‘अहो माझे बाप, आता माझ्यावर कृया करा. माशांचे महाराज, आता माझ्यावर कृपा करा. आता मी तुमच्यासाठी विदीर्ण शरीर, सडलेलं मांस, कुजके दुर्गंधीयुक्त मांस आणलं आहे. तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून मी नरबळी दिला आहे. मी शुद्ध नरबळी दिला आहे. त्याचा स्वीकार करा. त्या घासानं तुप्त व्हा. ही जागा मी तुमच्यासाठी निवडली त्या या जागेवर मी तुमची खूण केली आहे. त्या या जागेला तुमच्या नावाचा मान दिला आहे. त्या या जागी प्रकट व्हा, त्या या जागी मला खूण दाखवा, त्या या जागी मला प्रेरणा द्या. मी तुमच्या कार्याची सुरूवात करीन. अहो माझे बाप, आता घास घ्या.’ त्याच्या दोन्ही हातांवरचं वस्त्र गळून खाली पडलं. त्याच्या दोन्ही हातांवर एका लहान मुलाचा विश्चल देह होता.
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
नारायण धारप यांचे लुचाई पात्राची संकल्पना पाश्चिमात्य पात्र ड्रॅक्युला, व्हॅम्पायर आणि झोंबी यांचे एकत्रित मिश्रण आहे. त्यात भर म्हणून भारतातील हाकमारी या कल्पनेला पण लुचाई मध्ये घातले आहे. पुस्तक वाचताना आपल्याला एखादा झोंबी भयपट पाहत असल्याची जाणिव होते. लेखकाची कथा सांगण्याची पद्धत आपल्याला बांधून ठेवते आणि सस्पेन्स हळूहळू उलगडत जाते ही या पुस्तकाची जमेची बाजू होय.
धारप यांच्या गाजलेल्या भय कादंबर्या पैकी एक... पुस्तकाची सुरुवातच कथेच्या शेवटच्या प्रसंगा पासून होते... पण नंतर कथा इतकी खुलत जाते की पूर्ण कथा संपल्या शिवाय चैन पडत नाही... तसं तर ही कथा स्टीफन किंग ह्यांच्या salem 's lot ह्या कादंबरीवरून प्रेरित आहे, पण कुठेच ही कथा त्याची बराबरी करत नाही... ह्या कथेची पार्श्वभूमी, पात्र, ठिकाणं सगळी आपल्या मातीतली असल्याने कथा एकदम आपली वाटते... लोकांना खिळवून ठेवते...
Other books by Narayan Dharap like Maifal, Keshavgadhi, Ek papni lavli are far more interesting and readable. However ifvampires are your thing, go ahead and read this one