अनेक चढ उतारांनी, रोमहर्षक वळणांनी आणि चित्तथराक संघर्षाच्या प्रसंगांनी भरलेली ही कथा तिसऱ्या महायुद्धाच्या भयंकर प्रलयानंतरच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पुढे सरकते. त्या महायुद्धात आई-वडील, सर्वस्व गमावलेला १२ वर्षांचा विजय जेंव्हा रावसाहेबांना भेटतो तेंव्हा त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळते. युद्धानंतर वाचलेल्या लोकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात स्थापन झालेल्या छोटेखानी साम्राज्याचा तो सेनापती बनतो. भारतात परत लोकशाही राज्याची स्थापना करणे हेच मुख्य उद्धिष्ट घेऊन त्याची घोडदौड सुरु असतानाच, त्याला गुंडांच्या तावडीत सापडलेली नर्गिस भेटते. त्यांचा सर्वात मोठा शत्रू खान ची मुलगी नर्गिस. तिच्या येण्याने झालेले अनेक गौप्यस्फोट त्यांच्या लढाईची दिशा कश
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळ काढून एखादं पुस्तक वाचणे तसे दुरापास्तच झाले आहे. त्यातच टीव्ही, सिनेमा सारख्या माध्यमांनी एकामागून एक अशी मनोरंजनाची अविरत शृंखला चालू ठेवली असताना, वाचकांचा पुस्तकांकडे असणारा कलही कमी होताना दिसत आहे. अशा वेळी एखादी कथा वाचकांना खिळवून ठेवून आणि एखाद्या चित्रपटाचा आनंद देऊन पहिल्या बैठकीतच संपूर्ण पुस्तक वाचुन काढायला भाग पाडू शकेल काय? तुम्ही 'आरंभ' ही कथा वाचायला सुरु केल्यावर तुम्हाला असाच अनुभव येऊ शकतो.
अनेक चढ उतारांनी, रोमहर्षक वळणांनी आणि चित्तथराक संघर्षाच्या प्रसंगांनी भरलेली ही कथा तिसऱ्या महायुद्धाच्या भयंकर प्रलयानंतरच्या काळाच्या पार्श्वभूमीवर पुढे सरकते. त्या महायुद्धात आई-वडील, सर्वस्व गमावलेला १२ वर्षांचा विजय जेंव्हा रावसाहेबांना भेटतो तेंव्हा त्याच्या जीवनाला नवी दिशा मिळते. युद्धानंतर वाचलेल्या लोकांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात स्थापन झालेल्या छोटेखानी साम्राज्याचा तो सेनापती बनतो. भारतात परत लोकशाही राज्याची स्थापना करणे हेच मुख्य उद्धिष्ट घेऊन त्याची घोडदौड सुरु असतानाच, त्याला गुंडांच्या तावडीत सापडलेली नर्गिस भेटते. त्यांचा सर्वात मोठा शत्रू खान ची मुलगी नर्गिस. तिच्या येण्याने झालेले अनेक गौप्यस्फोट त्यांच्या लढाईची दिशा कशी बदलतात, त्यांचा खरा शत्रू कोण होता? ते दोघे कसे त्या शत्रूशी लढतात? त्यांना विजय मिळतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वाचकांना हे पुस्तक वाचावे लागेल. भारत, अमेरिका, जपान, इंडोनेशिया अशा अनेक ठिकाणांवर चाललेल्या घडामोडी कथेला पुढे सरकवतात आणि जसा एखादा पिरॅमिड कळसाकडे केंद्रित होतो तसा अत्युच्य बिंदूवर त्या संघर्षाचा अंत होतो.
वेळात वेळ काढून वाचावे असे हे पुस्तक सध्या Amezon च्या Kindle Unlimited वर उपलब्ध आहे. लेखकाचे हे जरी पहिले-वाहिले पुस्तक तरी त्याने त्या कथेचे शिवधनुष्य समर्थपणे पेलले आहे.
पुस्तकाचे नाव : आरंभ लेखक : उल्हास नलावडे पृष्ठसंख्या : २२०