किशोर साहस कादंबरी साधारणपणे दहा ते सोळा वर्षांच्या मुलांसाठी आहेत. वयाचे पहिले दशक ओलांडताना मुले अद्भुत आणि वास्तव यांच्या सीमेवर कुठेतरी असतात. राजा-राणी, राक्षस व पऱ्या यांची मोहिनी अद्यापि मनावरून गेलेली नसते. पण त्याच बरोबर दृष्टी हळूहळू सभोवतालच्या जगात ज्या साहसी घटना घडत असतात- किंवा घडाव्यात असे त्यांना वाटते-तिकडे वळलेली असते. तेरा-चौदा वर्षांच्या मुलांनी अद्भुत गोष्टींकडून वस्तुनिष्ठ साहस-कथांकडे निश्चितपणे वळावे असे मला स्वतःला वाटते. विज्ञानाने एवढी मोठी ‘खरी’ जादू आटोक्यात आणलेली असताना आपण अजून राक्षसी जादू नि मंत्रतंत्रच उगाळीत बसावे का? हं-गंमत म्हणून काही काळ ठीक आहे. पण किती काळ? अल्लाउद्दिनाचा जुना दिवा देऊन एडिसनचा नवा दिवा घेण्याची वेळ è