पुरुषोत्तम लक्ष्मण [पु. ल.] देशपांडे हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु.ल.देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
P. L. Deshpande was one of the legends in marathi literature. Probably the most read, most quoted and most loved author of maharashtra
The writings though mostly known for its sublime comic nature,include a vast range of plays,caricatures,essays, travelogues and much more
This is a "MUST Read" book! The satire is pleasing, and the humor too is soothing! One can start reading it from anywhere in between. Worth reading! I enjoyed and liked reading this book!
मी आठवीला असताना पुलंचं पहिलं पुस्तक वाचलं आणि there was no going back. लायब्ररीत पुलंची जेवढी पुस्तकं होती ती सगळी घरी आणून त्याचा फडशा पाडला. त्यात हे पुस्तक मात्र नव्हतं. या पुस्तकाबद्दल फारशी चर्चाही होताना दिसत नाही. पुस्तक वाचून झाल्यावर त्याचं कारण मात्र समजत नाही. त्यांच्या इतर सगळ्या पुस्तकांपप्रमाणे हेही तितकेच दर्जेदार आहे.
•
कै विनायक लक्षण भावे यांचे 'महाराष्ट्र सारस्वत' या पुस्तकाचे हे विडंबन आहे. मराठी वांङ्मयाची आठ शतकं या पुस्तकात विस्तारित पद्धतीने अभ्यासली आहेत.महाराष्ट्र सारस्वत आणी गाळीव इतिहास या दोन्ही पुस्तकांची अनुक्रमणिका सारखीच आहे. भावेंचे अभ्यासपूर्ण लेखन आणि पुलंची विडंबन ह्या साहित्यप्रकारावर असलेली पकड या दोन्हीही गोष्टी वाखाणण्यासारख्या! आपल्या मराठीला समृद्ध बनवण्यात दोघांचाही तितकाच हात.
•
पुलंची विडंबनशैली आणि इतकं समृद्ध मूळ पुस्तक यामुळे गाळीव इतिहासाला मात्र बहर आलेला दिसतो. पुलंच्या खुमासदार कोट्या आणि तत्कालीन इतिहासकारांची उडवलेली खिल्ली यामुळे लोटपोट होईपर्यंत हसू येते. या पुस्तकातल्या तळटीपा तर माझ्या विशेष आवडीच्या.
वसंत सरवटे यांनी मुखपृष्ठावर काढलेले व्यंगचित्र आणि एकंदरीतच पुस्तकात काढलेली चित्रं ही अशक्य आहेत. काही काही ठिकाणी तर पुलंएवढंच सरवटेंचं कौतुक करावसं वाटतं!
•
या पुस्तकातला माझा एक आवडता उतारा :
रामदास समर्थ रामनवमीचे दिवशी 'टळटळीत दुपारीं' रामाचा जन्म ज्या वेळी होतो त्या वेळी जन्म घेऊनसुद्धा ह्यांचे नाव रामचंद्र वगैरे ठेवावयाचे काही ह्यांचे तीर्थरूप सूर्याजीपंत ह्यांना सुचले नाही. नारायण हे आपले नाव त्यांना कधीच आवडले नाही. लग्नात नवरीमुलगी उखाण्यात हेच नाव घेणार हे लक्षात येऊन वेळीच सावधान होऊन भर मांडवातून पळाले. पण भर बोहोल्यावरून पळावयाला लागलेल्या नारायणामागून त्याला पकडण्या- साठी धावण्याच्या भानगडीत कोणीही पडले नाही. कारण जांब हाय- स्कूलच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात पळण्याच्या शर्यतीत विद्यार्थी नारायण ठोसर याने सगळी बक्षिसे पटकाविली होती, हे त्यांना ठाऊक होते. ° 'दासबोध' हा समर्थांचा फार प्रसिद्ध ग्रंथ. व्याख्यानाच्या पूर्वतयारीला ह्या ग्रंथासारखा ग्रंथ नाही. 'यत्न तो देव जाणावा', 'सामर्थ्य आहे चळवळीचे', 'धटासी असावे धट' असे खूप तुकडे श्रोत्यांवर फेकण्यासाठी मिळण्याची इथे सोय आहे. ह्या ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इतर लेखक समासाची जागा कोरी सोडतात; दासबोधात समास लिहून इतर जागा कोरी सोडली आहे. म्हणून दासबोधातील समास म्हणजे लिहिलेला भाग. पुष्कळ लोक दासबोध वाचून कोरे राहतात ह्याचे हेही कारण असेल. ° दासबोधातली मूर्खाची इतकी लक्षणं वाचल्यावर, नक्की शहाणा कुणाला म्हणायचं हा प्रश्न पडतो!
Pu La took Potshots at those who were merely considering themselves Marathi Pandits without even studying the books, or those who were considering others low. Its a very good Satire. I liked the logic behind it, and the way Pu La connected the Dots.
तुकाराम, रामदास, नामदेव यांच्या नावावर आणि व्यवसायावर इतके ( शालजोडीत ले) मार्मिक विनोद पू. ल. च करू शकतात 😀...रामदास स्वामींचे hillstation वर वास्तव्य, थोरल्या बाजीरावा चे विसुभाऊ हे नाव, वामन पंडितांच्या शिष्यांकडे यमक जुळवायचे काम, काठी उचला ज्ञानेश्वरा या कल्पना म्हणजे अफाट 😃