The Collected Poems of the Proletarian Poet Narayan Gangaram Surve.
कविवर्य नारायण सुर्वे हे जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कवी असले तरी, त्यांचे लेखन मोजकेच आहे. 'ऐसा गा मी ब्रह्म', 'माझे विद्यापीठ', 'जाहीरनामा' आणि 'नव्या माणसाचे आगमन' असे चारच काव्यसंग्रह सुर्वे यांच्या नावावर आहेत. हे चारही संग्रह पॉप्युलरने प्रकाशित केले होते. आता, नारायण सुर्वे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्या समग्र कवितांचा 'सुर्वे : नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता' हा श्रेयस ग्रंथ पॉप्युलर प्रकाशित करत आहे. या ग्रंथात त्यांच्या कवितेकडे पाहण्याची नवीन दृष्टी देणारी प्रा. दिगंबर पाध्ये यांची चिकित्सक प्रस्तावना आणि नारायण सुर्वे यांनी पूर्वी "सनद' या संग्रहासाठी लिहिलेले आणि आता या आवृत्तीत समाविष्ट केलेले मनोगत यांमुळे सुर्वे यांची कविता समजून घेणे अधिक सोपे झाले आहे.
उत्कृष्ट छपाई आणि कागादासह पुठ्ठा बांधणीतली ही श्रेयस आवृत्ती सुभाष अवचट यांच्या मुखपृष्ठामुळे अधिकच सुरेख झाली आहे. पुस्तकाच्या शेवटी सुर्वे यांच्या कवितेवर आजवर झालेल्या समीक्षेची सूची देखील यामध्ये समाविष्ट केली आहे त्यामुळे काव्यप्रेमी वाचकांप्रमाणेच अभ्यासकांनाही हा ग्रंथ तितकाच उपयुक्त आहे.
He was born on 15 October 1926. Orphaned or abandoned soon after birth, he grew up in the streets of Mumbai, sleeping on the pavement and earning a meager livelihood by doing odd jobs. He taught himself to read and write, and in 1962, published his first collection of poems Aisa Ga Mi Brahma (ऐसा गा मी ब्रह्म). Majhe Vidyapeeth (माझे विद्यापीठ ; My University), the book he would be most known for appeared in 1966 while he stayed in Chinchpokli, Mahahrashtra. He received 11 prizes for his book Majhe Vidyapeeth Though he studied only till second standard and never climbed the steps of a college, he is known as one of the best poets of Marathi language.
Surve actively worked in the workers' union movement in Mumbai and supported himself as a schoolteacher.