श्री ना पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१3 मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या. श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.
कालच तुंबाडचे खोत वाचून संपवली आणि कादंबरीचा शेवट खरच तुम्हाला बधिर करतो . म्हणूनच दुसऱ्या दिवशी कादंबरी बद्दल मला काय वाटले ते लिहीत आहे .
तुंबाडचे खोत असा अनुभव आहे जो प्रत्येक मराठी पुस्तक रसिकाने घेतलाच पाहिजे . कादंबरी जवळ जवळ ५० पाने उलटल्यावर तुमचा ठाव घेते आणि त्याच्या नंतर पुस्तक सोडवत नाही.
पुस्तकात चार पिडयांचा इतिहास दिला आहे. पण प्रत्येक पिढी विलक्षण आहे. त्याच्या बरोबर पुस्तकात जी तुंबाड बद्दल निरीक्षणे दिली आहेत त्यानी तुम्हाला प्रत्येक्ष तुंबाड मध्ये असल्या सारखे वाटते.
पहिल्या पिढी मध्ये लक्षात राहतात ते म्हणजे
१. दादा खोत
हा माणूस म्हणझे एक अजब रसायन आहे . त्याला स्वतःच्या खोत पणाचा जबरदस्त अहंकार आहे . दुसऱ्यांना स्वतःच्या मर्जी प्रमाणे कसे वागवायचे हे त्याला चपखल माहित आहे . आणि तु खोत असल्याच्या पुरेपूर वापर करून घेतो .
२. गोदा
दादा खोतची बायको म्हणजे गोदा . एक सुंदर स्वप्न रंगून ती खोत घराण्यात येते . पण जेव्हा तिच्या समोर वास्तव येते तेव्हा ती न डगमगता आलेल्याला परिस्थी ला सामोरी जाते .
३. शामू खोत
जेव्हा तो दादा खोत आपल्या घराण्याला कुठे घेऊन चालला आहे बघतो तेव्हा तो वेगळा निघण्याचा ठरवतो . तो लिंबाडला जाऊन स्थायिक होतो . पण खोत घराशी संबंध तोडत नाही.
दुसऱ्या पिढी मधले ह्या व्यक्ती लक्षात राहतात
१. गणेशास्त्री खोत
दादा खोत जेव्हा अडकतो तेव्हा खोत घराणे प्रतिष्ठा गमवून बसते . परिस्तिथी इतकी वाईट होते कि कोणी वाड्यावर येऊन काम करायला तयार होत नाही . गणेश म्हणजे गोदा आणि दादा खोत ह्यांना झालेला मुलगा .
गणेश हा लहानपणीपासून असामान्य व्यक्तिमत्तव असते आणि जेव्हा तो शंकराचार्य ह्यांच्या कडून शिकून जेव्हा तुंबाडला वैद्य म्हणून येतो तेव्हा खोतांच्या घराला परत प्रतिष्ठा लाभते .
पण गणेशच्या मागे दोन व्यक्ती उभ्या राहतात एक म्हणजे गोदा आणि दुसरी शामळू खोत .
२. मधू खोत
शामू खोत ह्यांचा मुलगा म्हणजे मधू खोत . लिंबाडला राहत असून पण जो तुंबाड मध्ये घुंतला आहे आणि गणेशास्त्री वर भावा सारखे प्रेम करणारा .
तिसऱ्या पिढी मध्ये ह्या व्यक्ती लक्षात राहतात
१. नरसू खोत
एक जबरदस्त व्यक्तिमत्तव जो तुंबाडकरांना पुरून उरतो तसेच लिंबाड शाखेला उर्जित अवस्था आणतो .
असे आहेत हे तुंबाडचे खोत . खरंच ही कादंबरी एकदा वाचलीच पाहिजे अशी आहे .
For the record, this was my first attempt at reading a full-length Marathi novel and it's a real shame that I have missed out on such a rich treasure trove of literature for a lion's share of the last 4 decades of my life. Oh well, better late than never, I guess...
Having visited the Konkan belt and having been treated to wonderful Marathi TV serials (such as 'Gotyaa') at various points in my life, I really wanted to read a novel set in the same region for a long time now. Well, I am mighty glad I picked up this one!
This novel spans across the ups and downs of 3-4 generations of a 'Khot' family residing in the village of Tumbaad, starting from the post Peshwa period when the British have just begun to get a firm foothold in the country and flowing across to mid-20th century, a few decades after independence from the British.
Early on in the novel, one of the Khot brothers decides (and with very valid reasons) to move out of the ancestral home ('waadaa') and settle down at a nearby village of Limbaad, thereby leading to the Tumbaad branch (Tumbaadkar) and the Limbaad branch (Limbaadkar) of the family in the rest of the book.
Throughout the novel, the author treats us to a whole spectrum of characters - some quite deceitful, others very benevolent, some spiteful, others forgiving / dutiful, some very,very gifted, some driven & rebellious and others plain resigned to their fate - and the ancestral home and the Jagbudi river bearing witness to all of this drama. All in all, well worth the time invested in reading it!
