Jump to ratings and reviews
Rate this book

दुर्दम्य

Rate this book
‘Durdamya’ written by author Gangadhar Gadgil is a biography of great Indian freedom fighter Lokmanya Tilak.

189 pages, Hardcover

First published January 1, 1970

29 people are currently reading
532 people want to read

About the author

Gangadhar Gadgil

59 books14 followers
Gangadhar Gopal Gadgil was a Marathi short story writer. He was born in Mumbai. After the postgraduation in economics from the University of Mumbai, he worked as professor of economics in Sydenham College and other colleges in Mumbai.

Gangadhar Gadgil was associated with various prestigious literary institutions of India. He also served as Vice President of the Sahitya Akademi from 1988-1993. He received the Sahitya Akademi Award in 1996 for his autobiographical work Eka Mungiche Mahabharata. He has also been awarded with the Abhiruchi Award in 1949; the Maharashtra State Award, 1956, 1957, and 1960; the N.C. Kelkar Award in 1980; and the R.S. Jog Award in 1982. He was a fellow of the Rockefeller Foundation.

Gadgil's style, deceptively simple looking, was capable of measuring up to the complexity of his content. Offbeat imagery is one of its striking features, but it is used temperately. Gadgil had a fine sensibility; and, not being warped, it can respond to the gentle and the beautiful, however unpromising its exterior. Several of his stories have an implied social comment, but the comment widens out beyond the society into the universally human.[1]. Apart from short stories, he has also authored a few novels, children's stories, travelogues, and one-act plays.

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
115 (62%)
4 stars
44 (24%)
3 stars
16 (8%)
2 stars
4 (2%)
1 star
4 (2%)
Displaying 1 - 12 of 12 reviews
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews12 followers
February 4, 2025
● पुस्तक – दुर्दम्य
● लेखक – गंगाधर गाडगीळ 
● साहित्यप्रकार – चरित्र, इतिहास 
● पृष्ठसंख्या – ७७२
● प्रकाशक– पॉप्युलर प्रकाशन
● आवृत्ती –  प्रथम आवृत्ती - १९७१ । ९ वी
● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी
● मूल्य - ८८० रुपये
● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐⭐

लोकमान्य..!! 

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहासातलं एक सोनेरी पान.. बाळ गंगाधर टिळकांच्या वादळी जीवनपटावर लिहिलेली ही ' चरित्रात्मक कादंबरी '. सहसा चरित्र आणि कादंबरी हे वेगवेगळे साहित्यप्रकार असले तरीही या कादंबरीच्या रूपाने मराठी साहित्यात झालेला एक वाङ्मयप्रकाराचा प्रयॊग आपल्याला पाहायला मिळतो. एक जहाल नेतृत्व, एक झुंझार वृत्तीचे संपादक आणि देशात स्वराज चळवळीचे संग्रामकुंड धगधगत ठेवणारे एक लोकोत्तर व्यक्तीमत्व म्हणून लोकमान्य आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. जनमानसात रुजलेल्या त्याच्या या प्रतिमेच्या पुढे जाऊन एक गणितज्ज्ञ, प्राच्यविद्यापंडित, संस्थापक, संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, मुत्सद्दी लोकनेता तसेच गीतेवर कर्मयोगी दृष्टिकोनातून भाष्य करणारे टिळक या कादंबरीतून गाडगीळांनी आपल्या समोर आणले आहेत.

ही ७६७ पानी कादंबरी वाचताना लेखकाच्या प्रवाही, कलात्मक तसेच घटनांना जिवंत करणाऱ्या लेखनशैलीचा सतत प्रत्यय येतो. बाळू, बळवंत, बळवंतराव, टिळक महाराज आणि लोकमान्य हा टिळकांच्या जीवनाचा वाढत जाणारा आलॆख, त्यांच्या वैचारिक भूमिकेला आकार देणारे विविध पैलू लेखकाने या कादंबरीत रेखाटले आहेत. 

या कादंबरी ची कथावस्तू घडवताना लेखकाने कोणत्याही प्रकारचे काल्पनिक चित्रण कटाक्षाने टाळले आहे. असे असूनही कादंबरी वाचताना, घटनांचे केलेले सादरीकरण, कालानुक्रम, संवादाची योजना, दिलेले संदर्भ तसेच भाषेच्या प्रवाही स्वरूपामुळे ती वाचत राहावी असे वाटते. लोकमानांच्या व्यक्तिमत्वाचे समृद्ध, विविधांगी, बहुआयामी तसेच काही प्रमाणात विसंगत अश्या छटांचे समर्पक असे चित्रण गाडगीळांनी समर्थपणे केले आहे.


