Jump to ratings and reviews
Rate this book

राजर्षी शाहू छत्रपती : पत्रव्यवहार आणि कायदे

Rate this book
The available paperwork related to Rajarshee Shahu Maharaj’s social work include many of his letters. Some of them are written by him. They are very rare and in original form. The correspondence between him and Ambedkar genuinely helps to understand the former style and social and political aspects. The letters allow us to understand the caring and sharing that these two great men had. Shahu Maharaj calls Dr. Ambedkar as ‘Lokmanya Ambedkar’ in one of his letters. Dr. Ambedkar on the other hand calls him ‘The Pillar of Social Democracy in India.’ राजर्षी शाहू छत्रपतींच्या समाजक्रांतीच्या बहुआयामी कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या कागदपत्रांच्या संग्रहात अनेक महत्त्वाच्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. त्यात खुद्द शाहू छत्रपतींनी इतरांस लिहिलेली तसेच इतरांनी महाराजांना लिहिलेली अशी अनेक दुर्मीळ पत्रे समाविष्ट झालेली आहेत. विशेषत: यामधील शाहू-आंबेडकर पत्रव्यवहार तत्कालीन, सामाजिक व राजकीय चळवळींवर प्रकाश टाकणारा आहे. या उभय महापुरुषांत परस्परांविषयी किती जिव्हाळा होता, याचेही दर्शन ही पत्रे घडवितात. याच पत्रव्यवहारांत, शाहू छत्रपतींनी डॉ. बाबासाहेबांना ‘लोकमान्य आंबेडकर’ असे संबोधिले आहे; तर बाबासाहेबांनी

157 pages, Kindle Edition

Published December 1, 2007

1 person is currently reading
2 people want to read

About the author

Jaysingrao Pawar

24 books4 followers
डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर या खेडेगावात झाला. सत्यशोधक चळवळीने प्रेरित झालेले गाव आणि शिक्षणाचे महत्त्व जाणलेले वडील, यांमुळे डॉ. पवारांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला जाण्याची संधी मिळाली. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या ‘प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंंग’मध्ये ते केवळ एक ट्रंक व वळकटी घेऊन दाखल झाले. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयामधून इतिहास विषयातून ते बी.ए. व नंतर एम.ए. झाले. कोल्हापूरच्याच शिवाजी विद्यापीठात एम.ए.ला त्यांनी इतिहास विषयात प्रथम क्रमांक मिळवला. एम.ए. उत्तीर्ण झाल्यावर शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व थोर इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांनी त्यांची मराठा इतिहास विभागात संशोधन साहाय्यक म्हणून निवड केली (१९६४). वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी इतिहास संशोधक म्हणून त्यांची जडणघडण सुरू झाली.

पुढे १९६९ ते २००१ या काळात डॉ. पवारांनी महाविद्यालयीन क्षेत्रात इतिहास अध्यापनाचे कार्य केले. या तीन दशकांहून अधिक काळात इतिहास विषयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांची २० पुस्तके त्यांनी लिहिली आणि ती सर्व महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली. अनेक संदर्भग्रंथ अभ्यासून अत्यंत सोप्या शैलीत इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी या पुस्तकांमध्ये केली असल्यामुळे ती क्रमिक पुस्तके न राहता, इतिहासप्रेमींची संदर्भ पुस्तके झाली.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.