People who do not write often ask us, how do you write? From where do you get the ideas for writing? Are these ideas taken from all about you or do you create them? If you find them all around you, then how come we do not notice them? I would say that the ideas are all around us. Each idea has the immense potentiality of expressions. But all of them are not converted into any form of literature. Why does this happen? I as an author feel that it is because of the limitation an author has. Not every author has the capacity to metamorphase each and every idea into a beautiful butterfly. Sometimes, some idea invokes some inner strength and automatically the mind fills in with words, phrases, sentences. Some of it takes a form of literature, some of it just does not. I have been a writer since last 50 years. For halfacentury I have been sharing my ideas with you. I am realising that my energy is drawing back these days, One should not accept the boon of youth forever. This collection contains a few of my experiences. They give me utmost pleasure. They will give a me a feeling of fulfilment if you derive pleasure, happiness, moral support, relief or entertainment.
In 1920, Khandekar started working as a school teacher in a small town.He worked in that school until 1938.While working as a teacher,Khandekar produced in his spare time abundant Marathi literature in various forms. In his lifetime, he wrote sixteen novels, six plays, around 250 short stories, 50 allegorical stories, 100 essays, and over 200 critiques.
" ... आश्रमातली मुले इकडे-तिकडे खेळू लागली पण ती निळ्या डोळ्यांची मुलगी त्या खेळणाऱ्या मुलामुलींत मिसळत नव्हती. ती बाळजवळ आली आणि हळूच म्हणाली, ‘‘हे, तू माझा भाऊ ना?’’
"बाळ गोंधळून तिच्याकडे पाहू लागला, तेव्हा मिस्कीलपणाने हसत ती उद्गारली, ‘‘आपण एकमेकांशी भावा-बहिणीप्रमाणे वागू या, असं तूच नाही का आत्ता सांगितलंस!’’
"तिच्या या बोलण्याचे बाळला मोठे कौतुक वाटले. तो हसत म्हणाला, ‘‘बरं झालं, मला बहीण मिळाली आज. भाऊबीजेच्या दिवशी मला फार फार वाईट वाटतं, आपल्याला ओवाळायला कुणी नाही म्हणून. आता दिवाळीत मी आईला सांगेन की, आश्रमात माझी एक बहीण आहे. तिला आपण भाऊबीजेसाठी घरी आणू या.’’"
" ... तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे आईचे ते वाक्य त्याच्या मनाला ठिकठिकाणी टोचत होते. प्रत्येक ठिकाणी त्याला भोके पाडीत होते. ‘गेल्या पंचवीसशे वर्षांत दुसरा बुद्ध झाला नाही आणि पुढल्या पंचवीसशे वर्षांत होणार नाही!’ म्हणजे ती भिकारीण तशीच पंचवीसशे वर्षे भीक मागत राहणार, रमामावशी तशीच पंचवीसशे वर्षे खाली मान घालून महारोगाने झिजत जाणार आणि पुष्पा तशीच पंचवीसशे वर्षे रात्री भिऊन घामाघूम होऊन थरथर कापत अंथरुणावर एकटीच बसणार. हे असेच चालणार, नेहमी असेच चालणार." *****
सूर्यास्त
"सुनिताने नानांकडे पाहिले. त्यांची मुद्रा किती सौम्य दिसत होती आज. एखाद्या बालकासारखी. ते स्वतःशीच हसत असावेत. किती किती दिवसांनी-दिवसांनी कसले, वर्षांनी- नानांच्या मुद्रेवर असा आनंद तिला दिसत होता.
"गोविंदाच्या मुलाला आशीर्वाद देण्याकरिता नानांनी आपला डावा हात वर उचलला. पण लगेच त्यांनी तो मागे घेतला आणि ते म्हणाले, ‘‘अंऽहं, आशीर्वाद उजव्या हातानंच द्यायला हवा. पोरी, माझा उजवा हात जरा उचल बघू.’’" *****
अनाथ
"एका झाडाखाली पत्राळीवर पसरलेले भाकरीचे तुकडे चघळीत बसलेली एक म्हातारी त्याला दिसली. त्याचे डोळे आशाळभूतपणाने त्या पत्रावळीकडे पाहू लागले. त्याचे पाऊल पुढे पडेना.
"खाता-खाता त्या म्हातारीने सहज आजूबाजूला पाहिले. ते पोर तिला दिसले. त्याच्या डोळ्यांत आक्रोश करीत उभी असलेली भूक तिच्या हृदयाला जाणवली. तिने खुणेने त्याला आपल्याकडे बोलावले. धडधडणारे काळीज हातांनी दाबून धरीत तो पुढे गेला. त्याचा हात धरून म्हातारीने त्याला आपल्याजवळ बसविले. त्या पत्रावळीवरला एक घास घेऊन तो तिने त्याच्या तोंडात घातला. काही तरी बोलायची तिची इच्छा होती. पण तिच्या तोंडून शब्दच फुटेना. तिच्या डोळ्यांत पाणी मात्र तरळले. त्या पाण्याचा एक थेंब त्या पोराच्या गालावर पडला.
"आपल्या पोटातला वणवा विझला, आपली सारी तगमग थांबली, जगन्माऊली आपल्याला भेटली असे त्या पोराला वाटले. ते हसू लागले." *****
प्रतिमा
"परमेश्वर कान देऊन ऐकू लागला. इतका वेळ त्याची पाठ पुरविणारे आक्रंदन आता कुठेच ऐकू येत नव्हते. त्याने त्या मुलाकडे निरखून पाहिले. आपली खरीखुरी प्रतिमा आज निर्माण झाली असे वाटून परमेश्वर हसला." *****
मला वी.स. खांडेकर यांच्या कथा आवडतात त्या त्यातल्या रुपकामुळे. सहज सोप्या कथा थेट अर्थ सांगणाऱ्या. जास्तीचा फाफट पसारा न मांडणाऱ्या. मला यातील प्रतिमा कथा सर्वात जास्त आवडली