कार्लाईल म्हणतो की जगाचा इतिहास म्हणजे कर्तबगार पुरुषांची चरित्रेच असतात. या दृष्टीने या पुस्तकात माओपूर्व चीन व माओने घडवलेल्या कम्युनिस्ट क्रांतीचे चित्रण, माओच्या चरित्राच्या अंगाने आलेले आहे. लेनिनने घडवलेली रशियातील मार्क्सवादी क्रांती हीच माओचे प्रेरणास्थान होती. आज रशियात मार्क्सवाद व कम्युनिझम इतिहासजमा झालेले आहेत. १९५६ मध्ये क्रुश्चेव्ह याने स्टॅलिनच्या दुष्कृत्यांचा व जुलमाचा पाढा वाचून तेथील कम्युनिस्ट राजवटीचे वस्त्रहरण केले. यामुळे पुढे १९८५ ते १९८७ या काळात गोर्बाचेव्ह यांना असे प्रतिपादन करण्याचा धीर झाला की ‘समाजवादाच्या भूमिकेत क्रांतीकारी बदल करून सर्व समाजाची नवरचना (पेरेस्त्रोइका) करायला हवी’ आणि हे करायचे तर ‘सर्व प्रकारची गु