...विश्वविज्ञान, अणुविज्ञान, क्वांटम मेकॅनिक्स, जिऑलॉजी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा चित्तथरारक, रंजक आणि खिळवून ठेवणारा इतिहास, त्यातले विक्षिप्त आणि विचित्र पण बुद्धिमान संशोधक आणि वैज्ञानिक, त्यांनी लावलेले शोध, त्यांचे संघर्ष आणि त्यांनी मांडलेल्या थिअरीज आपल्याला अवाक करतील. रिलेटिव्हिटी, बिग बँग, ब्लॅक होल पासून डीएनए पर्यंत अनेक थिअरीज आपल्याला सोप्या भाषेत शिकता येतील. सर्वच क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, गृहिणी आणि व्यायसायिक या सगळ्यांनीच वाचावं असं रोमांचकारी पुस्तक!
इतिहासातल्या महत्वाच्या शोधांचा एकमेकांशी असणारा संबंध (जे कधीच शाळा काॅलेजात शिकवल सांगितलं जात नाही) इतक्या सोप्या भाषेत क्वचितच कुठ वाचायला मिळेल. शास्त्रज्ञांची नाव आणि त्यानी लावलेले शोध फक्त सनसनावळ्यांसकट शिकवले जातात पण त्या मागची philosophy माहीत असण खूप महत्वाच. जे इथ वाचायला मिळत. Einstein ची स्पेशल आणि जनरल रिलेटीवीटी इतक्या सोप्या सुंदर शब्दात कधीच वाचली नव्हती.