Jump to ratings and reviews
Rate this book

Tmiratun tejakade ( )

Rate this book

472 pages, Paperback

First published January 1, 2010

11 people are currently reading
123 people want to read

About the author

Narendra Dabholkar

34 books37 followers
Narendra Achyut Dabholkar (1 November 1945 – 20 August 2013) was an Indian rationalist and author from Maharashtra. He was the founder-president of Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS), an organization set up to eradicate superstition in 1989. Triggered by his murder on 20 August 2013, the pending Anti-Superstition and Black Magic Ordinance was promulgated in the state of Maharashtra, four days later.

Dabholkar was born on 1 November 1945 to Achyut and Tarabai, being the youngest of ten siblings, the eldest was the late educationalist, Gandhian and socialist Devdatta Dabholkar. He did his schooling at New English School Satara and Willingdon College, Sangli. He was a qualified medical doctor, having obtained an MBBS degree from the Government Medical College, Miraj.

He was the captain of the Shivaji University Kabaddi team. He had represented India against Bangladesh in a Kabaddi tournament. He won the Maharashtra government's Shiv Chhatrapati Yuva Award for Kabaddi.

He was married to Shaila and has two children, Hamid and Mukta Dabholkar. His son was named after the social reformer Hamid Dalwai. He didn't believe in Vastu Shastra and built his house without any regards to the principles of Vastu Shastra. He also criticised extravagant marriage ceremonies and arranged for his own children to be married in simple ceremonies. The almanac was not consulted to select an auspicious time as it is traditionally done. Dabholkar was also an atheist.

Dabholkar had faced several threats and assaults since 1983 but had rejected police protection.
“If I have to take police protection in my own country from my own people, then there is something wrong with me, I'm fighting within the framework of the Indian constitution and it is not against anyone, but for everyone.”
— Dabholkar on rejecting police protection

Murdered on 20 August 2013, while out on a morning walk, Dabholkar was shot down by two unidentified gunmen near Omkareshwar temple, Pune at 7:20 AM IST. The assailants fired four rounds at him from a point blank range and fled on a motorcycle parked nearby. Two bullets hit Dabholkar in his head and chest. He later succumbed to his injuries while being treated at Sassoon Hospital.

Dabholkar had originally donated his body to a medical college. But, the autopsy made necessary by his murder left the slain leader's body unfit for academic purposes. He was cremated in Satara without any religious rites. His pyre was lit by his daughter, Mukta, in contradiction to the tradition where the son lights the pyre. His ashes were collected without any religious ceremony and scattered over his organic farm.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
18 (56%)
4 stars
11 (34%)
3 stars
3 (9%)
2 stars
0 (0%)
1 star
0 (0%)
Displaying 1 - 3 of 3 reviews
Profile Image for Dr.Madan Bhimsen Jadhav.
88 reviews8 followers
August 27, 2018
#तिमिरातुनी_तेजाकडे

#नरेंद्र_दाभोळकर

राजहंस प्रकाशन. पृष्ठे-४७२. किंमत- रु. ४५०/-
------------------------------

“विचारांची हत्या करता येत नाही. तुम्ही व्यक्तीला मारू शकता, परंतु तिचे विचार नाही.”

