What do you think?

महाभारतातील अलक्षित कथा: Mahabharatatil Alkshit Katha
महाभारत हा ग्रंथ म्हणजे कथांचा महार्णव. या ग्रंथातील अनेक कथा चिरायू झाल्या आहेत. शेकडो वर्षे या कथांनी वाचकांचे रंजन केले आहे. महाभारताची रचना मुख्यत: प्रश्नोत्तररूपी असल्याने गोष्टीवेल्हाळाला त्यात भरपूर अवसर आहे. एखादा मुद्दा श्रोत्यांच्या मनावर ठसवण्यास कथाकथन हे हमखास यशस्वी साधन असते. व्यासादिकांनी महाभारताचे भरजरी महावस्त्र विणताना कथांची पखरण अशी मार्मिकपणे केली आहे की त्यामुळे ग्रंथांचे आणि कथांचे आकर्षण वृद्धिंगत झाले आहे. प्रत्येक कथेला स्वतःचे असे वैशिष्ट्य आणि सौंदर्य आहेच, परंतु त्यांची योजना दृष्टान्त, रूपक, उपकथानकादींसाठी केल्याने या कथांना एक वेगळे परिमाण लाभले आहे. महाभारतातील कथांत वैचित्र्य आणि वैविध्य आहे.
108 pages, Kindle Edition
Published March 14, 2019
Ratings & Reviews
Friends & Following
Create a free account to discover what your friends think of this book!
Community Reviews
Displaying 1 - 1 of 1 review
April 21, 2019
मी 40 हजार पुस्तके वाचली असतील त्यातील टॉप 10 मधील हे एक पुस्तक
अप्रतिम , आयुष्यात वाचलेले आणि अजून वाचावेसे वाटणारे, हवेहवेसे कधी संपूच नये असे वाटणारे पुस्तक,महाभारताची काय जादू आहे , संमोहन आहे काय कळत नाही , साक्षात इंद्राचे दुर्गुण ही सांगू शकणारी सहिष्णुता , आणि मर्त्य जीवनाच्या मर्यादा सोबतच आनंद ही वर्णन करणारे पुस्तक