ही कादंबरी लोकमानांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर आधारित असल्यामुळे टिळकांच्या जीवनात आलेल्या प्रमुख व्यक्ती तसेच त्यांच्या वैचारिक भूमिकेवर प्रभाव पाडणाऱ्या वडीलधाऱ्या माणसांचे व्यक्तिचित्रण या कादंबरीत आलेले आहे. या कादंबरीतून गोपाळ आगरकर, केरूनाना, विष्णुशास्त्री चिपळूणकर, लाला लजपत राय तसेच गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता अशा अनेक दिग्गज व्यक्तींच्या राजकीय तसेच सामाजिक अंगांचे दर्शन देखील गंगाधर गाडगीळ यांनी घडविले आहे. विशेष म्हणजे वैचारिक भूमिकेत तफावत असताना देखील राष्ट्रहितासाठी एकत्र येऊन कार्य करण्याची तसेच वैयक्तिक विचारांचा आदर करण्याची त्यांची भूमिका ही खूप स्पष्टपणे अधोरेखित केलेली आहे.

आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात असलेली प्रगल्भतेची उणीव ही कादंबरी वाचताना ठसठशीतपणे जाणवते. 

लेखकाने कादंबरीची रचना पुढे दिलेल्या 06 महत्वपूर्ण टप्प्यात केलेली आहे.

१. पहिल्या टप्प्यात टिळकांचे शालेय तसेच महाविद्यालयीन जीवन, विद्यार्थीदशेत असताना त्यांचे बाणेदार व्यक्तीमत्व, त्याच्या राष्ट्रवादी विचारांची झालेली जडणघडण आपल्याला वाचायला मिळते.

२. दुसऱ्या टप्प्यात महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्या टिळकांनी त्याकाळच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटी भरून काढण्यासाठी सरकारी नोकरी न करता, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आगरकर, नामजोशी, आपटे ई. सहकाऱ्यांसोबत शिक्षणक्षेत्रात केलेले कार्य आणि त्यासाठी स्वतः एकही रुपये वेतन न स्वीकारता केलेले समर्पण वाचायला मिळते. तसेच या टप्प्यात केसरी व मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात आणि त्यातील लेखामुळे झालेल्या पहिल्या तुरुंगवासाचे वर्णन लेखकाने केले आहे.

३. तिसऱ्या टप्प्यात टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे राजकीय अंग आपल्याला पाहावयास मिळते. समाजात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग परत पेटवण्यासाठी याच काळात टिळकांनी सार्वजनिक गणेशउत्सव तसेच शिवजयंती साजरी करण्यास केलेली सुरुवात, त्याच दरम्यान झालेली रँड ची हत्या आणि टिळकांना झालेली सक्तमजुरीची शिक्षा तसेच टिळकांना लोकमान्य म्हणून मिळालेली मान्यता वाचावयास मिळते.

४. कादंबरीच्या चौथ्या टप्प्यात नेमस्त राजकारणाला आव्हान देत टिळकांकडे महाराष्ट्राचेच नाही तर समस्त देशाचे राजकीय पुढारीपण कसे आले आणि या संक्रमणाच्या काळात टिळकांच्या प्रखर  लिखाणामुळे सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला रचला आणि त्याची रवानगी मंडालेच्या तुरुंगात कशी झाली यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे.

५. कादंबरीचा पाचवा भाग टिळकांच्या प्रखर बुद्धिमतेचे दर्शन घडविणारा आहे. मंडालेच्या अतिशय रुक्ष आणि न मानवणाऱ्या वातावरणातून राहून तसेच शारीरिक हालअपेष्टा सहन करत टिळकांनी त्याचा गीतारहस्य हा गीतेचा कर्मयोगी सार सांगणारा ग्रंथ पूर्ण केला. याच काळात टिळकांना त्याच्या कुटुंबीयायची आठवण येऊन त्याच्या मनाची होणारी घालमेल, त्याचा एकांतवास याचे वर्णन वाचावयास मिळते.