So, what else was useful with the book?: The addition of a family tree diagram at the start of the book. This not only helps one keep track of the characters as one proceeds through the novel but also aids a quick revision when one (especially slow readers like yours sincerely here) picks up the book after a brief hiatus.
And what else could have been added?: I'd have loved if a fictional map of all the places that find a mention in the novel was included. Someday, I might work one out for myself, based on a focused second reading of the novel.
To anyone venturing into this novel, do take note that this is Volume 1 of 2 (600+ pages) and while this volume does have a chapter-level logical end, it leaves a number of questions unanswered about the living characters and how they fare next... So, do set time aside for the Volume 2 as soon as you have enjoyed this one. :)
I, for one, am looking forward to more wonderful stories waiting to be heard in the second volume.
तशी श्री.ना.पेंडसे ह्यांच्याशी ओळख फारच उशिरा झाली, किंवा माहित नाही ह्या आधी झाली असती तरी हा काळाच्या फार पुढचा लेखक मला कितपत समजला अथवा उमजला असता. मराठीत काही लेखकांच्या नशिबी अमाप प्रसिद्धी आली आहे पण श्री.नांची एवढी प्रसिद्धी किंवा तोंड फाटे पर्यंत स्तुती हे निदान माझ्या ऐकिवात नाही. असो.
ह्या कादंबरीचा आवाका, पैस, कालखंड खूप भव्य आहे. थेट पानिपताच्या युध्दाचा शेवट झाल्यापासून कादंबरी सुरू होते ती संपते भारत स्वतंत्र झाल्यानंतर. ह्या अवाक्याची कादंबरी मराठीत नसावीच.
भले गोष्ट एका काल्पनिक घराण्याची असो, पण श्री. नांची पात्र अत्यंत खरीखुरी. त्यांनी ज्या पद्धतीने पात्र उभी केली आहेत त्यावरून त्यांचं माणूस ह्या विषयाचं किती निरीक्षण आणि सखोल अभ्यास असावा हे कळून येतं. प्रत्यक्षात पाहिलेल्या अथवा ओळखीच्या लोकांचं व्यक्ती चित्रण ठीकच पण कल्पनेत ही एवढी माणसं त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांसह उभी करणं हे अवघड काम आहे. श्री नांनी एका कादंबरीत अनेक व्यक्तीचित्र लिहिली आहेत. एकेक व्यक्तिमत्व एवढं चित्तवेधक, दादा खोत, नाना खोत, मधू खोत, नरसू खोत, बजापा, चिमापा, ताई, गोदा, गणेशशास्त्री तुंबाडकर, श्रीमती, ओड्डल, विश्राम, विनू आचारी, संताजी, तारी, नरू शेठ, अप्पा पडवळ, खान वकील आणि जुलाली. ही झाली मुख्य पात्र पण अगदी छोट्या तल्या छोट्या व्यक्तिरेखा पण एवढ्या बारीक सारीक तपशिलासह उभ्या केल्या आहेत त्याला तोड नाही. गोदा, नरसू खोत, विश्राम आणि ताई ही व्यक्तिमत्व मात्र पर्वताएवढी, नतमस्तक व्हावे एवढी.
कादंबरीची भाषा हा एक अभ्यासाचा विषय आहे. स्पष्ट, सडेतोड, भेदक, शीवराळ कधी अर्वाच्य. पण जसं पात्र तशी भाषा. उगाच सोवळेपणाचा सोस किंवा आव नाही. देहाडराय मास्तर बोलायला लागले की तर वाचतानाही भंबेरी उडावी.
बरं कादंबरी फक्त एका घराण्यापुरती नाही. दुसरा खंड तर हीच पात्र घेऊन त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत आपल्याला घेऊन जातो. कादंबरी एका घराण्याची राहताच नाही, ती राजकीय होते. टिळक, सावरकर आणि गांधी यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देऊन जाते. जाता जाता, फाळणी, त्यावेळची राजकीय परिस्थिती ह्यावर वेग वेगळ्या दृष्टिकोनातून जळजळीत भाष्य करून जाते.
ह्या कादंबरीबद्दल बोलावं तितकं कमीच, कमालीची गुंतागुंत, एवढी पात्र, एवढे संदर्भ तरी ही कादंबरी एकदम गोळीबंद अगदी घट्ट विणलेली आहे आणि कमालीची वेगवान. जवळ जवळ १५०० पानांचा ऐवज पण एकदा सुरुवात केली की हातातून ठेवणं अशक्य.
कादंबरी घराण्या बद्दल म्हणावी, राजकीय म्हणावी का काय? कारण ती ह्या बद्दल तर आहेच, पण नरसु, गोदा, ताई, विश्राम सहज आपल्याला जगण्याचं तत्त्वज्ञान पण देऊन जातात. मग काय म्हणावं अशा कादंबरीला? कुठल्या साच्यात बसवणं म्हणजे तिचा अपमान आहे. बसवूच नये. ती आहे. घ्या आणि वाचा, प्रत्येकाला काहीतरी वेगळं आणि नवीन सापडेल त्याच्या पुरती ती तशी असेल. कदाचित अजून काही वर्षांनी मी हातात घेतली तर मला सुद्धा काही नवीनच गवसेल.
