Jump to ratings and reviews
Rate this book

Kalindi

Rate this book
Nitya Niranjan(Marathi)

Paperback

First published January 1, 2010

32 people are currently reading
266 people want to read

About the author

Jagannath Kunte

6 books37 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
62 (61%)
4 stars
22 (21%)
3 stars
12 (11%)
2 stars
2 (1%)
1 star
3 (2%)
Displaying 1 - 7 of 7 reviews
1 review1 follower
November 18, 2020
भारतीय संस्कृतीत स्त्रीला आदिशक्तीचं रूप मानलं जातं. अनादी काळापासून स्त्रियांनी अगदी पुरुषांच्या बरोबरीनं आपले गुणविशेष सिद्ध केले आहेत... तरीही जवळजवळ संपूर्ण जगभरात पुरुषसत्ताक पद्धती का निर्माण झाली असावी हा संशोधनाचा विषय.
स्त्री-तत्त्वाची ताकद अमर्याद आहे... मेणाहून मऊ असणारी स्त्री प्रसंगी पाषाणापेक्षाही कठोर होऊन आपलं विहित कर्तव्य बजावू शकते हे निर्विवाद सत्य. हेच सत्य उलगडणारं, भौतिक आणि आध्यात्मिक विश्व यांचं बेमालूम मिश्रण असलेलं 'कालिंदी' हे जगन्नाथ कुंटेलिखित इबुक.

ही कथा आहे कालिंदी आणि तिच्या स्वामीची. टोकाचा विक्षिप्त स्वभाव असलेला स्वामी म्हणजे अस्थिरतेचं दुसरं नाव… त्यातच साधनेची अपरिमित ओढ तर कालिंदी मात्र संसारात, समाजसेवेतच आपलं जीवनध्येय शोधणारी. साहजिकच त्यामुळे त्यांच्या नात्यात असलेलं हे विशिष्ट अंतर मांडणारं मुखपृष्ठ अतिशय बोलकं आहे.

काही पुस्तकं ही त्यातली वैचारिकता समजून घेत स्वतःमध्ये झिरपू देत वाचायची असतात. त्या दृष्टीनं 'कालिंदी' इबुक स्वरूपात उपलब्ध होणं मला महत्त्वाचं वाटलं. आपापल्या सोयीनं, हव्या त्या वेळी, हवं तिथं आता कालिंदी वाचता येईल.
सध्या संसाराची व्याख्या फारच साचेबद्ध झाली आहे. कर्तव्यापेक्षा हक्काची भाषा जवळची वाटायला लागली आहे. कोण कुणापेक्षा श्रेष्ठ असे वाद रंगत आहेत. अशा वेळी एकमेकांच्या ओढीनं संसार करत पण तरीही अलिप्त राहणारे कालिंदी आणि स्वामी वाचकांना खूप काही सांगून जातात.
छोट्या-छोट्या प्रसंगांतून आयुष्याचं तत्वज्ञान खुबीनं सांगण्याची लेखकाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कालिंदी आणि स्वामी दोघांचेही स्वभावविशेष त्या पात्रांना आणि कथेला एक वेगळं परिमाण देतात आणि वाचक हळूहळू कथानकात गुंतत जातो.

स्वामी खूप बोलणारा तर कालिंदी नुसता नजरेनं संवाद साधणारी, स्वामी प्रचंड हळवा आणि भावनिक तर कालिंदी पटकन सत्य परिस्थिती स्वीकारणारी... साहजिकच आपल्या पतीला असलेली साधनेची ओढ, त्याचा अध्यात्मिक कल जाणून त्यानं आपल्या मोहात अडकून साधनामार्गापासून ढळू नये यासाठी कालिंदी प्रयत्न करते. त्याच्या वैराग्यासाठी ती स्वतःला संसारात बुडवून घेते. असा आपल्या भावविश्वात असूनही नसल्यासारखा असणारा पती सांभाळत कालिंदी स्वतःच्या आयुष्याचा मार्ग नकळतपणे आखत जाते.

आपल्या आईचं आणि समाजातल्या आजूबाजूच्या स्त्रियांचं आयुष्य बघत मोठा झालेला स्वामी स्त्री-स्वातंत्र्य, न्याय्य वागणूक या बाबतींत कालिंदीच्या मागं ठामपणानं उभा राहतो. कालिंदीच आपल्या संसाराची सारथी आहे हे तो पुरेपूर जाणून आहे.

