कृतिशील आदर्शवाद, करारी व्यवहारवाद आणि कोरडी व्यावसायिकता यांच्या उत्कर्षोपकर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र राज्याच्या बाल्य व किशोरावस्थेतील व्यक्तिमत्व विकासाचा राजकीय,सामाजिक व आर्थिक परिप्रेक्ष्यातून मागोवा घेणारी महाकादंबरी. अभ्यासू निरीक्षणे, ओघवती शैली आणि सशक्त पात्रउभारणी यामुळे खूपच वाचनीय झाली आहे. रंगनाथ पठारेंचे सर्वोत्कृष्ट लिखाण.