ठलवा म्हणजे भूमिहीन शेतमजूर. एकीकडे दारिद्य्र आणि दुसरीकडे स्वातंत्र्यानंतरही अस्पृश्यतेच्या फासात अडकलेल्या बळीराम आणि सुभद्राची ही कहाणी. इथं आहे भूक, विवंचना; उपासमार हा जगण्याचा संघर्ष आणि सामाजिक रूढी-परंपरांची अभेद्य चौकट. निसर्गाची अवकृपा आणि शेतमालकांच्या लहरीपणावर ठलवा शेतमजुरांचं जगणं म्हणजे आग्यामोहळाच्या संगतीनं राहणं. उच्चवर्णीयांची तटबंदी तर काय वंचिताच्या शोषणासाठी टपलेली. महार वेटाळातील माणसांचं जगणं बळीरामची होरपळ बनते. जातिव्यवस्थेची उतरंड सोलून काढते. दैन्य, गरिबी, असहायता या संकटांचा संघर्ष शेवटी दीड वितेच्या पोटाची खळगी भरण्यासाठीच्या केविलवाण्या तडजोडीनं घेरला जातो. जगण्याची ही फरपट मेल्यानंतर संपेल, ही भावना बळीरामच्या मन