दिलीप प्रभावळकरचे ‘अनुदिनी’ हे सदर मी सुरू झाल्या रविवारपासून अखेरपर्यंत नियमितपणे वाचले. याचे पहिले कारण दिलीपविषयीची आस्था; आणि दुसरे कारण त्यातला चटपटीत विनोदी मजकूर, भावनाप्रधान किंवा विचाराधीन होता-होता मध्येच वास्तवाचे भान आणून देऊन वास्तव आणि आदर्श यांतील विसंगती दाखवणे, ही दिलीपच्या विनोदाची पद्धती आहे. त्याच्या अभिनयातही ती आहे. आपापल्या परीने वाजवी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारे एक मध्यमवर्गीय कुटुंब डायरी लिहिते, अशी कल्पना करून, त्यांच्या टीकाटिप्पणीमधून दिलीपने वर्षभरातल्या घडामोडींचा घेतलेला वेध म्हणजे ‘अनुदिनी.’ प्रत्यक्षात आजकाल फार कोणी अशी ‘वासरी’लिहीत नाही. त्यातून एकाच कुटुंबातले सर्वजण सातत्याने हा उद्योग करतील, हे तर संभवनीयच न
● पुस्तक - अनुदिनी ● लेखक – दिलीप प्रभावळकर ● साहित्यप्रकार - आत्मचरित्र ● पृष्ठसंख्या – १६३ ● प्रकाशक – उत्कर्ष प्रकाशन ● आवृत्ती - ०७वी । प्रथम आवृत्ती - जुलै १९९८ ● पुस्तक परिचय - विक्रम चौधरी
‛श्रीयुत गंगाधर टिपरे..’ एका चाकोरीबद्ध मध्यम वर्गीय कुटुंबात घडणाऱ्या दैनंदिन घटनांवर आधारित एक मार्मिक टीव्ही मालिका.. ही मालिका ज्यांनी पहिली ते कदाचितच ती विसरू शकतील. या मालिकेचा आधार म्हणजे लोकसत्ता दैनिकात प्रकाशित होणार दिलीप प्रभावळकर यांचं अनुदिनी हे सदर. हे सदर खूप गाजलं आणि त्याच पुस्तक स्वरूप संकलन म्हणजे अनुदिनी..
दैनंदिन जीवनात घडणाऱ्या कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच क्रीडाजगतातील घटना सर्वसाधारण कुटुंबाच्या चष्म्यातून पाहून, दिलीप सरांनी टिपरे कुटुंब त्यांच्या लेखणीतून प्रत्यक्षात उतरवलं. कुटुंबातील तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील सदस्यांनी रोज त्यांच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल त्यांच्या रोजनिशीत केलेल्या नोंदी हे या पुस्तकाचं स्वरूप आहे. अश्या ठेवणीच, मराठी भाषेतील मी वाचलेलं हे पहिलच पुस्तक..!!
अनुदिनी च विश्व फिरत राहतं ते एका साध्या कुटुंबातील पाच पात्रांभोवती. सगळ्यात वयस्क म्हणजे 80 वर्षाचे चिरतरुण आबा.. कुटुंबवत्सल आई बाबा म्हणजे श्री शेखर आणि सौ. शामल टिपरे.. क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहत त्या स्वप्नविश्वात रमणारा शिऱ्या आणि मॉडेल पासून ते अभिनेत्री होण्याची स्वप्ने असणारी शलाका..! पुस्तकाची सुरुवात होते ती शेखर टिपरे यांच्या रोजनिशीतील टिपनांतून.. प्रत्येकाचे भावविश्व अचूक टिपत आणि रोजनिशी लिहिताना कोणत्याही क्रमाच्या चाकोरीत न अडकता लेखकाने घडणाऱ्या घटना प्रवाहित ठेवल्या आहेत.
प्रत्येकाच्या स्वभावाच्या छटा जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्यांना एकमेकांबद्दल वाटणारी आस्था, प्रसंगी एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती ही कुठेतरी आपल्याला आपल्या सुखद भूतकाळात घेऊन जाते.!!
आपल्यातले अनेक जण दरवर्षी रोजनिशी लिहू असे ठरवत असतात. कदाचित सुरुवातीचे काही दिवस नियमितपणे आपण ते लिहीत असू पण नंतर काही न काही कारणास्तव आपण ते सात्यत आपण टिकवू शकत नाही आणि मग परत पुढल्या वर्षी परत आपण तेच ठरवतो.. ही झाली एका रोजनिशी ची गोष्ट. दिलीप सरांनी अश्या पाच रोजनिशी लिहिल्या.!! तेही समांतर. एकाच घटनेचे प्रत्येक सदस्यच्या मनात उमटणारे वेगवेगळे प्रतिसाद त्यांनी त्या त्या पात्राच्या भाषेत रेखाटलेत. तेही इतके सुंदर की आजच्या काळातही ते तितकेच प्रस्तुत आहेत. लेखकाची भावनाप्रधान, वैचारिक भूमिका आणि त्या जोडीला त्यांचा मिश्किल स्वभाव, ही त्रयी आपल्याला हसवत हलकेच अंतर्मुख करते. लिखाणाचा हा साधेपणा मनाला भावतो व हेच लेखकाचे मोठे यश आहे..
प्रत्येक पिढी समोर वास्तव आणि आदर्श यांची सांगड घालण्याचं एक आव्हान असतं. लेखकाने ते आव्हान समर्थपणे पेलत त्याला कधी विनोदाची तर कधी कारुण्याची झालर दिली आहे. मानली तर ही पात्र आपल्याला आपल्या कुटुंबात दिसून येतील. मध्यमवर्गीय कुटुंबाचे हताशपणे सुख शोधणे, असहाय होणे यातून लेखकाचा विनोद आला आहे असे रत्नाकर मतकरी यांनी सांगितले आहे ते पटत. हे पुस्तक वाचण्याचं खूप दिवसांपासून मनात होत पण योग आला तो पुस्तकभेट स्वरूपात..!!
श्रीयुत गंगाधर टिपरे या मालिकेतून घेतलेली काही छायाचित्रे सुद्धा या पुस्तकात दिलेली आहेत व ती आपल्याला नॉस्टॅल्जिक करायला पुरेसी आहेत. दैनंदिन जीवनाच्या धावपळीत, सुखद भूतकाळाशी जोडणारा हा धागा प्रत्येक मराठी वाचकाने वाचायला हवा..!!
Shriyut Gangadhar Tipre is one of the rare gems of television where they have shown a simple Marathi middle class family dealing with their own issues, and I have watched the serial in bits and pieces as a child and have watched all the episodes on YouTube, and although the whole series was inspired by a book called as Anuduni written by Dilip Prabhavalkar where he imagines a family where each member of family writes a diary and we get read each one’s different takes on current issues they face.
The book is really fantastic to read because everyone talks about the same event but gives his or her perspective about it.
This book definitely brings memories about 90s how simple life was without the internet, and how everyone was interested in cricket.
Good book for read to see 3 generation of a Marathi family love in Mumbai and have the different perspective for a same event. It takes time to build up the interest but afterwards it gets good.