६. कादंबरीच्या शेवटच्या टप्प्यात, टिळकांचे पुण्यात पुनरागमन आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात पसरलेल्या चैतन्याचे समर्पक वर्णन तसेच मंडालेच्या शिक्षेनंतर शारीरिक तसेच मानसिकरित्या थकलेल्या टिळकांच्या एकाकी मनोविश्वाचे तसेच त्यांच्या व्यापक राजकारणाचे दर्शन लेखकाने घडविले आहे. आयुष्यभर संघर्षाच्या मालिका कधी पायदळी तुडवत तर कधी आपल्या लेखणीने मोडून काढत झंझावाती आयुष्य जगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी घडविलेल्या टिळकयुगाच्या अंतःपाशी येऊन ही कादंबरी थांबते.

खरे पाहता लोकमान्यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचं सीमा नसलेलं क्षितिज आपल्या कवेत घेणं ही कोणत्याही लेखकासाठी कठीण अशीच बाब.. ते आव्हान गंगाधर गडगीळांनी समर्थपणे पेललं आहे.

सार्वजनिक उत्सवांच मूळ स्वरूप काय होतं, त्याच्या मागची एकोप्याची भावना काय होती या गोष्टींचा आपण परत नव्याने विचार करायला लागलो आणि लोकमान्य हे एक व्यक्तिमव म्हणून न पाहता एक वृत्ती म्हणून स्वीकारण्याची मानसिकता आपल्यात रुजेल तेंव्हा ही कादंबरी सार्थकी लागेल.

 ‘‘व्यक्ती निघून जातील; पण राष्ट्र चिरंतन राहील.’’ हे टिळकांच्या जीवनाचं सूत्र ही कादंबरी वाचून नक्कीच वाचकांना उमजेल असे वाटते..

नक्की वाचा..!!

© पुस्तकायन
Profile Image for Sumant.
271 reviews8 followers
March 2, 2016
दुर्दम्य एक अप्रतिम कादंबरी आहे ज्याच्या मध्ये एका वादळाचा प्रवास दिलेला आहे. ते वादळ म्हणजे लोकमान्य टिळक. आज जेव्हा देशद्रोही स्वताला म्हणून घेणे ही एक प्रतिष्ठेची लक्षण झालेले आहे तेव्हा ही कादंबरी खरच एकदा वाचून काढावी कारण हे स्वातंत्र्य मिळवण्या साठी किती लोकांना आहुती द्याला लागली ह्याची जरा तरी जान आपल्याला होईल आणि मग शरम वाटेल कि आपण स्वातंत्र्याला ��िती गृहीत धरतो. गाडगीळ ह्यांनी कादंबरीची सात भाग केले आहेत आणि प्रत्येक भागा मध्ये टिळकांच्या जिवनाचे प्रतिबिंब दिले आहे .
Profile Image for Prabhav Sidhaye.
5 reviews
Read
June 30, 2015
One of best biographises I have ever read. It pictures the life of a devoted nationalist who fought his entire life for freedom of his country. Lokamanya Tilak first planted seeds of purna-swaraj(complete freedom) into the hearts and mids of people during the times when every fighter was devoted to getting whatever grants they could from the british.
Profile Image for Abhijit Kale.
1 review
October 10, 2015
A really well composed novel on Lokmanya Tilak. I will recommend everyone to read it. It will change the perspective of your life. I just suggest to add Pictures related to Lokmanya Tilak and his lifestyle in it. It will be then 5 star complete novel. But in spite of this, I really experienced that era of Hindustan and its journey towards freedom through the eyes of Lokmanya.
Profile Image for Nikhil Kadadi.
7 reviews2 followers
October 17, 2013
Excellent book on Balgandhar Tilak. Nicely portrays nice life, work and his relationships with his contemporaries such M.G Ranade, Gopal Krishna Gokhale, Agarkar, Gandhi, Jinnah etc. Must read for any one interested in Indian history, who can read and understand Marathi.
Profile Image for Rohan Deshmukh.
5 reviews
July 9, 2021
Exceptional Book. The life and times of the Father of the Struggle of India's Independence.
Everyone ...literally ...everyone of the freedom fighters we know ...took a leaf from his life and his passion to fight for "Swarajya" - Complete Independence. This is one book, you should not miss.
Profile Image for Omkar Joshi.
11 reviews1 follower
March 19, 2023
दुर्दम्य... असामान्य लोकमान्य

पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. ब्रिटिश अधिकारी रँडच्या आदेशानुसार सोजिरे पुणेकरांवर अनन्वित अत्याचार करीत होते. या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी पुण्यात २२ जून १८९७ रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. या हत्येमागे बळवंतरावांचा हात असल्याच्या संशयावरून इंग्रजांनी टिळकांना अटक केली आणि १८ महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. अखेर कोणत्याही सत्काराच्या समारंभात भाग घ्यायचा नाही या अटीवर बळवंतरावांची सुटका झाली. तुरुंगातून बाहेर पडल्यावर बळवंतराव त्यांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धनांच्या घरी गेले आणि त्यांना नमस्कार केला. अण्णासाहेबांनी त्यांना घट्ट मिठीच मारली. बळवंतरावांच्या देहाची अवस्था पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले, "आता पुढे काय विचार आहे?" तेव्हा बळवंतरावांच्या काळ्या ठिक्कर पडलेल्या ओठातून क्षीण पण ठाम आवाजात शब्द उमटले, "पुनःश्च हरि ओम !"

         गंगाधर गाडगीळ लिखित "दुर्दम्य" या कादंबरीच्या बाबतीत अशीच काहीशी हकीकत माझ्या बाबतीत घडली. मागच्या वर्षी ही कादंबरी वाचायला घेतली होती पण काही कारणाने ती अर्धवटच सोडावी लागली. मग यावर्षी अगदी ठरवून या कादंबरीचा 'पुनःश्च हरि ओम' केला आणि अक्षरशः झपाटल्यासारखी ही कादंबरी वाचून पूर्ण केली. लोकमान्यांच्या जीवनावरची ही अत्यंत विस्तृत अशी कादंबरी आहे. बाळ गंगाधर टिळक ते लोकमान्य टिळक पर्यंतचा अत्यंत उत्कंठावर्धक प्रवास या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतो.

  कादंबरीची सुरुवात होते ती बळवंतरावांच्या शालेय शिक्षण संपून महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुरुवातीने. गणित हा बळवंतरावांचा अतिशय आवडीचा विषय. एखाद्या अवघड गणितात किंवा प्रमेयात त्यांची तासंतास समाधी लागत असे आणि ते गणित सुटले की त्यांच्या आनंदाला परिसीमा उरत नसे. अंगापिंडाने बळवंतराव अंमळ बारीकच होते त्यामुळे सहविद्यार्थी त्यांची अनेकदा चेष्टा करत. एके दिवशी ही थट्टा असह्य होऊन त्यांनी चंग बांधला की यावर्षी परीक्षा वगैरे सर्व बाजूला ठेवून केवळ शरीरसंपदा कमवायची आणि अगदी हट्टाने त्यांनी हे ध्येय पूर्ण केले. बळवंतरावांचा हा हट्टी स्वभाव राजकारणातही अखेरपर्यंत टिकला. डेक्कन कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांना दाजीसाहेब खरे आणि गोपाळ गणेश आगरकर हे जिवाभावाचे सवंगडी लाभले. आगरकर आणि टिळक ही जोडी तर इतिहासात अजरामर आहे. या जोडीने गाजवलेला काळ गाडगीळांनी या कादंबरीत उत्तमरीत्या चितारला आहे. न्यू इंग्लिश स्कुल, केसरी-मराठा या प्रकल्पांची मुहूर्तमेढ, त्यात आलेल्या अडचणी, परस्परांचे झालेले वादविवाद या कादंबरीत छान रंगवल्या आहेत. लोकमान्यांच्या जीवनातील जवळजवळ सर्व प्रमुख अप्रमुख व्यक्ती, घटना या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळतात. लोकमान्यांवर अनेकदा ते छुपे सुधारक आहेत असा आरोप समकालीन लोकांकडून केला जाई, त्यावर लोकमान्य कायम युक्तिवाद करत की आपला सुधारणांना विरोध नसून त्या सुधारणा ब्रिटिशांनी आमच्यावर लादण्याला आहे, आमच्या धर्मात आणि रुढींमध्ये ब्रिटिशांना हस्तक्षेप करण्याचा काहीही अधिकार नाही !

