Jump to ratings and reviews
Rate this book

हस्ताचा पाऊस / HASTACHA PAUS

Rate this book
At times, I find myself to be too gloomy. All the ideas about new stories remain idle in my mind, resembling an inactive toad sitting on a stone, doing nothing. Somewhere, I do get the feeling that I am carrying many single burdens over my head, and now these all have turned into a huge, heavy load. Writing is the first and foremost thing, other things are secondary. Hence, whatever tries to block the path of writing should be discarded firmly. Yet, at times, it becomes impossible. The reasons are varied. Sometimes, it is lack of competency and at other it is the thought that prevails in mind, suggesting that I myself am spoiling my strengths, for reasons unknown. Deep in my mind, I have never once felt that I have achieved great many things in the capacity of an author. Would it not have better to believe it though? At least, my mind would have been entitled to the solace that an innocent experiences! But then, this is again yet another thought. All of a sudden, my mind bounces off, wants to throw away everything and gush out. God knows, what is going to take place now! कधीकधी मी फार निरुत्साही होतो. खडकावर बेडके बसून राहावीत तशा लेखनकल्पना मनातच राहतात. आपण एक-एक म्हणता अनेक ओझी डोक्यावर घेऊन चालतो आहोत, अशी जाण मध्येच येते. सर्वांत प्रथम लेखन, बाकी सर्व दुय्यम. त्याच्या वाटेत येणारी कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला केली पाहिजे; पण तसे सामर्थ्य नसते आणि आपणच आपल्या शक्ती नासवून टाकतो. असा विचार मनात येतो, लेखक म्हणून आजवर जे मिळवले ते मोठे आहे, असे मला मनोमनी कधी वाटत नाही. तसे वाटले असते, तरी एका परीने बरे होते. भाबड्याला मिळते ती शांतता तरी मिळाली असती.

112 pages, Kindle Edition

Published August 1, 2017

6 people are currently reading
23 people want to read

About the author

Vyankatesh Madgulkar

44 books103 followers
Vyankatesh Digambar Madgulkar (Marathi: व्यंकटेश दिगंबर माडगूळकर) (1927–2001) was one of the most popular Marathi writers of his time. He became well-known mainly for his realistic writings about village life in a part of southern Maharashtra called Maandesh, set in a period of 15 to 20 years before and after India's Independence.

Madgulkar wrote 8 novellas, over 200 short stories, about 40 screenplays, and some folk plays (लोकनाट्य), travelogues, and essays on nature. He translated some English books into Marathi, especially books on wild life, as he was an avid hunter.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
8 (27%)
4 stars
11 (37%)
3 stars
6 (20%)
2 stars
3 (10%)
1 star
1 (3%)
Displaying 1 - 6 of 6 reviews
26 reviews
July 15, 2025
#bookreview
#mybookshelfof2025

पुस्तकाचे नाव - हस्ताचा पाऊस.
पुस्तक प्रकार - कथासंग्रह.
लेखक - व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस.
मूल्य - १७०₹
पृष्ठ संख्या - १०४.

व्यंकटेश माडगूळकर हे मराठी साहित्यातील एक देदीप्यमान व्यक्तिमत्व, ज्यांच्या लेखणीतून ग्रामीण जीवनाचे, तेथील मातीचे आणि माणसांचे वास्तववादी चित्रण वाचकांपुढे साकारले गेले. त्यांच्या विविध कथासंग्रहांपैकी 'हस्ताचा पाऊस' हा एक महत्त्वाचा टप्पा. पहिल्या पावसाच्या सरीप्रमाणेच 'हस्ताचा पाऊस' ही व्यंकटेश माडगूळकरांची साहित्यकृती मनाच्या कोपऱ्यात खोलवर झिरपत जाते. ग्रामीण जीवनाचा उत्कट अनुभव, नातेसंबंधांची गुंतागुंत आणि माणसाच्या भावविश्वाचे बारकावे माडगूळकर आपल्या सहजशैलीत उलगडतात. ही केवळ गोष्टींची माळ नाही, तर ती माणसांच्या अस्तित्वाची एक झुळूक आहे.

'हस्ताचा पाऊस' हा केवळ एक कथासंग्रह नाही, तर तो ग्रामीण जीवनाचा एक आरसा आहे. माडगूळकर आपल्या विशिष्ट शैलीत, साध्या आणि प्रवाही भाषेत, ग्रामीण भागातील लोकांच्या सुख-दुःखाचे, त्यांच्या दैनंदिन संघर्षाचे आणि त्यांच्यातील निर्मळपणाचे दर्शन घडवतात.  इथे निसर्ग आहे, नात्यातला रस आहे, आणि शब्दांमधून उमटणारी एक विलक्षण शांतता आहे. या कथा केवळ मनोरंजक नाहीत, तर त्या विचारप्रवर्तकही आहेत. त्या ग्रामीण भागातील गरिबी, निरक्षरता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेवरही प्रकाश टाकतात. आणि कथेतील प्रत्येक पात्र म्हणजे आपल्याला गावच्या एखाद्या वळणावर भेटलेली ओळखीची व्यक्ती. कुठे मायेनं भरलेली आई दिसते, कुठे एका जुन्या विहिरीकाठी बसलेला एकटाच बाबा, तर कुठे असतो एक चिवट, संघर्षशील शेतकरी.

