महाभारतातील धर्मविचार व मूल्यामूल्य विवेक हा संपूर्णपणे बुद्धिवादी व वस्तुनिष्ठ दिसत नाही. परलोक, पुनर्जन्म, कर्मविपाक, अवतार, पाप-पुण्य, शाप-उःशाप, स्वर्ग-नरक इत्यादी गोष्टींची या ग्रंथात रेलचेल आढळते. तीर्थयात्रा, एकादशी आदी व्रते, उद्यापने, दाने, गाईचा महिमा हे सर्व यात येतात.