Jump to ratings and reviews
Rate this book

Yalkot

Rate this book
बिनमौजेच्या गोष्टींमधली वेगळीच मौज शोधणारे, आपली स्वतंत्र तिरकस लेखनशैली निर्माण करणारे श्याम मनोहर हे महत्त्वाचे नाटककार. नाट्यतंत्राच्या आहारी न जाता ते मोकळेपणाने पण उपहासाने, वेगळ्या निरीक्षण शक्तीने आशय अधोरेखित करतात. ही मनोहारी शैली नाट्य दिग्दर्शकाला एक आव्हानच ठरते. त्यांची हृदय आणि यळकोट ही दोन नाटकं दिग्दर्शित करण्याची संधी मला मिळाली. मुंबईला व्यावसायिक रंगभूमीवर एका पाठोपाठ नाटकं करत असतानाच यळकोट नाटक माझ्या हाती आलं. व्यावसायिक प्रायोगिक असा अग्रक्रम किंवा भेदाभेद मी कधीच केला नाही. जे नाटक त्याक्षणी ज्या मंचावर करावंसं वाटलं ते मी बेधडकपणे केलं. यळकोट वाचून मी अक्षरश उडालोच. यातले संवाद कोणते नटनट्या बोलतील? इनॅक्ट करूशकतील? कुठली संस्था हे नाटक उभं करायला तयार होईल ? हे प्रेक्षकांना रुचेल, झेपेल ? त्यातला वरवरचा बोल्डनेस झटकून टाकून त्याच्या मुळापर्यंत आपल्याला जाता येईल ? असे असंख्य प्रश्न आ वासून उभे राहिले. पण नाटक आतून आवडलं होतं. त्याची काहीतरी अर्थपूर्ण गंमत मला दिग्दर्शक म्हणून खुणावत होती. दिग्दर्शक म्हणून एका थिएटर गेमच्या पेसने मी जाणीवपूर्वक वेगवान हालचाली आणि कॉम्पोझिशन्स करत करत नाटक गतिमान ठेवलं होतं. शिवाय श्याम मनोहरांच्या अचूक बोलीभाषेकडे, प्रवाहीपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतंच. गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्टीने यळकोटचे उत्तम प्रयोग झाले. - चंद्रकांत कुलकर्णी

150 pages, Paperback

Published January 1, 2016

1 person want to read

About the author

Shyam Manohar

26 books9 followers
श्याम मनोहर : (२७ फेबुवारी १९४१).
मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार.
पूर्ण नाव श्याम मनोहर आफळे.
जन्म भिकार तासगाव (जि. सातारा) येथे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब, अंगापूर आणि तासगाव येथे झाले.
साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. तसेच सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालय आणि कराडचे सायन्स महाविद्यालय येथे उच्च शिक्षण घेऊन ते बी.एस्‌सी. झाले (१९६४) आणि पुणे विद्यापीठातून एम्.एस्‌सी. ही पदवी त्यांनी संपादन केली (१९६७).
त्यानंतर अध्यापनक्षेत्रात शिरुन
त्यांनी डॉ. दातार कॉलेज, चिपळूण; ज्ञानप्रबोधिनी, पुणे येथे काही काळ अध्यापन केल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ कॉलेजात ते प्राध्यापक म्हणून काम करु लागले आणि त्याच महाविद्यालयातून निवृत्त झाले. माध्यमिक शिक्षण घेत असतानाच ते लेखन करु लागले. 'काँपिटिशन' ही त्यांची पहिली कथा. त्यानंतर कथा, कादंबरी आणि नाटक ह्या तिन्ही साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. आणि बाकीचे सगळे (१९८०) व बिनमौजेच्या गोष्टी (१९८०) हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्घ आहेत. त्यांच्या कथांच्या शीर्षकांतही वेगळेपणा दिसून येतो. उदा., 'वासू अमक्यातमक्या ठिकाणी ऐसपैस', 'गुरुत्वापसरणाचे प्रदेश' इत्यादी. हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव (१९८३), शीतयुद्घ सदानंद (१९८७), कळ (१९९६), खूप लोक आहेत (२००२), उत्सुकतेने मी झोपलो (२००६) या त्यांच्या कादंबऱ्यांतून कादंबरीचे रुढ आकृतिबंध आढळणार नाहीत; तथापि समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परकिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणाऱ्या भाषेतून प्रकट करतात. मध्यमवर्गीयांच्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे येणारा जीवनाकडे प्रगल्भपणे पाहण्याचा अभाव हा अनेकदा त्यांच्या उपरोधाचे लक्ष्य ठरतो. शब्दांचा वापरही ते अनेकदा असांकेतिक पद्घतीने करतात. यकृत (१९८६), हृदय (१९८७), येळकोट (१९९३), प्रेमाची गोष्ट ? (१९९७), दर्शन (२००४) ह्या त्यांच्या नाटकांतूनही असांकेतिक लेखनाची वैशिष्ट्ये प्रत्ययास येतात. उत्कृष्ट कथालेखनासाठी कराड पुरस्कार (१९८३); सर्वोत्तम नाट्यलेखनासाठी नाट्यदर्पण पुरस्कार (१९८३, १९८६, १९९४); कादंबरीलेखनासाठी ह. ना. आपटे पुरस्कार (१९८४); गंगाधर गाडगीळ पुरस्कार (१९९४); उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी साहित्य अकादेमी पुरस्कार (२००८) त्यांना प्राप्त झाले आहेत.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
0 (0%)
4 stars
0 (0%)
3 stars
0 (0%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
No one has reviewed this book yet.