आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक सचिन कुंडलकर... या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन... नाइन्टीन नाइन्टी !
ह्यातील अनेक लेख मूळ स्वरुपात वृत्तपत्रांमध्ये आणि दिवाळी अंकांमध्ये लिहिले गेले, गेल्या वीस वर्षात लिहिलेल्या पन्नास लेखांपैकी पहिल्या पंचवीस लेखांचा हा संग्रह.
● पुस्तक – नाइन्टीन नाइन्टी ● लेखक – सचिन कुंडलकर ● साहित्यप्रकार – अनुभवकथन, वैचारिक, ललित ● पृष्ठसंख्या – २२८ ● प्रकाशक– रोहन प्रकाशन ● आवृत्ती – ०३ री | प्रथम आवृत्ती - ऑगस्ट २०२१ ● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी ● मूल्य - ३४० रुपये ● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐
सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक चौकटी मोडणारा ललीतलेख संग्रह..!!
आपलं आयुष्य अनेक चौकटीमध्ये मध्ये विभागलेलं असतं. साचेबद्ध अश्या या चौकटीत राहून आपलं आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या मनातल्या न सांगितलेल्या गोष्टीला सचिन कुंडलकर यांनी हात घातला आहे.. हे पुस्तक खरं, थेट भिडणार आणि तितकंच महत्वाचं आहे.. विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेल्या, प्रत्येक लेखात वेगळा आशय असलेल्या अश्या २१ ललीतलेखांचा हा संग्रह आहे.
या पुस्तकातील लेख वाचकांना, लेखकाच्या विवेकी चष्म्यातून आयुष्याच्या विविध पैलूंकडे पाहण्याचा एक नवा आणि ताजा दृष्टिकोन देणारी आहेत. यात वैयक्तिक प्रतिबिंबांपासून ते सामाजिक निरीक्षणांपर्यंत विविध विषयांचा समावेश आहे. दैनंदिन अनुभव आणि भावनांचे हे चित्रण वाचताना लगेच आपल्याशी निगडित वाटू लागतं आणि वाचनाचा आनंद द्विगुणित करतं.
पुस्तकाचं शीर्षकच, नाइन्टीन नाइन्टी, त्या दशकात जन्मलेल्या माणसांच्या मनात एक हुरहूर आणि नॉस्टॅल्जिया ची भावना निर्माण करतं. जणू काही या शिर्षकातूनच लेखक आपल्याला, वर्तमानात जगताना भूतकाळाची रंजक सफर घडविण्यासाठी आमंत्रित करताय. जुन्या आणि नव्यातील समतोल साधत हे पुस्तक, दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील अंतर मिटवतं आणि प्रत्येक पिढीसाठी वाचनीय आणि relatable ठरतं.
यातील काही लेख वाचकाला सुखावून जातात, तर काही आत्मनिरीक्षण करायला लावतात. कुंडलकरांची आपल्या शब्दांतून भावना जागृत करण्याची क्षमता त्यांच्यात दडलेल्या उत्तम लेखकाचा दाखला आहे. ते बालपणीच्या आठवणींना उजाळा देत असो किंवा सामाजिक बदलांवर भाष्य करत असो, त्यांचं लिखाण प्रामाणिक आणि आकर्षक वाटत राहतं.
हे पुस्तक रोजच्या जगण्यातील सामान्य क्षण साजरे करणारी एक नोंदवही वाटते.. लेखकाच्या भाषेत सांगायचं तर ‛सुबक नोंदवही’..!!
या पुस्तकाची जमेची बाजू म्हणजे या पुस्तकाला कुठलाच साचा नाहीये.. कुठलाही लेख उघडावा आणि वाचत सुटावं इतकं सोपं.. संगीत, वाचन, सिनेमा, नैराश्य, स्वयंपाक, प्रवास, बदलतं तंत्रज्ञान, कला, प्रेमाच्या संकल्पना, जवळची माणसं, परदेशातील प्रवासवर्णन, आवडते लेखक, बदलती शहरं अश्या वेगवेगळ्या विषयांवर लेखकाने आशयपूर्ण भाष्य केलेलं आहे.
नव्वदीच्या काळात, जग अनलॉग युगातून डिजिटल युगाकडे कूस बदलताना, त्या बदलांशी जमवून घेण्यात त्या पिढीची झालेली वैचारिक, मानसिक द्वंद्व याच उत्तम चित्र लेखकाने रेखाटले आहे.. हा बदल घडताना वाचणारी आणि ऐकणारी पिढी जाऊन पाहणारी पिढी कशी जन्माला आली तसेच या दोन्ही अनुभवांवर पाय ठेऊन आपण कसे उभे आहोत हेही लेखकाने अधोरेखित केले आहे.
