नराधम ही कादंबरी १९८९ साली प्रसिद्ध झाली. लग्नानंतर सुमारे १० वर्षं अपत्यप्राप्ती न झालेलं एक जोडपं आपलं एक मूल असावं म्हणून अमानुष क्लुप्ती लढवतं व एका तरुणीचं आयुष्य उध्वस्त करतं ह्याचं चित्रण करणारी ही छोटेखानी कादंबरी. कादंबरीतील मुख्य पात्र मनोहर लेले ह्याला उद्देशून वापरलेलं "नराधम" हेच विशेषण कादंबरीचं नाव ठरलं. मात्र, जसजसा कादंबरीचा विषय गाजू लागला आणि ह्या कादंबरीवर आधारित "कुसुम मनोहर लेले" हे नाटक '९६मधे रंगमंचावर आल्यावर हा विषय प्रचंड गाजून कादंबरीच्या नावात बदल करायच्या सूचना येऊ लागल्या. कारण, मनोहर लेलेचं दुष्कृत्य त्याचं एकट्याचं नव्हतंच. त्याच्या घरातल्या स्त्रियांनीही त्याला साथ होती. त्याच्या गैरकृत्यांमुळे सुजाता देशमुखला आपलं तान्हं