A self-taught artist, Matkari is a Marathi writer mastering in many areas including plays, one-act plays, children’s plays, stories and novels. His qualitative and quantitative contribution to Marathi literature cannot be overlooked. His all-round workmanship covers various topics from our day-to-day life. His articles with simple yet elegant language, meaningful precision and dramatic settings take readers to sharp dimensions. Readers are easily captivated with the essence of life as expressed by him. We cannot help but notice the social commitment and human values that he so much keenly expresses.Loaded with all these qualities, ‘Pardeshi’ is an enigmatic collection on the background of non-Indian culture, yet we strongly realise that human nature is same all over the world. No doubt that this book is reader-worthy.
Matkari's first work, the one-act play Wedi Manase,was presented in 1955 on All India Radio in Mumbai.His play Pahuni was presented the next year at another venue.
Matkari worked as a columnist for newspapers and magazines in the 1970s. He wrote the column Soneri Savalya n Apale Mahanagar for four years.
Matkari's 98 works thus far include 33 plays, 8 collections of his one-act plays, 18 books of his short stories, 3 novels, a book of poems for children, and 14 plays and three collections of plays for children.His works include Gudha Katha --mysteries—for adults which maintain realism.Matkari wrote a few plays in Indian languages other than Marathi.Many of Matkari's novellas have been adapted for the stage.
भारतीयांच्या मनात परदेशाबद्दल तिथल्या लोकांबद्दल, त्यांच्या राहणीमानाबद्दल आणि तिथल्या सोयीसुविधांबद्दल आजही कुतूहल आणि आकर्षण आहे. आजही अनेक भारतीय परदेशात जाऊन स्थायिक होण्याची स्वप्न पाहतात. परदेशात स्थायिक झालेल्यांचं भारतीय समाजातलं महत्व निराळंच आहे. असं असलं तरी जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी मानवी भावना, स्वभाव आणि माणसांपुढची आव्हानं थोड्याफार फरकाने सारखीच असतात. असेच परदेशी पार्श्वभूमी असलेले १९ लेख रत्नाकर मतकरी यांच्या ‘परदेशी’ या लेखसंग्रहात आपल्याला वाचायला मिळतात. यापूर्वी हे लेख नव्वदच्या दशकात ‘आपलं महानगर’ या वर्तमानपत्रातील रत्नाकर मतकरी लिहीत असलेल्या ‘सोनेरी सावल्या’ या सदरात प्रकाशित झाले आहेत. या लेखसंग्रहातले लेख संमिश्र स्वरूपाचे आहेत. काही लेख हे मतकरींच्या परदेशवारीच्या वेळीच्या अनुभवांवर आधारित आहेत, काही लेख हे त्यांनी घेतलेल्या मुलाखतींवरून आकाराला आलेले आहेत, तर काही व्यक्तिविषयक किंवा प्रसंगविषयक लेख हे त्यांना वाचनातून वगैरे मिळालेल्या माहितीवर आधारित आहेत. या लेखांतील व्यक्तिरेखा आणि प्रसंगांतल्या जिवंतपणामुळे वाचताना ते कथेप्रमाणे भासतात त्यामुळे त्या वाचकाच्या मनाला भिडतात. या लेखांतील काही व्यक्तिरेखा जन्माने परदेशी आहेत, तर काही भारतातून परदेशात स्थायिक झालेल्या आहेत. यांबरोबरच या संग्रहात रुडयार्ड किपलिंग आणि अगाथा ख्रिस्ती या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित लेखांचाही समावेश आहे.
या लेखसंग्रहाच्या सुरुवातीचे ‘परदेशी’, ‘माहेरवासी’, ‘मोत्याच्या बांगड्या’ आणि ‘ती आणि तिचं बाळ’ हे लेख परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांच्या आयुष्यांभोवती फिरतात. ‘परदेशी’ हा शिक्का लागल्यानंतरचे बदललेले त्यांचे स्वभाव वाचकांसमोर उलगडतात. या लेखांत परदेशात स्थायिक होण्याच्या लालसेपोटी स्वतःच्या तत्वांना बासनात गुंडाळून ठेवणाऱ्या प्राध्यापक भानुशाली आणि पम्यासारख्या व्यक्तिरेखा आहेत, वर्षातून एकदा काही दिवसांसाठी भारतात येऊन एखाद्या माहेरवाशिणीप्रमाणे आपल्या लोकांमध्ये प्रेमाने मिसळून राहणारा डॉ. चंद्रकांत अष्टीकर उर्फ चंद्या आहे, तर त्याउलट भारतातून अमेरिकेत घरी आपुलकीने भेटायला