माडगूळकरांची भाषाशैली हे ह्या पुस्तकाचे अजून एक बलस्थान. त्यांची भाषा ही ग्रामीण बोलीभाषेशी जवळीक साधणारी, पण तरीही साहित्यिक दर्जा कायम ठेवणारी आहे. त्यांच्या वर्णनात एक प्रकारची सहजता आणि ओघ आहे, ज्यामुळे वाचक कथेशी एकरूप होतो. ग्रामीण भागातील वाक्प्रचार, म्हणी आणि शब्दप्रयोग यांचा ते खुबीने वापर करतात, ज्यामुळे कथेला अधिक प्रामाणिकता आणि रंगत येते.

शेवटी, हस्ताचा पाऊस म्हणजे एक अनुभूती आहे. असा शब्दांमधून उमटलेला हळुवार पाऊस तुम्ही ही अनुभववा हेच सांगेन.

- ©®गायत्री😇
Profile Image for Geetanjali.
87 reviews6 followers
November 12, 2018
छान आहे पुस्तक. प्रत्येक गोष्टीतलं चित्रण माडगूळकरांनी छान उभारलंय!👌🏻 गोष्टींचा शेवट आवडो वा नावडो माडगूळकर तुम्हाला गोष्टीतल्या पात्रांच्या जगात नेतातच आणि तुम्हाला त्या पात्रांशी एकरुप करतात.🤘🏻
2,142 reviews28 followers
January 25, 2022
It's the second collection of stories of the author, after his Mandeshi Manse, as he tells in his introduction that's titled after his early memories - an introduction so beautiful, it's a shock to go on to reading the stories, somewhat comparable, weirdly, to leaving cool of an ocean and stepping on a burning shore, weirdly because normally it's the other way round; it's normally reality that's earth underfoot and literature that's infinite ocean one escapes into, to find some cool.


"सुरुवातीच्या आठवणी"

"मी दहा-अकरा वर्षांचा होतो. दादांची बदली किन्हई गावी झाली. सुंदर गाव होते. गावाच्या मधून वांगना नदी वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांनी गर्द झाडी होती, दगडी बांधणीची शांत देवळे होती. गावाच्या जवळ डोंगर होता, गावासभोवार फळाफुलांच्या गर्द बागा होत्या. या किन्हई गावात मंदिरे तरी किती होती! प्रशस्त, शांत असे राममंदिर होते. डोंगरावर यमाई देवीचे मंदिर होते.

"मी किन्हईला घालविलेल्या दिवसांना बसरा जातीच्या गुलाबाचा सुगंध आहे. सनईचौघड्याच्या संगीताने पहाटे जाग येई. सर्वत्र थंड धुके पसरलेले असे. दवाने पाय ओले करीत नदी ओलांडून पलीकडे असलेल्या बागेत जावे; निशिगंधाची, गुलाबाची, जास्वंदीची लख्ख उमललेली फुले पाहताच स्वत:च उमलायला होई!

"नवरात्र उत्सवात मोठमोठे कीर्तनकार येत. रामाच्या प्रशस्त सभामंडपात कीर्तन उभे राही. गावातील प्रतिष्ठित स्त्रीपुरुष तांबड्या जाजमाच्या बैठकीवर बसून भक्तिभावाने कीर्तनश्रवण करीत. वहिवाटदाराचा मुलगा असल्यामुळे मला पुढे जागा मिळे. नक्षीदार दगडी खांबाला लागून घातलेल्या मऊ सफेद गादीवर बसून लोडाला टेकल्या टेकल्या मी कीर्तन ऐकत असे.

"हे कीर्तनकार मोठे कसबी लोक असत. महाभारतातील, रामायणातील, पुराणातील कथाभाग ते असा रंगवून सांगत की, भान हरपून जाई. घटकेत डोळ्यांतून पाणी येई. घटकेत हसू येई. जेवणाच्या पंगतीचे वर्णन करणारा कटाव चालू झाला की, रात्री बारा वाजता भूक लागे. युद्धाचे वर्णन सुरू झाले की, बसून ऐकण्याऐवजी उठून उभेच राहावे वाटे.

"देवळात उभे असलेले संगमरवरी राम, सीता, लक्ष्मण, हनुमान या सर्वांना हे कीर्तनकार हलतीबोलती माणसे करून टाकत. त्या देवांचे बोलणे ऐकता येई. त्यांच्या वस्त्रांची सळसळ ऐकू येई, रंग दिसे. अयोध्येतील उंच उंच गोपुरे दिसत. हनुमानाचा बुभु:कार कानावर पडे. अंगावर कसा काटा उभा राही!

