Jump to ratings and reviews
Rate this book

HATAKE BHATAKE (हटके भटके - निरंजन घाटे)

Rate this book
क्षितिजापल्याड काय आहे याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेल्या साहसी भटक्यांमुळेच माणसाला जगातल्या अज्ञात कानाकोपऱ्यांचं ज्ञान होत आलं आहे. आजही असे अनेक भटके सुखासमाधानातला जीव धोक्यात टाकून जगभर फिरत असतात. आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा विषयांच्या शोधात आयुष्य झोकून देणाऱ्या या अवलियांमुळेच जग अधिक समृद्ध होत असतं. अशाच काही झंगड भटक्यांच्या आणि त्यांनी शोधून काढलेल्या हटके विषयांच्या अद्भुत जगाची ही सफर. निरंजन घाटे यांच्यासारख्या व्यासंगी लेखकाने घडवलेली.

194 pages, Kindle Edition

Published November 13, 2019

40 people are currently reading
12 people want to read

About the author

Niranjan Ghate

45 books3 followers

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
28 (53%)
4 stars
13 (25%)
3 stars
8 (15%)
2 stars
1 (1%)
1 star
2 (3%)
Displaying 1 - 4 of 4 reviews
Profile Image for Vikram Choudhari.
53 reviews12 followers
August 11, 2024
● पुस्तक – हटके भटके
● लेखक – निरंजन घाटे
● साहित्यप्रकार – अनुभवकथन, पुस्तक
● पृष्ठसंख्या – १८३
● प्रकाशक– समकालीन प्रकाशन
● आवृत्ती – प्रथम आवृत्ती - जानेवारी २०१९
● पुस्तक परिचय – विक्रम चौधरी
● मूल्य - २५० रुपये
● मूल्यांकन - ⭐⭐⭐⭐

"It's the unknow that draws people.." म्हणजेच अज्ञाताचा शोध नेहमीच माणसांना आकर्षित करतो..असं Bucchianeri म्हणतो..

अश्याच अज्ञाताच्या शोधाने झपाटलेली आणि त्यासाठी स्वतःच, चौकटीत आखलेलं, सुखी आयुष्य सोडून जगभर त्या शोधासाठी भटकणाऱ्या, १७ अवलियांच्या (लेखकाच्या भाषेत ‛झंगड भटके’) प्रवासाचा, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आणि त्यांच्या प्रेरणास्थानांचा धांडोळा, निरंजन घाटे यांनी या पुस्तकातून घेतला आहे..

मराठी साहित्यविश्वात वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल चौफेर लिखाण, तसेच मुख्यतः विज्ञानविषयक सोपे आणि रंजक लिखाणासाठी निरंजन घाटे सर परिचित आहेत.. त्यांचा वाचनाचा व्यासंग दांडगा आहे...
५० वर्षात त्यांनी १९० पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत..

माहितीच्या महाजालामुळे जग जवळ आलंय असं आपण म्हणतो. हवी असली ती माहिती, हवी असेल त्या माध्यमातून आपल्याला आता सहज साध्य होते.. ही सगळी साधनं उपलब्ध होण्याआधी माणसाला माहीत असलेल्या क्षितिज्याच्या पल्याड कुठली रहस्य दडली आहेत, याचा शोध घेण्यासाठी माणसाला प्रत्यक्ष त्या त्या ठिकाणची भटकंती करावी लागे.. यात तो अनेक साहसी, रोमांचक, भीतीदायक, विस्मयकारक अश्या अनेक अनुभवांनी समृद्ध होत असे..

अश्या अज्ञाताचा ध्यास घेऊन काही माणसं या गोष्टींचा माग काढत जातात, मग त्यासाठी हवा तो त्याग करण्याची त्यांची तयारी असते. असे करून ही माणसं आपल्या समोर आपल्या नजरेआड असलेलं एक वेगळं विश्व आपल्या समोर उभं करतात.. लेखकाला भावलेल्या अश्याच भटक्या माणसांची कहाणी या पुस्तकातून वाचायला मिळते..