२०१३ पूर्वी मी दाभोळकरांना फक्त वर्तमानपत्रांमध्ये भेटत होतो. ‘अंनिस’ने अमुक भोंदूबाबाचा पर्दाफाश केला, ‘अंनिसची अमुक जातपंचायतीविरुद्ध तक्रार व कार्यवाही’ अशा प्रकारचा बातम्या वाचण्यात यायच्या. परंतु वाचून सोडून द्यायचो. नरेंद्र दाभोळकर व्यक्ती काय आहे हे कधी जाणून घ्यायचा प्रयत्नच केला नव्हता. परंतु २०१३ साली त्यांची हत्या झाली आणि एक प्रकारचा धक्काच बसला. “अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या एका सुधारकाला त्याच्या कामाचे हे बक्षीस? आणि ते ही एकविसाव्या शतकात? असं काय होतं त्या व्यक्तीमध्ये कि त्याला संपविणे हि काही नराधमांची गरज होऊन बसली?” आणि मग माझी शोधयात्रा सुरु झाली. जेंव्हा मला कळलं कि ते एक डॉक्टर होते आणि तेही मिरज मेडिकल कॉलेजचे पदवीधर, जिथून मी सुद्धा डिग्री घेतलीय, माझी छाती आपोआप काही इंचाने वाढली. एक माणूस, १९८२ सालचा एक हुशार डॉक्टर, जो म्हणायला गेलं तर आजअखेर डॉक्टरकी मधून खोऱ्याने पैसा कमावून बसला असता, त्याने आपला व्यक्तिगत आणि कौटुंबिक स्वार्थ सोडून, का बरे पूर्णवेळ या समाजातील घाण काढण्याच्या कामाला वाहून घेतलं असेल? कट्टरधार्मिक मुस्लीम समाजातील समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या नावावरून, स्वत: एक ब्राम्हण असूनही आपल्या मुलाचे नांव हमीद असे ठेवले होते. का? तर कार्याची सुरुवात स्वत:पासूनच व्हावी म्हणून! इतर भरपूर अभिमानास्पद गोष्टी कळल्या दाभोळकरांविषयी. मग ठरविले त्यांचे एखादे पुस्तक वाचावे. नेटवर त्यांच्या पुस्तकांची छाननी केली आणि हे पुस्तक निवडले.

या पुस्तकाचे तीन भाग आहेत. पहिला आहे ‘विचार’ ज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलनाशी संबधित थेट बाबी मांडलेल्या आहेत ज्यामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन, फलज्योतिष्य, वास्तुशास्त्र नव्हे तर वास्तूश्रद्धाशास्त्र, स्युडोसायन्स, मनाचे आजार, भुताचे झपाटणे, देवी अंगात येणे, भानामती या विषयांची सर्वांगीण मांडणी आहे.या बरोबरच अंनिस केवळ हिंदू धर्मातील अंधश्रद्धांचेच निर्मुलन करते का, या आक्षेपाबाबत विवेचन आहे. दुसरा विभाग आहे ‘आचार’ ज्यामध्ये अंनिसने जी कृतीशील झुंज दिली आहे तिची माहिती आहे. ‘साहिबजादीची करणी, कमरअली दरवेशचा चमत्कार, लंगरचा चमत्कार, नरेंद्र महाराजांच्या चमत्कारांचा पर्दाफाश या घटनांची माहिती दिली आहे. आणि तिसरा विभाग आहे ‘सिद्धांत’ ज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मुलानाशी संबधित जे विषय सतत चर्चिले जातात त्यांची मांडणी केली आहे. हा विभाग माझा आवडता आहे. या विभागात ‘परमेश्वर, धर्म, धर्मनिरपेक्षता, श्रद्धा-अंधश्रद्धा, स्त्रिया व अंधश्रद्धा निर्मुलन, महाराष्ट्रातील समाजसुधारक व अंधश्रद्धा निर्मुलन,विवेकवाद’ या विषयांवर दाभोळकर सरांनी मुद्देसूद विवेचन केले आहे व त्यांची मते मांडली आहेत.
----------------------------------

या पुस्तकातील काही विचार इथे मांडतो.

१) वैज्ञानिक दृष्टीकोन-
- कोणत्याही अधिकारी व्यक्तीने सांगितले आहे किंवा ग्रंथामध्ये लिहिले आहे म्हणून ती गोष्ट खरी मानणे चूक आहे. सत्याचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण वा निरीक्षण.
- विज्ञान हे सार्वजनिक असते. वैज्ञानिक सत्य सर्वांसाठी खुले असते. वैज्ञानिक दृष्टीकोन वस्तुनिष्ठ असतो, व्यक्तीनिष्ठ नाही.