येऊ पाहणाऱ्या पाहुण्यांना कमी लेखणारी, त्यांच्याशी तुसडेपणाने बोलणारी तारकाही आहे. या सर्व व्यक्तिरेखांमध्ये चंद्याची व्यक्तिरेखा वाचकाला विशेष भावते. नोकरी धंद्याच्या निमित्ताने परदेशात सुखवस्तू आयुष्य जगणारा चंद्या आपल्या लोकांच्या मायेसाठी आसुसलेला आहे. म्हणूनच वर्षातून एकदा काही दिवसांसाठी तो आवर्जून भारतात येतो. इथे आल्यानंतर तो गणेशोत्सव साजरा करतो, स्वतःचं वैभव विसरून दूर राहणाऱ्या नातेवाईकांना भेटायला वेळात वेळ काढून आवर्जून त्यांच्या घरी जातो, त्यांच्या घरी अज्जिबात आढेवेढे न घेता खानपान करतो. भारतातली एकंदर व्यवस्था, इथल्या लोकांचं राहणीमान आणि परिस्थिती लक्षात घेता, इथे खरंच का तुला मजा आली या प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणतो, “श्रीमंत घरात असलेली मुलगी माहेरी येते. माहेरी काय असतं? …म्हातारा बाप, थकलेली आई, कोसळलेलं घर– दारिद्र्य! पण ते तिला दिसतच नाही! तिला दिसतं ते तिचं मागं राहिलेलं बालपण! ते तिला परत जगायचं असतं! आणि ते जगायची एकच जागा या जगात असते– ती म्हणजे ते कोसळलेलं घर! म्हणून त्याच्या ओढीनं ती येते! प्रेम, उत्साह, आनंद उधळत माहेरी चार दिवस राहते– अगदी वेगळी होऊन! नवं चैतन्य घेऊन ती परत जाते श्रीमंत सासरी! आमचं तसंच असतं. आम्ही हे सगळं सोसतो ते कुणावर दया म्हणून नाही भाऊ, अनुकंपेनं नाही! –आम्ही इथं येतो ते हे आमचं माहेर आहे म्हणून! वर्षभर तिथल्या त्या सुखात जगत असतानाही आम्ही या कष्टांनी भरलेल्या या माहेराकडे डोळे लावून असतो!” स्वतःच्या माणसांपासून दूर राहणारा, स्वतःच्या घराची ओढ असणारा प्रत्येकजण त्याच्या या विचाराशी सहमत होईल यात शंका नाही.
या संग्रहातील ‘ती आणि तिचं बाळ’ आणि ‘सहा महिन्यांची सोबतीण’ हे लेख सर्वार्थाने एकमेकांपेक्षा निराळे आहेत. ‘ती आणि तिचं बाळ’ या लेखातली मैत्रेयी आणि ‘सहा महिन्यांची सोबतीण’ या लेखातली राजकुमारी या भिन्न संस्कृतींत जडणघडण झालेल्या दोन स्त्रियांची आयुष्यं निराळी, या लेखांचे विषय आणि पार्श्वभूमीही निराळी. असं असलं तरी या दोघींमधल्या आईपणात मात्र साम्य आहे. दिव्यांग म्हणून जन्मलेला जॉय मैत्रेयीचं विश्व आहे, तर कर्करोगाने ग्रस्त आणि सहा महिन्यांच्या आयुष्याचीही हमी नसणाऱ्या राजकुमारीची आई होण्याची इच्छा प्रबळ आहे. आईपण अनुभवण्याची या दोघींची ओढ आणि त्यामुळे त्यांची बदलेली आयुष्यं यांबद्दल वाचताना आईपण स्त्रीला किती बदलू शकतं याची जाणीव होते.
जन्माने परदेशी व्यक्तींच्या आयुष्यांभोवतीचे लेख परदेशातील कुटुंबव्यवस्था, नोकरदार स्त्रियांची आयुष्यं, वाढती व्यसनाधीनता, घटस्फोट या आणि अशा महत्वाच्या विषयांवर भाष्य करणारे आहेत. अमेरिकेसारख्या विकसित देशाचं वास्तव हे सामान्य भारतीयाच्या मनातल्या चित्रापेक्षा निराळं आहे, दाहक आहे. आपण भारतीयही हळूहळू त्याच वाटेवर तर चालत नाही ना याचाही विचार करायला लावणारं आहे. ‘लव्ह यू – अॅनी’, ‘चाळीस डॉलर्स’ आणि ‘अमेरिकन लक्ष्या’ हे हलकेफुलके लेख परदेशातल्या व्यक्तींची चांगली बाजू उलगणारे आहेत. या संग्रहातले इतरही लेख वाचनीय आहेत. निराळ्या देशांत जडणघडण झालेल्या मानवी भाव-भावनांचं, त्यांच्या स्वभावांतल्या साम्य आणि फरकांचं वास्तवदर्शी चित्रण करणारा हा लेखसंग्रह आवर्जून वाचा.
The first book I read in a language other than English.
Pretty decent stories, but I found the author a wee bit colourist. Not very unexpected, given he was born in an India of 1938, but quite annoying at times.
परदेशी पुस्तकाचे नाव :- परदेशी लेखक :- रत्नाकर मतकरी पाने :- १५७ शैली :- अनुभव चित्रण
ह्या पुस्तकात लेखकाने परदेशात घडणार्या गोष्टींचे वर्णन केले आहे.
लेखकाने लहान लहान गोष्टींच्या स्वरुपात हे पुस्तक लिहलेले आहे.
ज्यात मराठी माणुस जेव्हा परदेशात जातो, तेव्हा त्यासोबत घडणार्या प्रसंगांचे चित्रण केले आहे. काही प्रसंग परदेशी माणसांचे देखील आहेत. लेखकाने स्वतःचे अनुभव पण ह्या पुस्तकात समावेश केले आहेत.
संपूर्ण गोष्टीतुन लेखक सांगु इच्छितात, की माणुस आपल्या देशातील असो वा परदेशातील, सगळे सारखेच असतात.