'कालिंदी' ही संसारात मोक्ष शोधणाऱ्या स्त्रीची कथा आहे. सांसारिक जबाबदाऱ्यांतून मुक्त झाल्यानंतर समाजाच्या जडणघडणीत निरपेक्ष वृत्तीनं योगदान देणाऱ्या कालिंदीचं आयुष्य म्हणजे याच समाजातल्या इतर कितीतरी स्त्रियांच्या अव्यक्त आयुष्याचं शब्दरूप आहे. स्त्री-मनाचं अथांग अवकाश, तिचं अबोल प्रेम आणि तिची अमर्याद कर्तृत्वक्षमता यांचा पट चिमटीत पकडण्याचा प्रयत्न लेखकानं या कथेद्वारे केला आहे. कथा वेगवान आहे. अध्यात्म आणि भौतिकता यांचा समतोल साधणारी कालिंदी संपूर्ण कथानकात कृतीमधून मूकपणे बोलत राहते. उत्तरार्धात तिचं एकूणच मनुष्यजातीवर असलेलं वैश्विक पातळीवरचं भाष्य तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळाच पैलू उलगडतं.

साधनेच्या मार्गावर असलेल्या व्यक्तीच्या मनाचा, तिच्या आसक्तीचा, तिच्या भावनांचा अचूक ठाव लेखक घेतो. ही कसरत साधताना आपलं मन शांत कसं ठेवायचं हे कालिंदी आणि स्वामी, दोघंही अप्रत्यक्षपणे वाचकाला सांगत राहतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातच साधनेचा मार्ग कसा शोधायचा, आपल्या कामातूनच मोक्ष कसा साधायचा हे शब्दांतून न सांगणारी कालिंदी कर्मयोगाचं उत्तम प्रतीक आहे. तिची गोष्ट वाचताना भोवतालातल्या कितीतरी कालिंदींचं जगणं नजरेसमोरून सरकत राहतं आणि स्थिरता प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली साधनेची वाट चालायला वाचक प्रवृत्त होतो.
Profile Image for Dipti Haldankar - Khot.
6 reviews1 follower
Read
April 12, 2021
* देव कठोर नसतो! प्रारब्ध कठीण असतं! ते भोगूनच संपवावं लागतं. दुर्बल माणसं प्रारब्धाच्या कठोरतेला बळी पडतात, श्रद्धा ठेवणारा माणूस प्रारब्धाच्या कठोरपणाला वाकवतो.


अंदाजे रात्री दोन वाजता उठावं, डोळे मिटून साधनेला बसावं. समोर शांत कृष्णामाई वहात असते. घाटावर निरव शांतता असते. आसमंत निवांत असतो. सद्गुरूंचं स्मरण करून पद्मासन घट्ट करावं डोळे मिटून बसल्यावर जे समोर दिसेल, ते बघावं. बघता बघता ध्यानाची मस्ती वाढत जाते. सहज समाधीत कधी विरघळून जातो ;कळत नाही.

"ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार सर्व होत असतं. दुसर्‍याला दोष देऊ नये. इपलं प्रारब्ध आहे ते सुखानं भोगावं! "
6 reviews
March 15, 2023
It's an excellent & fascinating book, subject is spiritual & salvation. Latter part of novel is most probably resembles with famous social worker Medha Patkar who works in Narmada Valley . Spiritual experiences shared are of higher level & you feel that let myself get blessed with such extraordinary experiences. Thank you Swamijee for sharing great life .
4 reviews
September 19, 2021
A must read. I wish I can see a photo of Kalindi Kunte. There isn't anything on google.
Profile Image for Prafull.
6 reviews
January 13, 2014
Kalindi, a poor but determined lady put front an example of how faith on god and down to earth attitude can change the world. She turned a small village into self sufficient, cultured community.
Best read.
Believe, Have Faith on God, and don't forget to perform your best, is the key to get satisfied life is the Mantra of book.
Profile Image for अनिकेत.
391 reviews23 followers
April 24, 2026
At first you will be curious & excited to read the story about Kalindi, author has described her very well, however, book fails to keep you engaged with it, after few pages, you start questioning yourself as to wheres this topic exactly directed to?most of the content then seems to be repetitive n boredome
Displaying 1 - 7 of 7 reviews