ऐखाद्याला समजुन घेण, म्हणजे नेमक काय करण असा सवाल आधी पडायचा आणि आताही पडतो, कधीकधी.
प्रत्येकाच्या मनाचा गुंता सोडवत बसताना, आपलहि मन आहे आणि तेही धडपड करत राहत, सतत आपल्यालाही कोणीतरी समजुन घ्याव या एका आशेनेच, याचा विसर पडुन जातो. अशा वेळी समुद्र किनारी जाऊन बसुन राहव फक्त, रित कराव आपल मन त्याच्या खोल डोहात आधी. आणि मग ऐकाव समोरच्याच, तेव्हा नक्की लागेल थांग त्यांच्या मनात चाललेल्या असंख्य हालचालिंचा आणि आपोआपच सुटत जातील प्रश्न, अन सापडत जातील न विचारलेल्या प्रश्नांचीहि उत्तर.