    केसरी-मराठा या वृत्तपत्राच्या सुरुवातीच्या काळात कोल्हापूर प्रकरणात केसरी आणि मराठाचे संपादक म्हणून टिळक आणि आगरकर यांना चार महिन्यांचा तुरुंगवास घडला. या संपादकद्वयींना तुरुंगात डांबल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला होता. अखेर डोंगरीच्या तुरुंगातून चार महिन्यांनी बाहेर पडल्यावर या दोघांचे जंगी स्वागत करण्याची तयारी जनसमुदायाने सुरू केली होती आणि याची संपूर्ण जबाबदारी उचलली होती खुद्द ज्योतिराव फुलेंनी. ठरल्याप्रमाणे टिळक आणि आगरकर चार महिन्यांनी तुरुंगातून सुटले आणि त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. लोकमत ही एक प्रचंड शक्ती आहे हे बळवंतरावांनी हेरलं. त्यांनतर या शक्तीचे बळवंतराव उपासक झाले आणि बळवंतराव टिळकांचे लोकमान्य टिळक झाले ! हिंदुस्थानात कुठेही टिळक येत असल्याची खबर मिळाली की जागोजागी लोक गर्दी करत मग ते रेल्वे स्टेशन असो की एखादी सभा. लोकमान्यांच्या राजकिय डावपेचांचे अनेक प्रसंग आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळतात. या कादंबरीच्या प्रस्तावनेत गाडगीळ म्हणतात, 'मुख्यतः बाळ गंगाधर टिळक हा माणूस होता तरी कसा, त्याचे व्यक्तिमत्त्व कसे घडत गेले, जीवनात तो काय मिळवण्यासाठी धडपडत होता, ती धडपड होती तरी कशी, हा भारतीय समाज व टिळक यांच्यात जे एक विलक्षण नाते निर्माण झाले होते ते होते तरी कसे याचे जिवंत चित्र निर्माण करणे व टिळकांच्या जीवनातले अनेकविध आकार घडताना दाखवणे हे या कादंबरीचे खरे कार्य आहे." मला वाटते या कार्यात गाडगीळ यशस्वी झाले आहेत.

टिळकांच्या राजकीय जीवनामुळे त्यांचे कौटुंबिक जीवन काहीसे अधांतरीच राहिले परंतु त्यांनी त्यांचे कौटुंबिक कर्तव्य कधीच अधुरे सोडले नाही. राजद्रोहाच्या आरोपाखाली मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई निवर्तल्या. त्यावेळी भावनांचा उठलेला कल्लोळ आणि त्याला घातलेला लगाम याचे यथार्थ वर्णन गाडगीळांनी दुर्दम्य कादंबरीत केले आहे. याच मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. तसेच गोपाळ गणेश आगरकर शेवटच्या घटका मोजत असताना टिळक सर्व कटुता विसरून त्यांना भेटायला जातात हा प्रसंग अतिशय ह्रदयद्रावक आहे. कितीही मतभेद असले तरी आपल्या या जिवलग मित्राच्या आठवणीने टिळक नेहमी सद्गदित होत असत.

  महाविद्यालयीन शिक्षणापासून सुरू झालेला हा झंझावाती प्रवास लोकमान्य टिळकांच्या महानिर्वाणापर्यंत आपल्याला नेतो. या कादंबरीकरता लेखक गंगाधर गाडगीळांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत. ही कादंबरी वाचल्यावर हा प्रश्न पडतो की आपण विसरलो का टिळकांना? त्यांचा त्याग, त्यांची राष्ट्रनिष्ठा, त्यांचे विचार आज आपल्यातून हरवत चालले आहेत का? इतक्या मोठ्या राष्ट्रभक्तावर अशी वेळ आपण का आणली? आपण हे सुधारू शकतो का ? हो नक्कीच सुधारु शकतो. ही कादंबरी आपण वाचली तर आपल्यालाही अनेक उपाय सापडतील याची खात्री आहे. गणेशोत्सव, शिवजयंती असे अनेक उपक्रम सुरू करून लोक एकत्र आले तर परिवर्तन घडू शकते हे टिळकांनी सिद्ध केले होते. आपण आज या उत्सवांचे काय केले आहे याचा पुनर्विचार आपण करायला हवा. एवढे केले तरी टिळक आपल्यातून कधी जाणार नाहीत. मला या कादंबरीने अपरिमित ऊर्जा दिली आणि कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपले कार्य सिद्धीस नेण्याची शक्ती दिली. आपणासही ही शक्ती मिळो, बहुत काय लिहिणे !

टिळक महाराज की जय 🙏
Profile Image for Anil Joshi.
12 reviews
Read
September 21, 2021
Extremely well written

Very engaging novel from first page till the end. One must read it if he truly wants to know who Lokmanya Tilak was.
Displaying 1 - 12 of 12 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.