I am Jagdish Deore, from Nashik, Maharashtra, India.
भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढ़गाथा हा ग्रंथ नुकताच वाचून पूर्ण केला.
आपल्या भारताच्या नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी, देशात घडणाऱ्या सकारात्मक घटनांची माहिती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पुस्तकात आंतरराष्ट्रीय राजकारण कसे हाताळले जाते, याबद्दल माहिती दिली आहे, विशेषतः आपल्या गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून दहशतवादाचा सामना कसा करावा, इतर देशांच्या हस्तक्षेपांना कसे रोखावे, आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी विविध मिशन्स कशा राबवल्या जातात, याचे तपशीलवार वर्णन केले आहे. हे पुस्तक आपल्याला हे दाखवून देते की, आपल्याकडे या सगळ्या गोष्टींना यशस्वीपणे सामोरे जाण्याची ताकद आहे आणि यासाठी असंख्य यशोगाथा आहेत, ज्या आपला राष्ट्रीय अभिमान वाढवण्यासाठी खूपच आवश्यक आहेत.
यामध्ये बांगलादेश निर्मिती, पाकिस्तानी दहशतवादाचा सामना, श्रीलंका आणि चीन यांच्याशी संबंध इत्यादी विषयांचा समावेश आहे.
या माहितीपूर्ण पुस्तकासाठी लेखक श्री. रवी आमले यांचे हार्दिक अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात माहिती गोळा करून, तिला एका योग्य स्वरूपात मांडणे अत्यंत कठीण काम आहे, आणि त्यांनी हे काम अतिशय कौशल्याने केले आहे. पुन्हा एकदा लेखकाचे अभिनंदन आणि आभार मानतो.
mail- jddeore@gmail.com