गीतारामायणकार, मराठीचे वाल्मीकी, पद्मश्री, कथा, चित्रकथा, नाटक, कांदबरी, आत्मचरित्रलेखक म्हणून गदिमा आपणास परिचित आहेत. मात्र जनमानसात त्यांची ओळख झाली ती गीतलेखनामुळे. अध्यात्माचा उत्कट स्पर्श असलेली गीते, भक्तिगीते, सवाल-जवाबांची ठसकेदार रचना, निर्भर शृंगाराच्या लावणीरचना, निर्व्याज भावनांनी नटलेली बालगीते, गंगाकाठी, कन्याकुमारीसारखी कथाकाव्ये आणि गीतरामायणासारखी प्रासादिक, भावसंपन्न, मराठी मनांना सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ हे विरुद्ध महाराष्ट्रातील जनतेने त्यांना मोठ्या आदराने बहाल केले. गदिमा नावाची एक प्रतिभेचे देणे घेऊन आलेली माती त्या संस्कारात लेखक, देशभक्त, कवी, कथाकार, नट असे सुरेख आकार आणि नक्षी घेत घडली.
Gajānan Digambar Mādgulkar was a Marāthi poet, lyricist, writer and actor from India. He is popularly known in his home state of Maharashtra by just his initials as Ga Di Ma (गदिमा). He was awarded Sangeet Natak Akademi Award in 1951 and Padma Shri in 1969.
One has come to expect unexpected twists in stories from GaDiMa, but this collection takes them a tad further.
One meets a character or two here familiar from his autobiographical writings, dressed differently for a story; it's unclear then if the story is really about the character from life. Fourth story, for example, has the central cgaracter far too similar to his friend Puranik whom he met in Madras, and surely there cannot be two such men so similar, separated only by occupation?
Then there's the fifth story, almost a morality lesson - it's unclear if it all really was picked from life of one person, or he pieced it together from several, or just wrote up a horror tale punishing a woman.
A point that bothers one repeatedly is just how often he portrays males of unsuitable stature behaving in ways one cannot excuse, and worse, women in ways one can bet the author disapproves without a word. Why he finds it necessary to write about it is a good question. ................................................................................................ ................................................................................................
"“त्याला वेड लागलेलं होतं. अंगाला राख लावून बसायचा,” ठोकेगुरुजी बोलले.
"“आणि हे कवित्व?”
"“त्यांच्या कुटुंबिनीचं.”
"“अण्णास्वामींच्या?”
"“हो. ती मस्त देखणी बाई आहे. अगदी पठ्ठ्याबापूची पवळा!”
"“अजून आहे?”
"“म्हणून तर आमदारसाहेबांचा रात्रीचा मुक्काम मठात असतो.”
"माझे मस्तक कोंदून गेले. काय बोलावे आणि काय म्हणावे तेच कळेना.
"“तुम्हांला कसं ठाऊक हे गुरुजी?”
"“इंग्रजांच्या जमान्यापासनं मास्तरकी करतोय या भागात भाऊसाहेब. आम्हांला सारं ठाऊक आहे!”
"“येतील-जातील, परीट रगड धुण्याचा दगड, तोचि आहे!”
"अण्णास्वामींचा अभंग मोठ्याने म्हणत म्हणतच ठोकेमास्तर दरवाजापाशी पोचले."
3. लक्ष्य
"“रेवावर माझं प्रेम आहे. फार प्रेम आहे.”
"माझे डोके गरगरल्यासारखेच झाले. गार्डाची कर्कश शिटी वाजली. आफळ्यांच्या हातून माझा हात सोडवून घेऊन मी गाडीकडे धावलो. मी सीटवर टेकलो आणि गाडीने वेग घेतला. आफळे तिथेच उभे होते. त्यांना ‘गुडबाय’ म्हणणेही मला सुचले नाही.
"डेक्कन क्वीन आपल्या वेगाने धावू लागली."
4. मार्तंड नावाचा माणूस आणि त्याची लाडावलेली दाढी
"पार्वतीदीदींनी आपल्या सेक्रेटरीचे ‘कन्यादान’ केल्याच्या वार्ता मराठी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध झाल्या. कमलेला सासरी पोचवून बाई मुंबईला परतल्या. त्यांच्या मुद्रेवर दैवी समाधान विलसत होते."
5. पुत्रवधू
"अरविंद आगाशे आणि रोहिणी रानडे यांचा रजिस्टर विवाह झाला. कुणाला कसलंच आश्चर्य वाटलं नाही. शेखरच्या अपघाती मृत्यूनंतर जशी समाचारासाठी आली तशीच पुष्कळ माणसं अभिनंदनासाठी आली. अनेकांनी भेटीदाखल वस्तू दिल्या. पिट्टीला नवे कपडे मिळाले. सोन्याची साखळी मिळाली."
"वहीचं शेवटचं पान मिटलं तेव्हा माझेही डोळे झुकले होते. मस्तक जड झालं होतं. शास्त्रीबुवा माझ्या अभिप्रायाची वाट बघतच होते. ते समोरच होते.
"“भयंकर आहे,” मी म्हणालो.
"“काल्पनिक नव्हे, सत्यकथा आहे ही.” “काय म्हणता?”
"“या कथेतली रोहिणी. ती माझी सून. पतिता, विधवा, परित्यक्ता, काय नाही ती? निराधार अवस्थेत माझ्या दारी आली. मी म्हणालो, “ये बये, जिवात जीव आहे तोवर, मी तुला सांभाळीन. देवाब्राह्मणासमक्ष तुझ्या भावाकडून पुत्रवधू म्हणून स्वीकारली आहे मी तुला! आपण तिच्याच हातचा स्वयंपाक जेवत होतात गेला आठवडाभर !”