"किन्हईच्या प्रचंड राजवाड्यात राहायला जाण्याअगोदर रामाच्या देवळानजिकच्या एका घरात आम्ही भाड्याने राहत होतो. या घरचा मालक परगावी होता. त्याने आपल्या घराच्या माळ्यावर एक भलेमोठे खोके बंद करून ठेवलेले होते. या घरात राहायला गेल्यागेल्या खटपट करून मी माळ्यावर चढलो, पण खोके पक्के बंद केलेले होते.

"रात्री जेवताना हा शोध मी आईदादांना सांगितला. तत्काळ दादांना वाटले की, हे पोर खोके फोडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी करारी आवाजात बजावले, “हां, माळ्यावर मुळीच जायचं नाही. मालकाच्या कुठल्याही वस्तूला हात लावायचा नाही. लावलास, तर मार मिळेल पडोस्तवर!”

"चार-पाच दिवस मी कसेबसे घालवले. मग मात्र वडिलांची आज्ञा पाळणे अशक्य झाले. खोके डोक्यातून जाईना. शेवटी, मार खावा लागला तरी बेहत्तर आहे, पण खोके फोडून आत काय आहे हे बघायचेच, असा निश्चय करून मी माळ्यावर गेलो. उलथन्याने खिळे उचकटून खोक्याच्या लाकडी पट्ट्या काढल्या. एक फळी काढली. घम्मकन पुस्तकांचा वास आला."
................................................................................................


"दादांचे निवेदन फार परिणामकारक असे. बारीकसारीक तपशील भरून, आवाजात चढउतार करून, मध्येच गप्प राहून ते गोष्ट फार चांगली सांगत. उत्सुकता शिगेला जाई. काळ्या रानातून, चिखलातून, पावसातून आपणही चाललो आहोत आणि एकाएकी कुणी अनोळखी माणूस मागून येतो आहे, असे वाटे. पावले ऐकू येत."

"किन्हईचे कीर्तनकार, राखणदार बळी रामोशी, दादा-आई, रामा आणि बरोबरीची पोरे या सर्वांनी गोष्ट कशी सांगावी हे मला सांगितले."
................................................................................................


"जुन्या वाड्यात एकदा मी गेलो आणि सांगलीचा तुरुंग फोडून पळून आलेले पाचसहा राजबंदी तिथे राहिले होते, याचा पत्ता मला लागला. हे लोक मुळीच बाहेर पडत नसत. चालकांकडून मला कळले की, ते फार महत्त्वाचे कार्यकर्ते होते. हळूहळू परिचय झाला आणि एके दिवशी त्यातील प्रमुखाने मला आपल्या पलायनाची हकिकत सांगून म्हटले, “अशी गोष्ट लिहिशील का?”

"गोष्ट ऐकून मी शहारून गेलो होतो. “हो. उद्या लिहूनच आणतो.”

:मी लिहिलेली गोष्ट – सत्यकथाच – ह्या भूमिगतांना फार पसंत पडली. त्यांनी ती कुठेतरी पाठवून दिली. तिच्या हजारो प्रती निघाल्या. सर्वत्र वाटल्या गेल्या. चालक मला म्हणाले, “तू लिहिलंस ते ���ण्णांना फार आवडलं.”

"मी विचारले, “अण्णा कोण?”

"“आमचे म्होरके! मोठे कार्यकर्ते आहेत.”

"“मग माझा काही उपयोग होईल का? मी तुम्ही सा��गाल ते लिहीन.”

"“या लोकांच्याबरोबर जाशील का?”

"“हो.” आणि खरोखरीच एके दिवशी मी सगळे सोडून त्या लोकांबरोबर निघून गेलोही. लिहिले काही नाही. तीन वर्षे भटकण्यात गेली. कुठे कुठे हिंडलो, कुठे कुठे राहिलो. नाना प्रसंग, नाना माणसे पाहिली."

"माडगूळ सोडून आमचे कुटुंब आता आटपाडीला आले होते. इथे कोष्टे गल्लीतील एक जुनाट खोली भाड्याने घेऊन मी मित्रांची तैलचित्रे काढली. मैलाचे धोंडे रंगविण्याचे काम केले (रामा मैलकुली तेव्हाच भेटला.). हॉटेलच्या पाट्या रंगवल्या. प्राथमिक शाळेत शिक्षकाची नोकरी केली. (तिथे ‘झेल्या’ भेटला.) कविता केल्या. लेखगोष्टी लिहिल्या; पण धड काहीच जमले नाही. फार कंटाळलो. माझे मन कशातच रमेना; तरीपण चव शाबूत होती हे बरे!