पुस्तकाची सुरुवात होते ती, रामायणाच्या एका अख्यायिकेचा सायकलवर पाठलाग करणाऱ्या ॲन मुस्टो यांच्या साहसी प्रवासापासून.. हनुमानाने द्रोणागिरी पर्वत लंकेला नेला त्या मार्गाची, चौपन्न वर्ष वय असलेल्या ॲन ला भुरळ पडते आणि सायकल घेऊन ती थेट भारतात येऊन पोहोचते, द्रोणागिरी चं मूळ स्थान शोधते, त्याच मार्गावर प्रवास करते आणि त्यावर आधारित ‛टू व्हील्स इन द डस्ट - फ्रॉम काठमांडू टू कँडी’ हे पुस्तक लिहिते..

तसेच सातव्या शतकात, १६००० किमी पायपीट करून भारताला भेट देणाऱ्या ह्युएन त्संगच्या प्रवासाचा त्याच खडतर मार्गाने मागोवा घेणारी ‛मिशी सरण’ हिच्या साहसी मोहिमेचे सुंदर वर्णन लेखकाने केले आहे.. तिने लिहिलेलं ‛चेजिंग द मॉंक्स शॅडो’ हे पुस्तक लेखकाला ह्युएन त्संग आणि मिशी यांच्या प्रवासाची गुंफण वाटते.. अश्या जगावेगळ्या ध्येयाने झपाटलेल्या या स्त्रियाबद्दल वाचताना, वाचकांना प्रेरणा मिळते..

या पुस्तकाचे मला भावलेलं एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रवासाच्या सुखसुविधा नसतानाही अनेक स्त्रियांनी स्थानिक लोकांना तोंड देत केलेल्या प्रवासाची वर्णने.. यात कांगोच्या जंगलात सरीसर्पांचा अध्ययन करणारी ‛केट जॅक्सन’, आजदेखील जगातील राजकीय दृष्ट्या अस्थिर मानल्या जाणाऱ्या कुर्दीस्थान सारख्या ठिकाणी १९५७ साली प्रवास करून तिथल्या कुर्दी स्त्रीजींवचा वेध घेणारी ‛हेन्नी हॅन्सन’ तसेच नेपोलियन बोनपार्टच्या अखरेच्या दिवसांचा आलेख मांडणारी ‛ज्युलिया ब्लॅकबर्न’ अश्या साहसी, संवेदनशील आणि असामान्य स्त्रियांच्या अनुभवाचे सार्थ कथन लेखकाने केले आहे..

अश्या भटक्यांचे त्यांच्या ध्येयासाठी असलेलं प्रेम, त्यांच्यात असलेला प्रचंड आशावाद, अनोळख्या जगात वावरण्याची त्यांची हिम्मत पाहून अचंभीत व्हायला होतं..

या पुस्तकातील माझं आवडत प्रकरण म्हणजे ‛मौसमी पावसाचा मागावर : अलेक्झांडर फ्रेटर’. भारतातील मॉन्सूनचा शब्दशः पाठलाग करणारा हा ब्रिटिश पत्रकार.. आपल्याच देशाची आपल्याला नव्याने ओळख करून देणारा हा अवलिया.. या पुस्तकात पर्यावरणरक्षक फार्ली मोवॅट आपल्याला भेटतो, निसर्गाच्या प्रेमात पडलेली डायेन ॲकरमन भेटते.. अश्या या सगळ्या भटक्यांचे अनुभव आणि लिखाण वाचकांना समृद्ध करून सोडतं..

मनाची कवाडं खुली ठेऊन डोळसपणे प्रवास केला तर दरवेळी काहीतरी वेगळं आपल्याला सापडत जातं आणि आपण प्रगल्भ होत जातो.. अज्ञानाताची ओढ असलेला असाच एखादा भटका तुमच्या आतही दडलेला आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की वाचा..

© पुस्तकायन

6 reviews
February 1, 2023
Freak people in good sense.

It is a good book to read. Reader gets a review of solo adventurers who did everything for their passion. While doing, those people added new knowledge to our understanding.
Profile Image for Dinesh Vishe.
7 reviews
April 21, 2020
Good but not as exciting as other books by Ghate sir

Good but not as exciting as other books by Ghate sir
You can use this as list of books you should read
Displaying 1 - 4 of 4 reviews

Can't find what you're looking for?

Get help and learn more about the design.