,भाव-भावंडांपासुन दुर आजोळी राहणं हा ही एकप्रकारे वनवासच म्हणावा तरी पुर्ण पुस्तकांत काही मोजके क्षण वगळता इतरत्र त्याचं वैषम्य ठळक जाणवत नाही.

वनवासला गावच्या मातीचा वास आहे.पुस्तकभर पसरलेल्या गावच्या वर्णनात कितीतरी गोष्टी आपल्याही आजोळी गावी मी उण्याअधिक अनुभवल्या आहेत.लाल माती,जुनी कौलारु घरं,अंगण,बाग,नारळाची झाडं,घरांची ओळ संपुन सुरु होणारी-पावसाच्या पाण्यानं तुडुंब भरलेली नि त्यात डोईवरचं आभाळ जणू आपल्यात सामावल्यागत मिरवणारी खाचरं,नंतर हिरवाईने नटुन वाऱ्यावर डोलणारे भातशेतं,साचलेल्या पाण्यात जमणारे बेडूक,त्यांचं एकसुरात चालणारं डराव डराव,मासे,खेकडे,शेताशेजारची लक्ष्मीची दोन झाडं,त्यावर चालणारे मुलांचे खेळ,झाडांवर जमणाऱ्या असंख्य पक्षांचे किलकिलाट,दुरुन दिसणारा निळा डोंगर,तळ्याच्या काठांवर झुडपांत बागडणारी फुलपाखरं,सामानासह थोडं दुरवर ये-जा करायला ‘बसवण्णाची धमणी’सारं काही अस्सल गावाकडचं !

काही हलकं-फुलकं वाचुन तणावलेलं मन मोकळं करायचं असेल,टुमदार गावचा फेरफटका करायचा असेल किंवा मोट्ठं व्हायच्या ओझ्याखाली दबुन गेलेल्या,वयात येतानाच्या आपल्या म्याऽऽऽड स्मृतींना पुन्हा भेटायचं असेल तर ‘वनवास’ वाचायला हवं !

~ अनिकेत
(हनुमान जन्मोत्सव, ०१.०४.२६)
Profile Image for Sneha.
22 reviews2 followers
March 13, 2024
एक अत्यंत भावनिक आणि निरागस लिखाणाचा अनुभव!
साधं, सरळ आणि सहज लिखाण पण एवढं हृदयस्पर्शी आणि अस्वस्थ करणारं
लंपनच्या चिमुकल्या दुनियेचं अद्‌भुत दर्शन करत असताना कित्तीतरी गोष्टींनी आणि वाक्यांनी डोळ्यात पाणी आलं.

Reminds you of the simplicity and purity of childhood phase.

One of the books that made me think...
What will I do with life once this book is over!?

Check out for complete review - https://snehaumarye.wordpress.com/202...
Profile Image for Parag Kale.
11 reviews
January 17, 2015
The entire series is must read for anyone who is looking for some good stuff in marathi literature.
Its a world of "Lampan"(the growing kid) and his world in village.
I loved the writing style of this author. He has kept it simple to its core. Simple yet very beautiful characters make you fall in love with them.
Its for every age group. In case you are parent read it out for your child.
Profile Image for Mayur.
50 reviews
March 29, 2016
लंपनच्या दृष्टीतून त्याच्या आसपास घडणाऱ्या घटनांच्या मस्त कथा. लंपनची अनोखी कल्पनाशक्ती आपल्याला खिळवून ठेवते. थोडी वेगळी भाषा, वेगळी शैली यातून बालपणच्या निरागस, भाबड्या जगाची सफर करवणारं एक सुंदर पुस्तक.
1 review
Read
March 19, 2013
अत्यंत सुंदर .. ओघवती भाषा.. त्या वयात शिरण्याचं प्रकाश नारायण संत यांचं कसब अद्भूत आहे.
1 review
June 19, 2013
Kitihi wela wachla tari nawinach watata.....
1 review
Currently Reading
September 19, 2018
I WANT TO READ THIS BOOK , ONLINE.
This entire review has been hidden because of spoilers.
Displaying 1 - 26 of 26 reviews