"किर्लोस्करवाडीला जाऊन काही महिने चित्रकाराची नोकरी केली, तीही जमली नाही. एक रुपया रोजावर होतो. इतर कामगारांच्या घोळक्यातून जाऊन बिल्ला वगैरे द्यावा लागे. त्या गर्दीत एकदा कुंडलच्या एका ओळखीच्या कामगाराची गाठ पडली आणि माझ्याकडे पाहताच, गर्दीतच तो म्हणाला, “अरेरे, तू रे कशाला आलास इथं!”"
................................................................................................


"बडोद्याला निघणारे ‘अभिरुचि’ मासिक तेव्हा फार नावाजलेले होते. पु. ल. देशपांडे, मं. वि. राजाध्यक्ष, गंगाधर गाडगीळ, गो. रा. दोडके, गो. के. भट, ना. गो. कालेलकर ही मातब्बर मंडळी ‘अभिरुचि’त लिहीत. ‘अभिरुचि’चा प्रत्येक नवा अंक म्हणजे मला एक चमत्कार वाटे. इतर मासिकांत कविता हा प्रकार कुठेतरी गद्याच्या वळचणीला अंग चोरून उभा असे. कविता जाहिरातीसारख्या इथेतिथे छापल्या जात. अगदी सुरुवातीलाच, पहिल्या पानापासून घोळक्याने कविता छापण्याची धिटाई ‘अभिरुचि’ने प्रथम दाखविली. ना. घ. देशपांडे, अनिल, भा. रा. लोवलेकर, वसंतराव चिंधडे, बा. सी. मर्ढेकर यांच्या सुंदर सुंदर कविता ‘अभिरुचि’त येत. नुसत्या सुंदर कविताच नाही, तर गद्यही. कुसुमावतीबार्इंचे ‘नदीकिनारी’ हे शब्दचित्र, कुसुमाग्रजांची ‘वासुदेव’ ही गोष्ट, गो. रा. दोडके यांचा ‘नाटक’ हा लघुनिबंध वाचून मी किती हरखलो होतो. अशा उत्तम मासिकात आपली गोष्ट यावी असे मला वाटले आणि एकदा धीट मनाने मी ‘काळ्या तोंडाची’ ही कथा ‘अभिरुचि’कडे पाठवून दिली. मला वाटते, पंचेचाळीस किंवा सेहेचाळीस साल असावे. ही गोष्ट मी माडगूळला असताना लिहिली होती.

"आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही माझी गोष्ट ‘अभिरुचि’ने स्वीकारली. पहिल्या पानावर ती छापली. या कथेचे खूप कौतुक झाले.

"त्यानंतर मला दुसरा धक्का दिला तो ‘नवयुग’च्या संपादकांनी. ‘आपली एक कथा ‘नवयुग’ दिवाळी अंकासाठी पाठवा’ असे चक्क प्र. के. अत्रे यांच्या सहीचेच पत्र मला आले. ‘वडरवाडीच्या वस्तीत’ ही कथा लगेच मी पाठवून दिली.

"दिवाळी अंकात आलेली ही माझी पहिलीच कथा! या कथेचे मानधन म्हणून पंचवीस रुपयांची मनिऑर्डर जेव्हा आली तेव्हा मला वाटले, आता मात्र आपण लेखक झालो."

"पुण्याला आलो, पण लिहीत होतो ‘अभिरुचि’साठी, ‘मौजे’साठी, ‘सत्यकथे’साठी. पुण्याचे संपादक माहीत नव्हते. साहित्यिक माहीत नव्हते. कुणाकडे मी गेलो-आलोही नाही. सभा, संमेलने, चर्चा यांविषयी उत्सुकता, अगत्य कधीच वाटले नाही.

"अठ्ठेचाळीस साली, मी पुण्यात असतानाच ‘अभिरुचि’ कथास्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. गंगाधर गाडगीळांची ‘कडू आणि गोड’ आणि माझी ‘देवा सटवा महार’ या कथांना हे पारितोषिक विभागून मिळाले होते. हा निकाल वाचून मी चकित झालो. आपल्याला पारितोषिक मिळेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. आजवर मला अनपेक्षित अशी बरीच पारितोषिके मिळाली आहेत, पण ‘अभिरुचि’च्या पारितोषिकाने झाला तसा आणि तेवढा आनंद पुन्हा कधी झाला नाही."

"मुंबईला गेल्यावर मी फार एकटा पडलो. एकदम विश्वरूपदर्शन घडल्यासारखे झाले. बावरून, गोंधळून गेलो. मनाला मरगळ आली. काहीही न करता निवांत झोपून राहावे असेच काही महिने गेले. श्री. पु. भागवत आणि ग. रा. कामत यांच्या खोलीवरच काही महिने मी राहत होतो. रोज उठून कामत म्हणे, “व्यंकटेश, काही लिही.”

"मी केवळ हूं म्हणे.

"मग मी माणदेशी माणसांपैकी ‘धर्मा रामोशी’ आणि ‘शिवा माळी’ ही दोन शब्दचित्रे लिहिली. कामताला दाखवून म्हणालो, “ ‘सत्यकथे’त छापून टाक.”

