प्रकाशकाचे मनोगत मुलांनो, तुमचे आवडते लेखक भा. रा. भागवत यांनी तुम्हाला एक जानी दोस्त दिला- फास्टर फेणे! या फा. फे. च्या एका पाठोपाठ एक अशा वीस पुस्तकांतून तुम्हाला त्याच्याबरोबर हिंडवलं. भागवतांच्या आठवणी म्हणून तुम्हाला या फास्टर फेणेच्या कंपूबद्दल आणि त्यांच्याबद्दल इतरही काही महत्त्वाचं सांगावं असं ‘दै. सकाळ’चे संपादक श्री. अनंत दीक्षित यांना वाटलं. त्यांनी लीलावती भागवत यांना तसं सुचवलं. त्यांनी ‘हो’ म्हटलं आणि मग सुटीच्या पानात रोज एक असे एकूण सतरा लेख तुम्हाला फास्टर फेणेच्या कंपूबद्दल वाचायला मिळाले. आणखी एक लेख ‘सुपर ज्यूनिअर टाइम्स’ यात नंतर आला. पुष्कळशा मुलांनी ‘सकाळ’मधले सगळे लेख वाचले. तसं कळवलं देखील. पण सगळ्याच मुलांना ते क्रमश: किंवा सगळे वाचायल