२) फलज्योतिष्य-
- फलज्योतीष्याची तीन गृहीतके आहेत. एक, आकाशस्थ ग्रहगोलांचा परिणाम मानवी जीवनावर सतत होत असतो. दोन, माणसाच्या जन्मवेळेवर तो परिणाम अवलंबून असतो. तीन, त्यामुळे व्यक्तीचे भविष्य ठरते, जे ठरलेले आहे ते कळते आणि ते बदलताही येते. या गृहीतकांमधील पोकळपणा स्पष्ट आहे. फलज्योतिष्य जेंव्हा तयार झाले, ज्योतिष्यांना या विश्वाच्या प्रचंड व्यापाची कल्पना नव्हती. कित्येक ग्रह-तार्यांचा शोध लागला नव्हता. विश्वाच्या प्रचंड पसाऱ्यामुळे एखादा मनुष्य जन्मताना ग्रह-तार्यांची जी स्थिती आहे, तीच स्थिती पुन्हा यायला कित्येक हजारो-लाखो वर्षे लागतात. मग मागच्या वेळी अशी स्थिती असताना जे घडले त्याची निरीक्षणे नोंदविली जाणे शक्यच नाही. अर्थातच ग्रह- ताऱ्यांच्या अमुक एका स्थितीला असे असे घडेल हे पूर्ण खात्रीने कोणी कसे सांगू शकेल?
- सावित्रीबाई फुले यांच्यानंतर स्त्रियांना शिक्षण मिळू लागले. याचा अर्थ असा आहे का कि सावित्रीबाईंच्या अगोदर जन्मलेल्या स्त्रियांच्या कुंडल्यांमध्ये शिक्षणयोग देणारे अनुकूल ग्रह- तारे नव्हते?

३) हिंदू धर्मालाच विरोध का?-
- भारतातील ८२% लोक हिंदू आहेत. त्यामुळे अंनिसने लढविलेल्या प्रकरणांमधील ८२% प्रकाराने हिंदुंचीच असणार ना! आणि एखाद्या १० खोल्यांच्या वाड्याची स्वच्छता करताना ८ खोल्यांची स्वच्छता झाली तर तो वाडा स्वच्छ दिसेल कि २ खोल्या स्वच्छ केल्यानंतर स्वच्छ दिसेल? अशा वेळी या धोरणाला विरोध करणारे तेच लोक असतात ज्यांचे आर्थिक संबध या घाणीमध्ये दडलेले असतात. हिंदू धर्मामध्ये अन्य कुठेही नाही अशी प्रचंड जातीव्यवस्था आहे. यातील प्रत्येक जातीची आपापल्या रूढी-परंपरा आहेत, कर्मकांडे आहेत. देवदेवताही हजारो आहेत. साहजिकच अंधश्रद्धांचे प्रमाण हिंदूधर्मामध्ये जास्त आहे.

४) परमेश्वर-
- घड्याळजी घड्याळ बनवितो जे नंतर त्याच्या नियमाने चालत राहते. घड्याळजी थांबला म्हणून ते थांबत नाही, तो शिंकला म्हणून घड्याळामध्ये गजर होत नाही. घड्याळजी मेला म्हणून घड्याळ बंद पडत नाही. मानववंशविकासाच्या एक विशिष्ट टप्प्यावर देव, स्वर्ग- नरक, आत्मा या कल्पना जन्मल्या. या कल्पनांचा शोषकांनी शोषितांवर वर्ग-वर्चस्व गाजविण्यासाठी खुबीने वापर केला. त्यासाठी धर्मग्रंथ, स्मृती-शास्त्रे जन्माला घातली. देव मानणारे बहुसंख्य लोक हे परंपरेतून आलेल्या संस्कारांमुळे देव मानत असतात. मानसिक शांती मिळते म्हणून देवावर श्रद्धा ठेवावी असे अनेकांचे मत आहे.तर नास्तिक लोक देवाचे अस्तित्व नाकारतात. साहजिकच ते रूढी- परंपरा, कर्मकांडे यांना देखील नाकारतात. नास्तिकांची संख्या कमी असली तरी ते ते वैचारिक पातळीवर हरलेले नाहीत. अलीकडे झालेल्या सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले आहे कि नास्तिकांची संख्या वाढत आहे.
- ईश्वराबद्दल चर्चा करणारे तीन गट असतात. पहिला, धर्मग्रंथांना प्रमाण मानणाऱ्यांचा गट. दुसरा गट साक्षात्कारवाद्यांचा असतो. आणि तिसरा गट हा युक्तिवाद करणार्यांचा असतो. देवाबद्दलची पहिली कल्पना आहे कि तो ‘निर्मिक’ आहे. महात्मा फुले यांनी हि कल्पना मानली आहे. अंनिस देवाबद्दल ‘अज्ञेयवादी' आहे. म्हणजे काय तर विश्वाची निर्मिती कोणी केली हा प्रश्न अनुत्तरीत असून ‘देव नक्की आहे का?’ याचा शोध घेणे अशक्य आहे आणि तसा शोध घेण्याची काही गरजही नाही. याबाबत गाडगेबाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा.