वाचावी अशी, जगावी अशी, तुंबाडमय होऊन जावी अशी. मी जवळ जवळ दो��� महिने पूर्ण तुंबाडमय होतो. आता संपली आहे पण हुरहूर आणि रुखरुख मागे ठेवून.
It has four big volumes .. but they all are so nicely written that I finished them reading in unbelievable short time of 3-4 days.. Off course that was when i was in college and was having much more time to spent.
ही माझी दुसरी मराठी कादंबरी जी मी पूर्ण करू शकलो. सुरेख लिखाण आहे पेंडसेंचं. सगळे पत्र डोळ्या समोर उभे राहतात. बजापा, विश्राम. आमच्यात पण विश्रमचा रक्त आहे.
इतकी सुरेख कादंबरी आहे ही पण खंत अशी वाटते की मराठी साहित्य अमराठी लोकांना कळण्या सारखं नाहीये. इंग्रजी कादंबऱ्या बघा, कोणी पण वाचू शकता. आपल्या कडे पण तसा प्रकार सुरू झाला पाहिजे.
आपल्यात इतिहासाचा संदर्भ खूप असतो. एक स्वतंत्र कादंबरी लिहिली पाहिजे ज्याचा भाषांतर जगात गाजेल. मुरकामी म्हणून एक जपानी लेखक आहे त्याच्या कादंबरी सारखा.
4.25* The story of this book spans nearly 200 years(!!) covering ups and downs of a family across generations. Hats off to Shripad Narayan Pendse for writing such complex story involving so many characters!
I came to know about this book after watching the movie 'Tumbbad' but beware, the movie and the book don't have anything in common (except the name).
Read it for- 1. A good representation of how families grow across generations- How they can branch out, how sometimes just small hate and misconceptions can result in misunderstandings across generations. 2. The immersion into detailed setting of Konkan across years 1800-1900's. 3. Just the overall complexity of the detailed characters and the world created, it all feels real, too real. 4. It's funny to see how the information and stories change across the years, book executes it really nicely.
तुंबाडचे खोत ही उत्तम कादंबरी आहे. एका घराण्यावरती ही संपूर्ण कादंबरी फिरत राहते. कोकणातील वातावरण त्यावेळची जीवनशैली खोत परंपरा जोडीला त्या गादीची होणारी वाताहत होते. पुन्हा त्याच गादीला नावारूपाला आणण्यासाठी झगडणारी पुढची पिढी या साऱ्या गोतावळ्यातून फिरत राहणारी उत्तम दर्जाची कादंबरी म्हणजे “तुंबाडचे खोत” ही श्री. ना. पेंडसे लिखीत दर्जेदार कादंबरी. वाचायला बसले की खाली न ठेवतां वाचत रहावी अशी कादंबरी. २००२ सालीच ८ वेळा पूर्ण वाचून झाली आहे.
तुंबाडच्या खोत घराण्याच्या इतिहासाची सुरुवात होते ती ब्रिटिश आमदानीच्या पहिल्याच दशकात आणि त्या इतिहासाची समाप्ती होते ती त्याच अमदानीतल्या अंतिम दशकात, स्वातंत्र्य प्राप्तीच्या प्रसंगी म्हणजे जवळपास सव्वाशे वर्षाचा हा प्रदीर्घ कालखंड आहे. एका अखंड अश्या घराण्याचा इतिहास ज्याचा मूळ पुरुष कोठून आला आणि त्याने स्थापलेल्या या गावामध्ये पुढे असे काही महाभारत घडणार आहे ते पाहून स्तब्ध करुन टाकणारी ही कादंबरी. मूळ पुरुष हा मोरया नावाचा कोणीतरी असला तरी या कादंबरीचा सुवर्णकाळ सुरू होतो तो भिकाजीपंत खोत यांच्या काळात त्यावेळी त्यांनी पेशव्यांच्या बाजूने पानिपतच्या लढाईत खूप मोठा पराक्रम करुन आपला एक पाय गमावला होता. त्यानंतरच्या काळात या घराण्यामध्ये पैसा आणि प्रतिष्ठा यांचा चढउतार पाहायला मिळतो. यामध्ये काही पात्रे मात्र स्पष्ट लक्षात रहावी अशी आहेत.
This book is just beautiful nothing else.......... It is a story of Khot family of Tumbad & revolving around 4 generations of Khot family. It is beautifully written by detailing out small small things happening in Konkan region at those time. Also it has Indian Freedom Fighting changes & effects of those on normal peoples in background . Mr. Pendase made Goda as heroine in first few chapters, then it is shifted to Narsu Khot & at last a love story triangle between Bajapa, Ganga & Julali.