माणूस आणि प्राणी यांच्यातल्या अनोख्या नात्याची अद्भुत गोष्ट.
“चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो. त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.” - डॉ. प्रकाश आमटे
हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पावरील ‘आमटेज अॅनिमल आर्क’मधील विविध प्राण्यांची भरपूर रंगीत छायाचित्रं असलेलं पुस्तक.
आजच्या डिजिटल जगात वावरणं खूप सोयीस्कर झालं आहे. मला सांगा तुम्ही तुमच्या मोबाईल विना किती वेळ राहू शकता?
आठवड्यात/महिन्यात अधामधात कधीकधी, आपल्याला बाहेरचे छान छान पदार्थ खाऊशा वाटतात, जसे पिझ्झा, बर्गर, मॅगी आणि नूडल्स ई. असे निरनिराळे फास्ट-फुड्स. तसेच कधी सिनेमागृहात सिनेमा, किंवा अशाचप्रकारे विलासी जीवन जगावसं वाटतच. पण अशा या जगाला सोडून तुम्ही दूर गावात कुठेतरी हे सगळं कायमचं सोडून राहू शकाल? तुमचं तर माहीत नाही पण मी तर मुळीच नाही राहू शकणार.
पण प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी मंदाकिनी आमटे आणि त्यांचे इतर काही सहकारी, गेल्या पन्नास वर्षांपासून एका प्रवासावर निघाले आहेत. एका दूरच्या गावी हेमलकशाला. तिथे त्यांनी एक वेगळचं जग निर्माण केलंय, जे आपल्या इथल्या जगापेक्षा खूप निराळं आगळंवेगळं आणि खूप छान आहे. तिथे ते जंगली प्राण्यांसोबत राहतात त्यांना आपल्या मुलांसारखं मानतात. आपण सगळे त्यांना ओळखतोच. पण त्यांनी केलेलं कार्य, जवळुन जाणण्यासाठी त्यांनी "प्रकाशवाटा" हे पुस्तक लिहलय, ज्याची समिक्षा मी आधीच post केली आहे.
सोबतच, त्यांनी त्यांच्या मित्रांसमवेत, अनाथ झालेल्या जंगली जनावरांसाठी अनाथालय सुरू केले ज्यांना त्यांनी "प्राण्यांचे गोकुळ" असं नाव दिलं.
ह्याच गोकुळाबद्दल, सविस्तर रुपात त्यांनी अनेक प्राण्यांच्या गोष्टी, त्यांच त्या प्राण्यांसोबत झालेलं bonding, इथे सांगितलं आहे. जे खुप interesting आहे. त्यांच्या गोकुळात कशाप्रकारे ह्या प्राण्यांचा समावेश झाला, हे लेखकाने इथे नमुद केलय.
प्राण्यांसोबतच्या गमतीजमती जाणण्यासाठी, नक्की हे पुस्तक वाचा.
Reading a book in Marathi was weird at best... - but that's beside the point. This book is a collection of stories [experiences and learnings] gathered while raising rescued or orphaned wild animals, from leopards and bears to even crocodiles... peppered with the loveliest pictures. I'd naturally heard about this unique rescue centre before and expected more justifications in this book against the criticism that they've faced over the years. In retrospect, I'm glad that that only took up the better part of the final chapter - there was just so much more to say. Here's a nice article in English that gives a glimpse of what goes on at "Amte's Ark" as the centre is known.