रिकाम्या घरातले साहस १८९४ च्या वसंत ॠतूत साऱ्या लंडन शहराला गुंग करणारी एक दुर्घटना घडली. त्या महानगरीतल्या उच्चभ्रू समाजाला तर त्यामुळे फारच मोठा धक्का बसला. ती दुर्घटना म्हणजे नामदार रोनाल्ड अॅडेअर या खानदानी तरुणाची फार विलक्षण परिस्थितीत झालेली हत्या. अपराध सिद्ध करणारा इतका भरपूर पुरावा त्या वेळी मिळाला, की साखळीतले काही दुवे जुळवण्याची गरज पडली नाही. तो दडलेला म्हणा किंवा दडपून टाकलेला म्हणा, भाग उघडकीला आणण्याची परवानगी मला आता दहा वर्षानंतर मिळाल्यामुळे मी ही कथा आज सुसंगत स्वरूपात वाचकांना सांगू शकतो आहे. ती संपूर्ण वाचल्यानंतर प्रिय वाचक हो, तुमच्या लक्षात येईल, की हे प्रकरण माझ्या दृष्टीने नुसते बुद्धीला चालना देणारे नव्हते, तर भावना उचंबळवून टाकण&#