५) धर्म-
- समितीची धर्माबाबतची भूमिका हि तटस्थतेची आहे. काहींना ती अपुरी वाटते तर काहींना मतलबी. समिती तटस्थ आहे याचा अर्थ समिती तिच्या सदस्याला धर्माचा त्याग करायला सांगत नाही, परंतु समितीच्या व्यासपीठावरून धार्मिक कर्मकांडे होणार नाहीत. याबाबत भारतीय संविधानाचा आदर्श समितीसमोर आहे. परंतु हि तटस्थता म्हणजे चिकित्सेला नकार नव्हे. धर्मसंबधातील वादाचा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही त�� प्रत्यक्ष आचरणातील धर्म आदर्श आहे का आणि ते आदर्श आहे का नाहीत हे कोणी सिद्ध करावे हा आहे. ‘समाजाचे धारण करतो तोच खरा धर्म’ अशी धर्माची व्याख्या असेल तर आजची भारताची राज्यघटना व त्यानुसार झालेले कायदे आणि प्रशासन हे समाजाच्या धारणेसाठीच आहेत. परंतु राज्यघटनेला कोणताच धर्म मानत नाही. धर्मातील रूढी परंपरा कर्मकांडाद्वारे व्यक्त होतात. ‘केले कर्मकांड तर बिघडले कोठे?’ असा प्रश्न सतत विचारला जातो. एक, अशी व्यक्ती किंवा समाज बौद्धिकदृष्ट्या योग्य अशा ऐहिक व्यवहारास दुय्यम स्थान देतात. दुसरे असे कि ज्या समाजात अशा कर्मकांडाचे प्राबल्य असते तो समाज आर्थिकद्रुष्ट्या पिछाडीवर जातो.

६) श्रद्धा-अंधश्रद्धा-
- आई-वडिलांवरील श्रद्धा हा एक प्रकारचा आदर असतो, कृतज्ञता असते. ते स्वाभाविक आहे. पण म्हणून मी आईने सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी श्रद्धेपोटी स्वीकारू शकत नाही. असे करण्याने माझा आईविषयीचा आदर अजिबात कमी होत नाही.
- एकाची श्रद्धा हि दुसर्याची अंधश्रद्धा असते. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मुलन हा विषय नेहमीच स्फोटक बनतो.
- श्रद्धा आणि अंधश्रद्धा या काल सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष असतात. उदा. सतीची प्रथा.
- विनोबा भावेंनी एके ठिकाणी मानवी शरीराला मलमुत्राची गटारे म्हंटले आहे. शौचास जाऊन आले कि हातपाय धुतले म्हणजे आपण ‘पवित्र’ होतो. असे असेल तर आयुष्यातील काहीच वर्षे आणि ते हि महिन्यातून फक्त चारच दिवस मासिक पाळी येणारी स्त्री अपवित्र कशी असू शकते? याचा संबध स्त्रीला दुय्यम समजणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीशी असतो.
- --- --- --- --- ---- ---- ---- --- ---- --- ----- ------- -- --- ----- -- -

प्रत्येकाचा संग्रही असावाच असा हा ग्रंथ आहे. तुम्ही दाभोळकर किंवा अंनिसला माना वा हेटाळा, परंतु एकदा हा ग्रंथ निरपेक्ष भावनेने वाचा आणि मग आपले मन मानेल तसा निर्णय घ्या.
--- - -- - - - -- ----- ------------- ----------

डॉ. मदन भिमसेन जाधव. सांगली.
Displaying 1 - 3 of 3 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.