गौरी देशपांडेंनी आणि अंबिका सरकार यांनी मराठी मध्ये 'तटबंदी' या नावाने अनुवादित केलेले पुस्तक वाचनात आले.
सुरुवातीला किंचित कंटाळवाणे वाटणारे पुस्तक जसजसे पुढे जावे तस वेगळाच वेग घेते..अहमदाबाद,त्यातील दरवाजे, शहराची जुनी तटबंदी, वाहणारी नदी, झाडाच्या फांद्याप्रमाणे पसरलेलं ज्यू कुटुंब आणि त्यांच्या अवती भोवती असणारा हिंदू, मुस्लिम शेजार..
या सर्व प्रतीकांचा अतिशय समर्पक वापर करत बहुसंख्येने असलेल्या समाजात, धार्मिक दंगलीनी ग्रस्त शहरात स्वतःची धार्मिक ओळख शोधण्याची तिची धडपड, या धडपडीत तिच्या ज्यू कुटुंबियांची होणारी होणारी फरपट..त्यातच बदलणारा सभोवताल व बदलत जाणारी मूल्ये, सामाजिक व कौटुंबिक दोन्ही..वचन दिलेली भूमी इस्राईल आणि लहानाची मोठी झालेली मायभूमी, कर्मभूमी यांच्यातील निवड, ही निवड प्राप्त पर्यायांचा विचार करता नक्कीच सोपी नाही.
एस्थर डेव्हिड या लेखिकेने स्वतःच्या मनातील भावभावनांच काहीस गंभीर, गमतीशीर, गोंधळलेले, निरागस चित्रण करताना कुटुंबाकडे वा समाजाकडे एकाक्ष दृष्टीने बघण्याची कला मोहवून जाते.. बेने ज्यू या समाजाची, त्यांच्या धार्मिक चालीरितींची व निष्ठांची चांगली ओळख या पुस्तकातून होते..Identity Crisis वा स्वओळख शोधणे किती कठीण असू शकत याची प्रचिती आल्यावाचून राहात नाही..शेवटी लेखिका नायिकेच्या एकंदरीत परिस्थितीला 'विषचक्र' संबोधते, पुस्तक वाचल्यावर त्याची कारणे नक्कीच समजतील..