"ती वाचून तो म्हणाला, “ही चित्रे सुटी छापून उपयोग नाही. सिरीज लिही.”

"मग टेबलाच्या खणात ही दोन्ही शब्दचित्रे टाकून मी स्वस्थ राहिलो. बरेच दिवस ती खणातच होती.

"एकदा श्री. पु. भागवतांनी ती पाहिली. चकित होऊन ते मला म्हणाले, “हे छानच आहे. ‘मौजे’तून क्रमश: प्रसिद्ध करू. दलालांची चित्रं टाकू. आता थांबू नका.”

"“पण कुठे लिहू? जागासुद्धा नाही बसायला.”

“ ‘मौजे’च्या कचेरीत रोज येऊन बसा. तिथं सगळं मिळेल. कागद-पेन्सिल, टेबल, फॅन. वाटेल तेव्हा येऊन बसा आणि लिहा.”

"एवढे म्हणून त्यांनी लगोलग ‘मौजे’तून जाहिरातही केली. पहिली दोन चित्रे छापूनही टाकली. मग मात्र आठवड्याला एक ‘माणदेशी माणूस’ मी लिहू लागलो."

"पुढे काही आठवड्यांनीच मला गं. दे. खानोलकरांचे पत्र आले. ‘रविवार’ नावाचे एक नवे साप्ताहिक ढवळे प्रकाशनतर्फे निघणार होते, त्याच्या ललित विभागाचे संपादन मी करावे. वा.ल. कुळकर्णी यांनी सांगितल्यावरून मी हे पत्र लिहीत आहे, असा मजकूर पत्रात होता.

"मी तत्काळ नोकरीवर रुजू झालो.

"शीवला असलेल्या ‘रविवार’ कचेरीत फार घाम येई. मला नको नको होऊन जाई. काम करणे, म्हणजे काही मजकूर लिहिणे अशक्यच. मजकुराऐवजी समोरच्याच कागदावर निढळावरचा घामच ठिबके. घामाचे थेंब कागदावर पडत. मग मी वैतागून खालच्या मजल्यावर चित्रकार गोडसे यांच्या खोलीत जाऊन बसे. माझ्या बसण्याबोलण्यामुळे त्यांच्या कामात काही व्यत्यय येईल, असे मला कधी वाटले नाही. गोडसे चित्र काढीत आणि माझ्याशी बोलतही. मी बघत असे, बोलत असे. घामाचा त्रास होत नसे. माझ्या अशा वागणुकीमुळे ‘रविवार’चे संपादक खानोलकर यांना वाटले असावे की, हा माणूस कामसू नाही, ह्याचा फारसा उपयोग होणार नाही. काढून टाकावा.

"पण, मग मीच नोकरी सोडून दिली. फार तर तीन महिने राहिलो असेन."

"एकदा ‘अभिरुचि’चे मुखपृष्ठ केलेले दाखवून गोडसे म्हणाले, “ही काय कल्पना आहे सांगा बघू?”

"एका ओबडधोबड पाषाणाला पंख फुटले आहेत, असे चित्र होते. मला काही सांगता आले नाही. आपण उणे आहोत असा चेहरा झाला.

"गोडसे हसले. त्यांचे हसू फार छान असे. अर्थपूर्ण असे; पण नेमका अर्थ मात्र कळत नसे.

"गाडगीळ, भावे, रेगे, गोडसे यांचा सहवास अधूनमधून मिळे, एरवी रोज भेटणारे कामतच.

"सत्यकथेचे संपादक ग. रा. कामत मला वरचेवर जेवायला घेऊन जात. दादरला एक लंच होम होते. तिथे केव्हाही लंचच मिळे. कामतांना मोहरी या वस्तूबद्दल तिटकारा होता. जेवताना पहिल्यांदा भाजी-आमटीतील एकएक मोहरी ते साक्षेपाने बाजूला काढीत. त्यामुळे तासभर लागे आणि तेवढ्यात बरेच बोलून होई.

"घरी धुतलेला कुडता आणि आखूड धोतर असा त्यांचा साधा वेष असे; आणि तरीही ते पुष्कळ पुस्तके विकत घेऊन वाचीत. त्यांचे पाहून मी ठाम ठरवून टाकले की, साधे कपडे वापरून पुस्तके विकत घ्यावी.

"चित्रपटकथेचा मोबदला म्हणून मला एकवार एक हजार रुपयांचा चेक मिळाला. यापूर्वी रेडिओकडून मिळणारे पाचपंचवीस रुपयांचे चेक बँकेऐवजी मी कामतांकडे वटवीत असे. हा चेक आल्याचे सांगताच त्यांनी मला गंभीरपणाने सांगितले, “आता माझ्याबरोबर चल. आपण बँकेत खाते उघडू. असल्या चेकचे पैसे मला देता येणार नाहीत.”

