प्रज्योत सडपातळ बांधा, सावळा वर्ण, त्याच्या मनमोकळा स्वभामुळे तो सर्वांना आवडत असे. त्याचा हा स्वभाव हे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे एक उदाहरणच होते. तो ज्या ठिकाणी जात असे, तेथे त्याच्या या स्वभावांनी तो निघुन गेल्यावर आठवणी तयार होत असे. मित्रांन मध्ये तो कधी नसला तर त्याचे मित्र त्याच्यासाठी कावरे- बावरे होत असे जसे की तो त्यांच्या मैत्रीचा जिव्च होता. तो चाळीतल्या मित्रांन सोबत दररोज चाळीच्या बाहेर चर्चा, मस्करी करत उभे राहात असे.