वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृद्याची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरा ओलांडते खरी पण लग्नांतर काही दिवसांतच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा भासू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाची ही कहाणी.