"ह्या संपादकांनी मला खाते उघडून दिले. लेखकाच्या सुरुवातीच्या काळात त्याला उत्तम संपादक भेटणे एकूण बरे असते. आपले

"पुस्तक प्रस���द्ध व्हावे यासाठी फार धडपड मला कधी करावी लागली नाही. थोड्याफार कथा लिहून होताच मी ‘अभिरुचि’च्या चित्र्यांना पत्र टाकून दिले की, संग्रहापुरत्या कथा आहेत. तुम्ही संग्रह काढावा अशी इच्छा आहे. लगेच उत्तर आले, कथा पाठवून द्या. पैसे किती हवेत तेही कळवा. ही भाषा झाली एकोणपन्नास साली. संग्रह बाजारात यायला एकावन्न साल उजाडले. ‘हस्ताचा पाऊस’ हा संग्रह प्रसिद्ध झाला."


१. देवा सटवा महार

"मध्यंतरी देवा सटवा महार, राहणार मौजे तडवळे यास संस्थानी पोलिसांनी पकडून नेले आहे. डॉक्टरने त्याच्यावर केलेली फौजदारी न्यायासनाने मानली आहे. देवा तुरुंगात आहे.

"राणी मोलमजुरी करून पोरेबाळे जगवते आहे. तराळकी दुसऱ्या महाराकडे गेली आहे. तडवळे गाव व्यवस्थित नांदते आहे.

"–आणि दक्षिणी संस्थानातील लहानशा संस्थानात तडवळे नावाचे आठ-नऊशे लोकवस्तीचे लहान खेडे आहे. तिथल्या देवा सटवा महार या सज्जन महाराचे काय झाले याची बिलकूल माहिती नामदार बाबासाहेब आंबेडकर यांना नाही आणि ती कधी होईल याचाही संभव नाही!"


२. वडरवाडीच्या वस्तीत

"मध्यरात्रीच्या सुमाराला कुत्र्यांनी एकदम गिल्ला केला. दचकून उठून लक्षीने कानोसा घेतला. बाहेर मेंढरे धडपडत होती. कसायाकडे नेत असल्यासारखा हऱ्या ओरडत होता. पदर सावरून ती बाहेर आली. चांदण्याच्या अंधूक प्रकाशात तिने चौकस नजर फिरवली. कुडाच्या आतले मेंढरू ओढण्यासाठी बाहेरून लांडगा धडपडत होता. पुरुषभर उंचीच्या काटेरी कुडावरून किरण मारून-मारून दमल्यावर मुसंड्या मारून आत घुसण्याचा प्रयत्न त्याने चालवला होता. विजेच्या चपळाईने जाऊन लक्षीने कुडातून आत आलेले त्याचे दोन पंजे घट्ट पकडले. भुकेने वखवखलेले रानजनावर मागल्या दोन पायाने उसळ्या मारू लागले, पण कुडाला दोन पायाची अटण लावून ओढून धरलेले त्याचे पंजे सुटले नाहीत. गुरगुरत, दात विचकत त्याने अंगातील बळाने धडपड केली. कुडाच्या काटक्या दाताने कडाकडा फोडल्या; पण हाताची पकड ढिली न करता लक्षीने मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. तरणीबांड वडरे निशेतून भानावर आली आणि कोपऱ्यातल्या काठ्या हाती घेऊन बाहेर धावली. चुड्या, कंदील पेटले आणि उजेडात एका पोरीने जिता लांडगा धरलेला बघून सारी वडरवाडी आश्चर्यचकित झाली."

" ... माजल्या रेड्यासारखा काळ्या पिऊन तर्र झाला म्हणजे घरी येऊन तिला हमेशा लाथा घाली. तिच्या हंबरड्याने हऱ्याची परड्यात तडफड होई. कैक वेळी काळ्याने फेकून मारलेल्या वस्तूने लक्षी रक्तबंबाळ होई आणि गुरासारखी ओरडे. नाहीतर काय करील? जिवंत लांडगा पकडणारी पहाडासारखी लक्षी काळ्या आल्यापासून वाळल्या चिपाडासारखी झाली होती. तिची मस्ती, तिची रग कुठल्याकुठे मावळली होती. पिसाळलेल्या लावेसारखी लक्षी आता अल्लाच्या गाईसारखी झाली होती. आता ती पूर्वीप्रमाणे हऱ्याकडे लक्ष देऊ लागली होती. रानात गेले म्हणजे ढाळा सोडून हऱ्या लक्षीपाशी जाई आणि लाडिकपणाने तिला ढुश्या मारी. त्याच्या काळ्याकरंद लोकरीत बोटे खुपसून लक्षी त्याला जवळ ओढी. त्याच्या पाठीवर डोके टेकी, ढळाढळा रडे आणि म्हणे, “हऱ्या, आबा हुता तवा कुनाची पाच बोटं लावून घितली न्हाईत अंगाला अन् आता ह्यो ‘परवीस’ रोज गुरासारखा मारतोय. कसं रं माझं कपाळ! कवा रं जायाचा ह्या वनवास?”"

