काचेला डोळे टेकवून नलिनी बाहेरच्या अंधाऱ्या सृष्टीवर नजर खिळवून बसली होती. काचेत अस्पष्टसे प्रतिबिंब दिसत होते; पण त्या प्रतिबिंबावर बाहेरची सरकणारी, अज्ञात ठिणग्यांनी फुललेली, भयानक काळी रात्र आक्रमण करीत होती. तिला वाटले, आपल्या आयुष्याचीही या क्षणी हीच गत झालेली आहे. रोजचे सरावाचे जीवन एकदम धूसर, काचेवरच्या प्रतिबिंबासारखे भ्रामक झाले आहे-पायाखालचा आसरा सरकायला लागला आहे- आणि या रहस्यमय रात्रीसारखेच काहीतरी अज्ञात, निष्ठुर, अगम्य काहीतरी आपल्या आयुष्यावर आक्रमण करीत आहे - आपले लहानसे जग अंधारात बुडून नामशेष होणार आहे. या विचाराने असेल किंवा रात्रीच्या गारव्याने असेल, तिचे सर्व अंग एकदम शहारून उठले... कोण होती ही नलिनी? कसल्या अनामिक संकटाने गांगरून गेली होती? स्वप्नात रममाण होण्याच्या काळात ती भीतीने का गोठून गेली होती? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि नारायण धारपांच्या रहस्यमय लेखनाचा थरार अनुभवण्यासाठी जरूर वाचावी अशी कादंबरी.
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
धारपांच्या कथांवर आजवर बऱ्याच दूरदर्शन मालिका, चित्रपट आणि नाटके बेतली आहेत. तरीही त्या कथा मूळ स्वरुपात वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. मराठी साहित्यात भय कथा किंवा गूढ कथा लिहिणारे लेखक फार कमी आहेत. त्यात अशा साहित्याकडे पाहण्याचा इतर लेखकांचा, टीकाकारांचा आणि वाचकांचाही दृष्टीकोन वेगळा असतो. या साहित्याला पुष्कळदा सामान्य किंवा लोकप्रिय साहित्य समजून दुय्यम दर्जा दिला जातो.
पण गूढ कथा लिहिण्याचा उद्देश केवळ वाचकाच्या मनात भीती निर्माण करणे हाच समजला गेला तर ते योग्य ठरणार नाही. धारपांच्या 'काळी जोगीण' या कथेविषयी इतके नक्कीच सांगता येईल की भीतीच्या कक्षा ओलांडून, ही कथा तुम्हाला तुमच्या अवतीभवती घडणाऱ्या गोष्टी पुन्हा एकदा तर्काच्या आधारावर पडताळून पाहण्यास भाग पडेल.