सिनेजगतात खंबीरपणे पाय रोवून उभे राहण्यासाठी कोणा गॉडफादरची गरज असते, हा प्रचलित समज खोडून काढत तुमच्या-आमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबातील एक मुलगा जिद्द आणि अविश्रांत मेहनतीच्या जोरावर या झगमगाटी दुनियेत नुसते टिकूनच दाखवत नाही, तर सर्व भाषांमधील मिळून सुमारे ५५० चित्रपट, ६० मालिका तसेच ५० व्यावसायिक नाटकांत विविध भूमिका करतो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट अभिनयासाठीचा पुरस्कार मिळवतो... या शिखरावर पोहोचेपर्यंतच्या संघर्षमय जीवनप्रवासाची ही रंजक सफर....
आजच वाचून पूर्ण..... एका मनस्वी, धडपड्या, हरहुन्नरी मराठी कलाकाराची कहाणी वाचताना अक्षरशः हरवून गेलो होतो. मोहन जोशींनी मराठी रंगभूमी,सिनेमे, मालिका, हिंदी सिनेमा, रिअॅलिटी शोज अशी सर्वच क्षेत्र गाजवली. कलाकार होण्याआधी ट्रान्सपोर्ट व्यवसाय करत असलेल्या मोहन सरांनी स्वतः टेंपो चालवणे पण कधी हलके काम समजले नाही आणि त्यांना याचा सार्थ अभिमान वाटतो. पुस्तक त्यांनी खूप मनापासून लिहिलं आहे आणि खूपशा गोष्टी ते अगदी मोकळेपणाने सांगतात त्यात मग त्यांनी केलेल्या चूका पण ते सहज मान्य करतात याचे कौतुक वाटते. त्यांनी अनेक कलाकारांसोबत केलेले काम आणि आणि मोठ्या मोठ्या कलाकारांचे त्यांना आलेले अनुभव हे वाचायला खूप गंमत वाटते. तसेच त्यांनी परिषदेकरिता केलेले उत्स्फूर्त काम आणि दिलेले योगदान स्पृहणीय आहे. कुठलाही कलाकार किंवा माणूस परफेक्ट नसतो परंतु समोर आलेले काम इमानेइतबारे करत राहून पर्फेक्शन च्या दिशेने वाटचाल करत रहायला पाहिजे हि प्रेरणा या पुस्तकातून मला मिळाली
Good thing about this autobiography, is that it doesn't feels like an autobiography. Mohan joshi has explained various interesting events of his life in random order. It contains his childhood memories, theatre work, transport business, his experience with bollywood artists like Amithabh Bachchan, Mithun Da, etc. and his struggle for the betterment of 'Akhil Bharatiya Natya Parishad'. This is really nice book to read specially who loves marathi theatre art. Towards the ending, pace has slowed a bit, more of a tragical incidences; but it ends well on higher note. This book doesnt includes his latest work like 'DeoolBand', 'Pushpak Vimaan' and 'Natasamrat'. Book needs to be revised in 2019. 4.5/5
प्रसिद्ध नट मोहन जोशी यांचं हे आत्मचरित्र. सुरवातीला सांगितलेल्या बालपणीच्या आठवणी, मग कॉलेज आणि प्रेम, मग लग्न - या सगळ्या गोष्टी थोडक्यात सांगितल्यामुळे कुठेही रटाळवाण्या होत नाहीत पण एकूणच त्यांची मध्यमवर्गीय परिस्थिती कळून येते. पुस्तकाचा मुख्य विषय म्हणजे त्यांची व्यावसायिक कारकीर्द, त्यात आलेले विविध अनुभव, भेटलेली विविध माणसे - मराठी तसेच हिंदी कलाक्षेत्रातील, आणि त्यांना नाट्यपरिषदेचा अध्यक्ष म्हणून आलेले अनुभव. त्यामुळे नंतर त्यांची कौटुंबिक किंवा वैयक्तिक माहिती वाचायला मिळत नाही. कलाक्षेत्रातील शिक्षण नं घेता, स्वबळावर आणि प्रचंड कष्टाने त्यांनी या क्षेत्रात जे नाव कमावलं ते खरंच कौतुकास्पद. त्यांचा ट्रान्स्पोर्टच्या व्यवसायाचा अनुभव खूप छान लिहिला आहे, त्यातही त्यांचे प्रचंड कष्ट दिसतात. तसेच मराठी आणि हिंदी नटांचे अनुभव वाचतानाही मजा येते. नाट्यपरिषदेचा भाग जरा कंटाळवाणा होतो, पण त्यातही आपल्याला माहित नसलेल्या बऱ्याच गोष्टी वाचायला मिळतात. क्वचित काही ठिकाणी त्यांचा अव्यवसायिकपणाही दिसून येतो पण तोही त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलेला आहे. काही वेळेस त्यांचं काम कोण्या मान्यवर व्यक्तीला आवडलं नाही तर तेही त्यांनी यात लिहिलं आहे. पुस्तकाच्या शेवटी त्यांच्या पत्नीचं मनोगत दिलेलं आहे, ते नक्कीच वाचण्यासारखं! काही ठिकाणी काही गोष्टींचे व्यवस्थित संदर्भ दिलेले नाहीत. पुस्तकातल्या घटना क्रमाक्रमाने दिलेल्या नसून नाटक, चित्रपट, भावलेले नट, नाट्यपरिषद अशा विविध भागात सांगितल्या आहेत. माझ्यामते त्या क्रमाने लिहिल्या असत्या तर, आणि कामाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातले टप्पेही थोडक्यात अधेमधे सांगितले असते तर पुस्तक जास्त भावलं असतं. त्यामुळेच कदाचित हे आत्मचरित्रापेक्षा अनुभवकथन जास्त वाटतं. क्वचित कधी स्पष्टीकरण देण्यासाठी लिहिलेलं पुस्तक वाटतं. ज्यांनी मोहन जोशी यांचं काम पाहिलं आहे, त्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल. माझ्याकडून या पुस्तकाला 3.5 स्टार्स.
मराठी नाट्य सिनेमा आणि हिंदी सिनेमातील प्रख्यात अभिनेते मोहन जोशी यांचे जयंत बेंद्रे यांनी केलेले शब्दांकित आत्मकथन सुंदरपणे मांडलेले आहे. शेवटाकडे जरासे रेंगाळणारे वाटत असले तरी सुंदर लेखन.
He is one of my most favorite actors on the Marathi stage and in Marathi/ Hindi movies. Very versatile. The book describes his massive work ethic and ability to deliver in unfavorable circumstances. He has been bold and direct while narrating his experience. What I also loved was the loosely organized structure of the book. It's appealing.
Those who loved Marathi stage and Marathi/Hindi movies will connect with this book.
विख्यात अभिनेते मोहन जोशी यांचं हे शब्दांकित आत्मचरित्र त्यांनी ओघवत्या शैलीत मांडलं आहे. त्यांच्या नाट्य, मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील स्ट्रगल आणि अभिनय प्रवासामधील गोड, कटू आणि अविस्मरणीय अनुभव त्यांनी कथित केले आहेत. वाचताना चित्रपट , नाट्य आणि आकाशवाणी संदर्भात खूपशी माहिती मिळते, मराठी नाट्य आणि हिंदी मराठी नाट्यसृष्टीतील बऱ्याचशा कलाकारांबद्दलची न कळलेली माहिती, त्यांचे गुण दोष आपल्यासमोर येतात. पुस्तक वाचनीय आहे. :-किंडल अनलिमिटेड