अकस्मात नाहीशा होणार्या व्यक्ती, प्रत्येक क्षणी गूढतेचे वलय आणिकच गहिर्या करणार्या अकल्पिक घटना... असंख्य रहस्यं स्वत:मध्ये दडवणारी ती भव्य झपाटलेली वास्तू... एक अनोखे विश्व ज्याला मितीच नाही. एक वेगळा प्रवास ज्याला अंतच नाही. सुविख्यात भयकथाकार श्री. नारायण धारप यांची ताज्या दमाची नवी कोरी कादंबरी जी वाचकांना खिळवून ठेवील... ‘‘संक्रमण’’
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
वाचकांना खिळवून ठेवणारी श्री नारायण धारप यांची संक्रमण हि कादंबरी वाचली.
'संक्रमण'ची कथा श्रीकांत या मुख्य पात्राभोवती फिरते. तर्कसंगत व आधुनिक विचार करणारा श्रीकांत हा एक वास्तवादी तरुण आहे. ध्यानीमनी नसताना वारसाहक्कामध्ये त्याला काही संपत्ती मिळते. पण त्यासोबतच एक अलौकिक शापित वस्तू सुद्धा त्याच्या मालकीची होते. त्या भव्य आणि शापित दुमजली घरामध्ये घडणाऱ्या अनैसर्गिक व अलौकिक घटनांचा श्रीकांतच्या आयुष्यावर, विचारांवर आणि विश्वास-प्रणालीवर काय आणि कसा परिणाम होत जातो याचे चित्रण अप्रतिम आहे. भय व त्यामुळे निर्माण होणारी मानसिक गुंतागुंत धारप यांनी उत्कृष्ट रित्या मांडलेली आहे. संक्रमण हि फक्त भुतं-खेतं असलेली भय कथा नाही. तर श्रीकांत या मुख्य पत्रामार्फत धारप यांनी निर्माण केलेल्या जगामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अनैसर्गिक शक्तींचा कसा समतोल साधला जातो या बद्दलचा एक अनोखा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. श्रीकांत या वास्तवादी व्यक्तीचा चालू झालेला प्रवास त्याला कसा व कुठे घेऊन जातो हे जाणून घेण्यासाठी "संक्रमण" नक्कीच वाचायला हवी.
संक्रमण हि एक वेगवान आणि थक्क करून टाकणारी भयकथा आहे. श्री नारायण धारप यांनी तयार केलेले हे अद्भुत जग अनुभवणे म्हणजे एक अनोखी भेट आहे.
मागच्या दोन दिवसात धारपांची संक्रमण ही कादंबरी वाचून काढली. कुठल्याही काळात चपखल बसेल अशी कथा, अत्यंत वेगाने भूतकाळ आणि वर्तमान काळात घडणाऱ्या घटना, कल्पनिक असल्या तरी डोळ्यापुढे जिवंत उभ्या करणाऱ्या काही गोष्टी मनाचा थरकाप उडवतात. श्रीकांत हे मध्यवर्ती पात्र अत्यंत वास्तववादी विचार करणारे. त्याला अचानक कोणाची तरी प्रॉपर्टी वारसदार म्हणून मिळते. ज्यांची संपत्ती असते ते परिवाराचे किंवा त्यातील लोकांचे नावही त्याने ऐकलेले नसते. त्याला मिळालेल्या प्रॉपर्टी मध्ये एक वाडा, दागिने, चांदीचे देव, म्युच्यअल फंड इत्यादींचा समावेश असतो. त्याच्या माध्यमातून आपण होनापांचा वाडा, तेथे घडणाऱ्या घटना, श्यामालाबईंची नोंदवही व त्यातील नोंदी, मानवी स्वभावधर्म, महाराज व त्यांच्या माध्यमातून श्रीकांत चे परमात्म्याशी जोडले जाणे हे सगळे एका विशिष्ट गतीने व श्वास रोखून वाचत पहात जातो.
कादंबरीच्या कथानकाचा वेग थक्क करणारा आहे. आपण कधी ह्या कथेत गुंतत जातो आपल्याला कळतच नाही. कादंबरीचा शेवट थोडा वेगळा पण तर्कसंगत वाटतो.
खूप वर्षांनी धारपांची कादंबरी वाचली. मजा आली. लॉक डाऊन काळात वेळेचा चांगला उपयोग झाला.
Very different end.... Surprise, secrets in story are nicely handled... Very detailed information of each thing ..... Till end no body gets clue what should be the end.,. Practical & Imagination good balance. But, other side felt very long & lengthy writing too.... Like story was not coming to end .... It was like something & other getting added....
I am a fan of Dharaps writings.. This novel is not different than his other epic novels. Once u start reading, impossible to put down until you are done.. I read it in single sitting.. Last few pages are best.. Has moral ground.. Makes you think about the life choices you make.. Brilliant..
अतिशय योग्य आणि सुव्यवस्थित पद्धतीने प्रत्येक वेळ घटना आणि जागा मांडली आहे. कथानक अतिशय योग्य गतीने मांडले आहे. मोजक्या ठिकाणी शब्दांमध्ये चुका आहेत पण त्या टंकलेखनाच्या चुका आहेत. एकंदरीत खूप छान लिखाण.
It was my first ever mystery/horror fiction book. I loved the way author did the storytelling and provided very detailed information. The book is not so horrific to read, you won't get goosebumps for sure. Giving 4 stars for storytelling.
Mt first book of Narayan Dharap, phenomenal writing. Has that magic to create picture in your imagination and bring every character to life. If you are thinking to read, go for it won't be disappointed.
धारापांच्या कथाविश्वातील अजून एक भय कादंबरी. गूढता आणि भय शेवटपर्यंत कायम ठेवण्यात लेखकाला यश आले आहे. श्यामलाबाई आणि त्यांची आपबिती वाचताना काही ठिकाणी अंगावर काटा येऊन जातो. इथेच लेखकाला दाद मिळून जातो.
कथेतील रहस्य उत्कंठा वाढवते आणि नायकाशी जुळून आलेले उकल आणि परिणामांचे क्षण वेगळा पैलू दाखवतात. वाचकांना नायकाच्या गतीने वाहून नेण्यात धारप नेहमीच यशस्वी ठरतात.