लेखकाला लाभलेली समृद्ध माणसे जसे मौजचे श्री. पु. भागवत, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांनी लेखकाच्या वाचनाला दिशा दिली. तसेच सुनीताबाई आणि जी. ए. कुलकर्णी यांच्यातील पत्रव्यवहार तसेच ओरहान पामुक या तुर्की लेखकाच्या वाचनावर असलेला प्रभावाचा त्यांनी सतत उल्लेख केलायं..
स्वतःच्या जाणिवा समृद्ध करत लेखकाला येत असलेला अनुभव, त्याच्या प्रवास वाचताना, वाचक म्हणून एक मनस्वी आनंद होतो..
या पुस्तकातील प्रवासवर्णने हा एक माझा आवडता भाग.. सई ताम्हणकर सोबत केलेली इस्तंबूल ची ट्रिप, तिथे काहीही न आखता स्वैर केलेली भटकंती, ओरहान पामुकच्या म्युझिअम ऑफ इंनोसन्स या कादंबरीचे स्मृतिसंग्रहाला दिलेली भेट आणि त्याचे वर्णन वाचून आपणही तिथे भेट दिली पाहिजे असा वाटून जातं..
इस्तंबूल चे वर्णन करताना लेखक म्हणतो , “अनेक माणसांनी राहून राहून अनेक वेळा सजवलेले, रंगवलेले जुने सुदंर घर असावे तसे काहीसे या शहराचे झाले आहे..”
तसेच ‛ला फेमीस’ द्वारे शिष्यवृत्ती मिळाली तेंव्हा एकट्याने पॅरिसला केलेला प्रवास, तिथे अनुभवलेलं सामाजिक आणि सांस्कृतिक वेगळेपण लेखकाने आपल्यापर्यंत सहजतेने पोहोचवलं आहे.. पॅरिस नावाच्या प्रयोगशाळेने लेखकाला, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला कसं शिकवलं हेही आवर्जून त्यांनी सांगितलं आहे..
या पुस्तकातील काही विशेष आवडलेलं लेख म्हणजे, प्रकरण (अफेयर), डाळिंबाचे दाणे आणि एकट्या माणसाचे स्वयंपाकघर..!! हा ललीतलेखसंग्रह सांस्कृतिक सीमा ओलांडतं आणि तुम्ही मराठी संस्कृतीशी परिचित नसाल तरीही, तुम्ही या पुस्तकातील वैश्विक जाणिवेशी जोडले जाता..
सचिन कुंडलकर यांची उत्कट निरीक्षणे आणि शब्दकळांनी समृद्ध झालेलं हे पुस्तक मानवी अनुभवांचा रोखठोक आणि कुठलाही फिल्टर न लावता विचार करणाऱ्या प्रत्येकांनी वाचायलाच हवं..
After reading this book I realise one thing, that sachin kundalkar is better writer than the film maker. Thought the book is a collection of pre published articles from different newspapers and magazines so there is nothing new in the content but yes the author is pretty clear with his thoughts and he able is to look at himself from fourth dimension. Very well written and Worth read.
4.5* साधारण 70-80 च्या दशकात जन्मलेल्या पिढीला 90च्या दशकाने घडवले, कारण तेव्हा ही पिढी तिच्या ऐन तारुण्यात होती (म्हणूनच नाव नाइन्टीन नाइन्टी). पण या दशकात झपाट्याने बदल सुरु झाले आणि नव्या जुन्याच्या तिढ्यात ही पिढी अडकली, धडपडली. आता मध्यमवयीन असलेली ही पिढी विचारांनी पूर्णपणे जुनीही नाही पण पूर्णपणे नवीनही नाही. या पिढीची घडण, challenges, आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळे असलेले तिचे विचार, पर्यटनामुळे पाहिलेलं वेगळं जग, अनुभव आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचं हे पुस्तक. वेगवेगळे, वर्तमानकाळातले, नव्या विचारांचे त्यांचे movies (गुलाबजाम, वजनदार, Happy Journey, गंध, राजवाडे & sons, प्रवास etc) तुम्हाला आवडले असतील तर हे पुस्तक तुम्हाला नक्की आवडेल.
