Jump to ratings and reviews
Rate this book

Choundak

Rate this book
This novel represents the saddening story of the `devdasi` tribe. What is a devdasi? It is a tradition created by people with evil intentions for their own benefits. She is a victim to misconceptions, wrong traditions, so called religion, all created in the name of the god. A devdasi is offered to the god and thus becomes a public property. Any male member can claim her. She falls prey to the harassment of the people. This novel presents a true picture of her torture in the name of traditions. The author has presented the anguish through `Suli`, the main character. He neatly and immaculately presents the various aspects of a female mind, the language, the feelings, etc. `Chaundak` should be recognized as a novel penetrating the real facts of the life of a `devdasi`.

209 pages, Kindle Edition

Published January 1, 1985

4 people are currently reading
27 people want to read

About the author

Rajan Gavas

10 books

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
5 (38%)
4 stars
4 (30%)
3 stars
4 (30%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 of 1 review
Profile Image for Vijay.
127 reviews16 followers
August 7, 2020
हि कथा आहे एका देवदासी प्रथेवर. देवदासी म्हणजे देवाला अर्पित. पण खरा अर्थ आहे 'गावाला अर्पित'..... म्हणजे त्या व्यक्ती वर कुणाचा ठाम अधिकार नाही तर ती व्यक्ती सर्व गावाची, कुणी यावं आणि भोगावं .... म्हणजे वेश्या ... किंबहुना त्याहून वाईट ... साधारणपणे, मुलांना (मुलगा वा मुलगी) काहीही कळत नसतं त्यावेळी कधीतरी त्यांना देवाला वाहील जातं आणि एकदा का हा विधी झाला कि मग त्यातून सुटका नाही, अगदी मरेपर्यंत.

ही प्रथा अडाणी आणि गरीब लोकांमध्येच पाळली जाते. तरी सुदैवाने, आता या प्रथेवर कायद्याने प्रतिबंध लावले आहेत. परंतु, आजही हजारो जोगते - जोगतिणी आहेत आणि अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे आणि आजूबाजूचा सधन समाज त्यांचे लचके तोडतोच आहे.

मुळात, देवदासी संस्कृतीची परंपरा ७ व्या शतकात, कदाचित चोल, चेला आणि पांड्या यांच्या काळात दक्षिण भारतात सुरु झाली असावी. त्यावेळी समाज त्यांच्याशी चांगली वागणूक व आदरभाव ठेवून होता आणि त्यांनी समाजात उच्च सामाजिक प्रतिष्ठा होती. त्यांना धार्मिक विधीस उपस्थित राहण्यास वा करण्यास कसलाच मज्जाव नव्हता. देवदासी, देवरडीयार, जोगतिणी, जोगते वगैरे म्हणजे 'देवाचे सेवक'. हे लोक देवसमर्पित असत आणि त्यांचा देवासोबत विवाह केला जात असे, म्हणजेच ते कोणत्याही ‘नश्वर व्यक्ती’ बरोबर लग्न करू शकत नाहीत. तथापि, विवाहित आणि अविवाहित पुरुषांपैकी कुणालाही भागीदार निवडण्यास ते स्वतंत्र होते. ही नाती दीर्घ व स्थिर असू शकतात किंवा फक्त थोड्या काळासाठी असू शकतात. परंतु कोणत्याही प्रकारे या महिला त्यांच्या भागीदारांवर आर्थिकदृष्ट्या अवलंबून नव्हत्या. त्यांना संगीत आणि नृत्य, आणि सुमारे ६४ प्रकारच्या कला शिकल्या जात. ते मंदिरात किंवा राजसभेत नृत्य-गायन करीत व बक्षीस म्हणून सोने व जमीन मिळवत असत. काहींनी स्वत:ला फक्त देवाला समर्पित करणे निवडले आणि संपूर्ण आयुष्यभर भागीदाराशिवाय राहिले. पण, कालौखात, हे सर्व मागे पडत गेले आणी त्याला आजचे हे अगदी ओंगळ स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे आजही यांना गोंधळ वगैरे साठी बोलावून बरंच काही नको ते केलं जातं.

चौंडकं कथा:

एक गरीब परिवार, सुबान, त्याची पत्नी बायजा, मुलगी सुली आणि म्हातारी आई असे कसेबसे करून खात असतात. त्यांना खूप समस्या असतात आर्थिक आणि शारीरिक, पण त्यातून त्यांना बाहेत काही पडता येत नाही. त्यातच, सुलीच्या केसात एक जट आढळते आणि गावातील जोगतीण सुलीला यल्लम्मा या देवाला तिला सोडायचा सल्ला देतात.
हि जोगतीण सुली पुढं मोठी होते, बबन्याच्या प्रेमजालात अडकते, त्यातून तिला दिवस जातात आणि सरळ साध्या कुठूम्बाची पूर्ण वाताहात होते.

Displaying 1 of 1 review

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.