"मी थक्क झालो. तो ऐंशी वर्षांचा वृद्ध ब्राह्मण नंतर थोडकंसं हसला. ते हास्य मी कधी विसरणार नाही. कधीही विसरणार नाही."
6. शास्त्रज्ञ, एक स्त्री आणि एक कुत्रे
"विज्ञानविश्वातील भारताचे मागासलेपण त्याने आपल्या एका संशोधनाने पार नामशेष करून टाकले. साऱ्या जगातल्या जाणत्यांनी त्याच्या नावाचा जयजयकार केला. साऱ्या विश्वविद्यालयांनी त्याला सन्मानार्थ उपाधी देऊ केल्या. लोकसत्ताक, राजसत्ताक, पुंजीवादी, साम्यवादी वगैरे साऱ्या राजसत्तांनी त्याचा गौरव केला. त्याच्या छायाचित्रांनी जगातली सर्व वर्तमानपत्रे, नियतकालिके भरून गेली. भारताच्या चिरनिद्रित गुणसत्तेने देखील त्याच्या कार्याचे महत्त्व जाणले. त्याला एकदम ‘पद्मविभूषण’ पदक देऊन टाकले. विश्वाच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत असा शोध कुणीही मानवाने लावला नाही.
"डॉ. जोश्यांनी खरोखरच काही अलौकिक केले. ‘जित्या पेशीतील जीवनतत्त्व, जड पेशीत निर्माण करता येईल!’ हा त्यांच्या शोधाचा मथितार्थ होता. जनसामान्यांना त्यांच्या या शोधाची शक्ती समजली नाही. शास्त्रज्ञ मात्र थक्क झाले. या शोधाचा प्रत्यक्ष परिणाम पाहण्याआधीच त्यांच्या चर्चा सुरू झाल्या."
" ... जीवनस्रोताचा शोध लावणारे जगद्विख्यात भारतीय शास्त्रज्ञ डॉ. के. एल. जोशी एकाएकी गुप्त झाले. एका रात्रीत ते आपल्या प्रयोगशाळेतील उपकरणांसह नाहीसे झाले."
7. शहाणपणाची गोष्ट
"“हं. मग एक वर्ष गावातच राहिलो आणि वर्तमानपत्र काढण्याचा उद्योग केला.”
"“त्याला पैसे?”
"“ऐक तर खरा!”
"“त्याला भांडवलाची गरज होतीच. गावात एक मोठे धनिक गृहस्थ होते. कोकणस्थच. नाराळाचा मोठा व्यापार त्यांचा. माझे वडील त्यांच्याकडे देवपूजा करण्यासाठी जात असत रोज. मी त्यांच्याकडे गेलो. धाडसाने पैशाची मागणी केली. दैव बळकट. त्यांना म्युनिसिपालिटीची निवडणूक लढवायची होती. त्यांनी दिला की होकार. शेवटी आमचं वर्तमानपत्र निघालं. प्रत्येक अंकात त्या नानासाहेब दामल्याची स्तुती असायचीच. म्हातारा खूष झाला. निवडणूक होईतो ते वर्तमानपत्र त्यांना उपयोगाचं वाटलं. पुढं तो बोजा त्यांना डोईजड झाला. सहा महिन्यांतच आमचं वर्तमानपत्र बोंबललं. पण तेवढ्यात एक नवी भानगड झाली. त्या नानासाहेबांची एक सुंदर पोरगी होती. शीला तिचं नाव-”
"“त्याच का ह्या?” निळ्या पडद्याकडे पाहून मी म्हणालो. त्याने नकारार्थी मान डोलावली.
"“तिचंही नाव शीलाच होतं. फार सुंदर होती ती. शिडशिडीत बांधा. तांबूस पिवळा रंग. लालाचुटूक ओठ. खेळकर काळेभोर केस. निळे निळे डोळे. हसायची तर असं गोड, विचारू नकोस. वर्तमानपत्राच्या निमित्तानं माझं जाणं येणं दामल्यांच्याकडे होत राहिलं. ती शीला पण जवळजवळ माझ्याच वयाची. तिचं प्रेम बसलं माझ्यावर. आयुष्यात प्रथमच पत्ते खेळलो ते तिच्याबरोबर - वर्तमानपत्र बंद झालं. जाण्यायेण्याचं कारण उरलं नाही."
8. अवास्तव
"एका संपादक मित्राकडे फोन करून मी रात्री चौकशी केली. माझ्या कादंबरीवर ‘अवास्तव’ म्हणून घणाघाती घाव घालणारा तो टीकाकार आणि मी जीवदान दिलेल्या त्या मुलीचा पिता ही एकच असामी होती - वासुदेव वाचासुंदर!"
9. दुरावा
"देशमुखीण तरी काय सांगणार? कपाळ! त्या रात्रीचा तो पुणे-मुंबई प्रवास तिला बापडीला माहीत देखील नाही."
10. व्यथा
"काय म्हणावं, काय बोलावं तेच मला सुचेना. माझ्या व्यथा या मानानं सामान्य होत्या. त्या व्यथेची कळ भयंकर होती. एका मातेच्या मनाचा विचार केला तर. ती व्यथा फारच भयंकर होती. जन्माची व्यथा. कदाचित जन्म संपेल आणि ती व्यथा मागे राहील. ती व��यथा मागे राहील."
11. अर्धांग
"शीला पूर्ण सुखी होती. वेडा विश्वनाथ मात्र तिच्यासाठी झुरून झुरून या जगातून नाहीसा झाला होता." ................................................................................................ ................................................................................................
All stories in the book are nice. The pattern is same, a story starts with description/background of a core character, creates suspense in middle of the story & climax unfolds it eventually. Right from the middle of story, you feel to get gripped by it