वृत्तपत्रात छापून येणार्या ग्रामिण वा निमशहरी भागातल्या बातम्यांच्या वास्तवाचा धागा पकडून (लेखक पत्रकार आहेत) त्याभोवती कलात्मकतेने रचलेल्या मोजून सहा कथा या पुस्तकात आहेत. या कथातर आवडल्याच पण पुस्तकाच्या शेवटी असलेल्या परिशिष्ट (लिहिण्यामागची 'भूमि'का) मध्ये लेखकाने एकंदर साहित्य, लेखक, स्वतःच्या लेखन कलेच्या सृजनशीलतेविषयी आणि काही कथांच्या मागच्या अनुभवावर जे मनोगत लिहिले आहे ते खूप आवडले.