"जिता लांडगा पकडल्याली लक्षी आणि माणसाला ठार मारणारा हऱ्या हल्ली सुखाने नांदत आहेत वडरवाडीच्या वस्तीत. ... "


३. पडकं खोपटं

"राव्या आणि भाव्याच्या कर्तुकीची बातमी साताऱ्यातील कानाकोपऱ्यात पोहोचली. ऐन जवानीत या दोघांनी असा धुमाकूळ, असा हमामा घातला की, जिल्ह्यातल्या सावकारांच्या झोपा कायमच्या उडाल्या आणि फौजदार-जमादारांना आठ-आठ महिने बायकापोरांची तोंडे बघायला सवड सापडली नाही. राव्या-भाव्याच्या मागावर जंगले हुसकत आणि डोंगर वेंघत फिरता-फिरता शिपाई मेटाकुटी आले. आज अमुक ठिकाणी दहा हजारांवर हात मारून राव्या-भाव्या पळाले, तर उद्या तपासाला आलेल्या अमुक फौजदाराच्या घोड्याचे कान कापून घेऊन राव्या-भाव्या नाहीसे झाले. आज ‘सुकाचारीच्या डोंगरा’त, तर उद्या ‘सुर्लीच्या घाटा’त वाऱ्याच्या चपळाईने, वाघाच्या छातीने राव्या-भाव्याचा संचार सातारा जिल्ह्यात चालू होता. त्यांच्या टोळीत किती जवान होते याचा कुणाला अंदाज नव्हता. त्यांचा ठावठिकाणा किती ठिकाणी होता, याचा कुणाला पत्ता नव्हता; पण साऱ्यांचे राव्या-भाव्याच्या धाडसाबद्दल मात्र एकमत होते. “गुलाम छातीचे खरे! एवढे अंमलदार जंजर तोडतायत, पण हाती लागायचं नाव नाही! अहो, चक्क दिवसाउजेडी हलग्या वाजवत येतात गावात आणि घालतो म्हणून घालतात डाका!” असे कौतुकाचेच शब्द कुठेही ऐकू येत! भाव्या मांग मण सव्वा मण वाळूचे पोते पाठीशी टाकून या गावचे त्या गावाला नेईल अशा ताकदीचा गडी! हा म्होरक्या होता. आणि त्याचाच थोरला भाऊ राव्या हा टोळीचा कारभारी. सारी मिळेल ती चीजवस्तू भाव्या हरघडी त्याच्या स्वाधीन करी. ती टोळीतील इतर लोकांना शिस्तवार वाटून द्यायचे काम त्याच्याकडेच. या दोघा भावाभावांखेरीज तिसरा मांग त्या टोळीत नव्हता. कारण भाव्याचे धोरणच तसे होते. तो म्हणे, मांगाची जात उलटी, दगलबाज. आम्ही दोघे एका रक्ताचे म्हणून वागू नीट, पण तिसरा मांग टोळीत आला की, तो दगा दिल्याखेरीज राहणार नाही. म्हणून त्याने बेरड, कैकाडी यांचा भरणा टोळीत केला होता. या दोघा भावाभावातही थोरला राव्या हाडापेराने थोराड, पण उगीच मिलमिश्या स्वभावाचा होता. तो हाडाने दरवडेखोर नव्हताच. भावाच्या मागोमाग राहूनच त्याचे नाव पुढे आले होते आणि राव्या आणि भाव्या ही जोडी प्रसिद्ध झाली, पण थोरल्या भावाचा मानमरातब भाव्याने हरघडी राखला. कधी ‘अरंतुरं’ केलं नाही. हिडिसफिडिस केलं नाही. टोळीतल्या एखाद्याने उलटा जबाब दिला, तर भाव्या जातीने त्याचे पारिपत्य करी. त्यामुळे टोळीतही राव्याचा चांगला दबदबा होता.

"वयाच्या तिशी-चाळिशीपर्यंत त्यांचा हा उद्योग चालला होता. त्यात ते सापडले, सुटले. कधी शिक्षा भोगून सुटले, तर कधी पळून आले. मामुली वर्षा-दोन वर्षांची शिक्षा झाली, तर ती भोगून सुटायचे. लांब मुदतीची झाली, तर हर प्रयत्नाने पळून यायचे. हा त्यांचा शिरस्ता. प्राण गेला तरी बेहत्तर, पण मुद्देमाल दाखवायचा नाही आणि साक्षीदारांची नावे सांगायची नाहीत, हा त्यांचा निर्धार! त्यामुळे त्यांना धरून गुन्हा शाबीत करणेही पोलिसांना जिकिरीचे जाई."


४. काळ्या तोंडाची

The author proves his love for animals by writing a love story of a dog, entwined with a tale of superstition and disaster that are left to the readers to interpret.


५. एकटा

Another tale testimony to author's love of creatures wild and tame, which raises a doubt as one finishes it - is this one about humanity in more than one way, hidden in its being written about other creatures?