यात वेगवेगळ्या विषयांचे 21 ललित लेख आहेत - प्रवासवर्णनं, मराठी साहित्य, आगळे वेगळे प्रदर्शन, संगीत मैफिल, काही व्यक्तिचित्रण, आत्महत्येचा प्रयत्न, नैराश्य आणि एकटेपणाच्या भावना, स्वयंपाकाची आवड, प्रकरण (affairs ?) आणि असेच विविध विषय. आपल्या comfort zone मधून बाहेर पडून, इतिहासकालीन साहित्यातून बाहेर पडून मराठीतलं स्वतःचं वर्तमानकाळातलं, fresh असं काही वाचायचं असेल, नव्या दृष्टीने जग बघायचं असेल तर हे पुस्तक एकदा तरी नक्कीच वाचावं असं. माझं म्हणाल तर, परत परत वाचावं असं हे पुस्तक.
पुस्तक वाचता वाचता लेखकाशी भांडण्याचे प्रसंग तुमच्यावर किती वेळा आलेत? हे पुस्तक वाचताना माझ्यावर ते बरेचदा आले. म्हणजे मी प्रत्यक्ष जाऊन भांडलो नाही, पण पुस्तकात मांडलेल्या विचारांशी ���नातल्या मनात नक्कीच अनेकदा भांडलो. अनेक विचार, भावना, मतं पटत नसतानाही हे पुस्तक वाचून पूर्ण केल्याचा आनंद आहेच, पण स्वतःच्या वैचारिक वर्तुळाबाहेरचं काहीतरी वाचून पचवता आल्याचंही समाधान आहे. सचिन कुंडलकरांची शैलीच तशी आहे. बेधडक मतं मांडणं आणि ती justify करत बसणं. मग ती मतं सिनेसृष्टीविषयी असतील, मराठी संस्कार व संस्कृतीविषयी असतील, विजय तेंडुलकरांविषयी असतील, एखाद्या टर्किश लेखकाविषयी असतील, सई ताम्हणकरविषयी असतील, स्वयंपाकविषयी असतील किंवा पुणे शहराविषयी असतील. अतिशय रोखठोक, बरेचदा एकांगी पण अनुभवातून आलेली.
पुस्तकाला एक ठराविक असा साचा नाही. प्रत्येक लेख अगदी वेगळ्या विषयावर, पण लेखनाची शैली तीच असा काहीसा ब्लॉगचा फॉरमॅट आहे. कोबाल्ट ब्लू सारख्या नितांतसुंदर प्रेमकहाणी(?)चा लेखक असं काही सुद्धा लिहू शकतो यावर विश्वास बसणं कठीण आहे, पण अर्थात त्या दोन पुस्तकांत दशकाहून अधिक काळ लोटला असल्याने लेखकाच्या evolution वर थोडा विश्वास बसावा असंही हे पुस्तक आहे.
विविध विषयांवरील अनेक ललित लेख असलेले हे पुस्तक फारच आवडले. लेखकाने ह्यात खूप महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केले आहे. उदाहरणार्थ ९० च्या दशकातील आव्हाने, वाचन, त्यातून आलेल्या जाणिवा, जगाकडे बघायचा दृष्टिकोन कसा बदलला, त्या वाचनातून, लिखाणातून थोरामोठ्यांशी आलेले संबंध, विविध देश फिरून आलेले एक भान ह्याविषयी लिहिले आहे. तुर्कस्तान विषयी लिहिलेला लेख तर तुम्हाला जणू काही त्या देशाची एक virtual सफर च घडवतो. असे अनेक विविध विषयांवर भाष्य केले आहे.
आपली मते इतक्या प्रांजळपणे लिहिणे आणि प्रसंगी स्वतःकडे हि तटस्थ पणे बघणे हि कठीण गोष्ट आहे पण ती ह्यात सचिन कुंडलकरांनी मस्त साधली आहे. ह्यातली अनेक मते खूप रिलेटेबल/जवळची वाटतात. त्या पिढीचा एक वैचारिक द्वंद्व असलेला दृष्टिकोन पण परखड पणे मांडला आहे. आणि तरीही कुठेही उपदेशात्मक भाव नाही.
मनाला एक तजेला देणारे पुस्तक. नक्कीच वाचावे असे पुस्तक!! I will definitely recommend to read !!!
I have been following his writings on and off from his blogs, and other social media. Sachin is one of my favourite writer with whom I can connect on so many levels. This is a compilation of his articles which deals with many angles of life we live in Indian cities. I strongly recommend this book