६. पोकळी


"माधव पिशवी आणि छत्री घेऊन बाहेर पडला आणि नेहमीप्रमाणे त्याला आपण आईशी तुसडेपणाने बोललो याचा पश्चात्ताप झाला, पण तो तिच्यापाशी व्यक्त कसा करावा हे त्याला कळले नाही."

Author writes about affairs of a young man, without the romantic mist to give it beauty - and what remains with the reader is the old mother ignored by the young man, even as he takes her serving him for granted.

"“माधव, रागावलास का माझ्यावर जेवायला उशीर झाला म्हणून? होत नाही रे आता माझ्या म्हातारीच्यानं. सांधे ठणकतात, हातपाय भरून येतात.”

"आणि आपला जीर्ण खडबडीत हात तिने माधवच्या तोंडावरून, पाठीवरून फिरवला."


७. वसाण

This story has an air of being closely associated with first parts of a Satyajit Ray film, specifically Jana-Aranya. Except, here it's the dispirited pessimism that one's led to expect in a great deal of Bengali literature and films, while Ray portrayed fall of the hero attempting to make his way. Does one detect leftism there? Was it even hidden much? No, just not labeled as such.


८. विपरीत घडले नाही!

"बहिणा देवाचे झाड होती. तिचे देवाशी लग्न लागले होते. कट्यारीशी झुलवा लागला होता. देवाशी लग्न लागल्यावरसुद्धा कुणा एखाद्याशी झुलवा लावून राहता येते. जोगतिणीला तशी मोकळीक असते, पण बहिणाने तसे केले नव्हते. आजपर्यंत ती एकटी राहिली होती. ‘कोरे सणंग’ म्हणून राहिली होती, पण विठ्ठलला पाहून ती विरघळली. गोरापान, तारुण्याने मुसमुसणारा विठ्ठल तिच्या मनात भरला. तिला पाठ असलेल्या साऱ्या शृंगारिक लावण्यातला नायक तिच्या डोळ्यांसमोर बसला होता आणि नायिका त्याला आळवत होती –"


९. हस्ताचा पाऊस

"अंगणातला निंब मान वाकवून पावसाचा मारा घेत उभा होता. सारवलेल्या अंगणात गुढगागुढगा पाणी साचले होते. पन्हाळीतून पिंढरीएवढे मुसांडे सुटले होते.

"त्या काळ्या अंधाराकडे बघत, एकमेकांना खेटून दोन गाढवे उभी होती.

"हस्ताचा पाऊस वेड्यासारखा कोसळतच होता!"


१०. मायलेकराचा मळा!

" ... स्वयंपाकघरात चुलीला पेटत घालणाऱ्या रंगुआजीच्या पोटात कालवून येई. ती बाहेर येई आणि भरल्या आवाजात म्हणे, “बाजी, माझ्या लेकरा, राहू दे. मी टाकते सडा!”

"“अगं आई, आता या वयात होतंय का तुला हे झाडलोट, सडापाणी? आणि मी केलं म्हणून बिघडतंय कुठं? म्हातारपणी एवढं तरी सुख देऊ दे मला माझ्या आईला!”

"यावर म्हातारी काही न बोलता आत जाई आणि पसा-दोन पसे पाणी डोळ्यांतून काढी."


११. असंच...


" ... लेकराच्या पोटात घालायला कोरभर भाकरीसुद्धा नाही या जाणिवेने ती कष्टी झाली. अंधार होता. रात्र झाली होती. पाऊस कोसळत होता. कुठे बाहेर जायला येत नव्हते आणि बाहेर तरी कोण देणार होते? उपाशी मरणारी ती काय एकटीच होती? सारा महारवाडा, मांगवाडा, व्हरलवाडा हातावर पोट असलेले सारेच गोरगरीब पालापाचोळा खाऊन जगत होते.

"“लई भुका लागल्यात्या. कायसुदीक न्हाई का गं?”

"“न्हाई रं सोन्या. बग तुज्या हातानं. मी का लबाड बोलतिया?”"


१२. त्याची गाय व्याली

" ... लिंब हे खिलारी गाईबैलांविषयी प्रसिद्ध असलेले गाव! लिंबाची गाय वा खोंड ही उत्कृष्ट प्रतीची जनावरे असतात. केवळ एका गाईच्या वेतावर आणि दुभत्यावर ....
Profile Image for Aditya Sathe.
Author 3 books8 followers
March 11, 2017
if you want to peak in the era of 1940 - 50s, pick his work and start reading from any pages. i am sure you will have device which will place you in typical village of maharashtra which is flourishing in its own way, or may not be so happy at the same time. He just holds your hand and takes you on the tour of those time... amazing short stories.
Profile Image for Pushkar Deshmukh.
131 reviews5 followers
April 20, 2017
About rains, nature, cows and bear, poverty, caste system and obviously village people .... This one too, was read in the Jungle, under Mango tree, just to have that old times feel :)
Displaying 1 - 6 of 6 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.