Beyond expectations. This hits home in ways I can't put a finger on. Knowing the author had added in the experience more than I expected. The places on the river, the ghat stairs, dunkin, railway, bushes on the banks of river, I've been seeing them for all my life. So I have exact scenes painted for me. Unique experience.
Recommended to everyone, this is soon becoming a modern classic.
गेल्या तीन चार वर्षांत सगळ्या मराठी वाचकांच्या घराघरात चर्चित असणारी ही कादंबरी. साहजिकच माझ्या wishlist मध्येही ही होतीच आणि यंदाच्या वाढदिवसाला त्याची एक कॉपी गिफ्ट मिळाल्यामुळे वाचायला मुहुर्तही मिळाला. • सुरुवातीची बरीच पानं नदीच्या पाण्यासारखी संथ चाललेली. Slow read असलेल्या पुस्तकांकडे माझा नेहमीच जास्त ओढा असतो कारण ती बराच काळ आपल्या सोबत राहतात. वाचतानाही आणि वाचून संपल्यावरही! आधी फक्त लेखक आणि गोदावरी ही दोनच महत्त्वाची कॅरॅक्टर वाटत होती. बाकी सगळं काही बिनमहत्वाचं. मी एक कादंबरी नाही तर नदीचं वेड असलेल्या एका माणसाची डायरी वाचतेय असं मला राहून राहून वाटत होतं. कारणं हे सगळं अनुभवाशिवाय लिहिणं केवळ अशक्य आहे. लिहिताना लेखकाने आपण वापरत असलेला शब्द मराठी आहे का हिंदी आहे का इंग्रजी आहे का अजून काही याचाही विचार न करता आपण जसा मनात विचार करतो तस्साच्या तस्सा कागदावर उतरवलाय, भाषेच्या चाकोरीचा अजिबात विचार न करता. त्यामुळे वाचताना कोणाच्यातरी मनातले विचार वाचल्यासारखे वाटतात अगदी raw, without any filter. माझ्यासाठी ही शैली खूप नवीन होती. • रोज पहाटे लेखकबरोबर गोदावरीच्या तीरावर जायला मलाही खूप आवडायला लागलेलं. गोदावरीला आईचा गोद समजणाऱ्या स्वप्नाळू लेखकामूळे कुठेतरी मलाही नदीची ओढ वाटू लागलेली. मात्र सगुणाच्या entry नंतर मनोविश्र्वात फार काळ राहणं शक्य नव्हतं. ती आपल्याला वास्तवात खेचून आणते. तिच्या येण्यानंतर संथ वाटणारं हे पुस्तक अचानक आपला स्पीड वाढवतं. त्यापुढची पानं इतक्या पटापट सरतात की पुस्तक कधी संपतं कळतंही नाही. • या पुस्तकाच्या विषयापेक्षाही बोरगावकरांच्या लिखाणाच्या शैलीने मला जास्त भुरळ घातली. खूप वर्षांत इतकं raw, vulnerable काहीतरी वाचलं नव्हतं. आपण एकटे असताना आपण जसा विचार करत असतो, जो आपण कधीच बोलून नाही दाखवत कोणाला, तो त्यांनी यात मांडलाय. जसं लोकांना मदत करायची प्रबळ इच्छा असूनही स्वतःच्या पांढरपेशी जीवनामुळे तसे न करता येण्याची हतबलता, प्रत्येक माणूस कोणत्यातरी मोबदल्यासाठीच आपल्याशी बोलत आहे हे फिलिंग, एखाद्याला आपला नंबर दिल्यावर कधीतरी त्याच्या गरजेत नसती भानगड मागे लागेल म्हणून आपला नंबरही त्याला न देणं इत्यादी इत्यादी.
याशिवाय नदिष्टचं मुखपृष्ठ आणि त्यावरच्या नावाचा फाँट हाही प्रेमात पाडणारा आहे. हे कितीही वेळ न्याहाळल तरी कमी आहे. • ता. क. तृतीयपंथीय किंवा यासारख्या कोणत्याही sensitive विषयावर लिहिताना फार जपून लिहावं लागतं. आपल्या नकळत आपण कोणाचातरी अनादर करण्याची शक्यता असते. बोरगावकरांनी मात्र अखंड पुस्तकात एकदाही सगुणाला mispronoun केलेलं नाही, ना कुठे त्यांच्या मनात या community बद्दल अनादर दिसतो. त्यामुळे पूर्वी त्यांचे याबद्दलचे मत काय होते आणि शेवटी काय झाले हा प्रवास वाचण्यासारखा आहे.
आपण रोज नदीवर पोहायला जातो, गेलो नाही तर आपली तगमग होते. आपली नदीशी नाळ जोडलेली आहे म्हणजे नक्की काय? नदीबद्दल इतकी ओढ का आहे? नदीचे व आपले नक्की नाते काय, मनोज बोरगावकरांना पडलेल्या अशा प्रश्नांची उत्तरे शोधणारे कमाल पुस्तक.
THIS IS QUITE DIFFERENT BOOK. THERE IS UNUSUAL RELATION BETWEEN AUTHOR & RIVER. FOR YEARS HE IS GOING FOR SWIMMING ON RIVER IS PART OF A DAILY RITUAL FOR HIM. EXCEPT FLOOD NOTHING STOPPED RITUALS.
HE HAS PEN DOWN HIS EXPERIENCES, HIS THOUGHST & 2-3 PERSONALITIES HE CAME ACROSS ON RIVER. OUT ALL OF THOSE, THE CHARCTER OF EUNUCH & THE WAY HE GETS EOTIONALLY ATTACHED TO HIM/HER IS QUITE INTERESTING.
THIS BOOK IS FLOWING AS RIVER & AS RUMI SAYS IF YOU READ WITH INTEREST YOU'LL LITERALLY FEEL RIVER MOVING IN YOU.
असं म्हणतात की पुस्तक हे समाजचे दर्पण असते. ही कादंबरी वाचतानाचा प्रवास खूप सुंदर असा होता. लेखकांना नदीमध्ये पोहण्याचा छंद आहे व त्यामुळे हे असे नाव त्यांनी कादंबरीला दिले. यात एका तृतीयपंथीची व एका कैद्याची गोष्ट सांगितली आहे. या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा 'सर्वोत्तम प्रौढ कादंबरी' (२०२१) हा पुरस्कार मिळालेला आहे. मला वाटते मराठी भाषिक प्रत्येक व्यक्तीने ही कादंबरी जीवनात एकदा तरी वाचलीच पाहिजे. लेखकांची इतर दोन ग्रंथसुद्धा वाखाणण्याजोगी आहेत.
नदिष्ट नदीच्या सपाटखोल संथ वाहण्याची गोष्टय. नदीच्या मानवी समाजाशी असलेल्या नात्याची गोष्टय. त्यात काठ आहे आणि त्याचबरोबर मध्यप्रवाहसुद्धा आहे. गोदावरीच्या तीरावर घडणाऱ्या घटनांचं वर्णन लेखक मनोज बोरगावकरांनी शेवटपर्यंत खळखळत ठेवलंय. मराठी साहित्यात वाचकाला प्रेमात पडणारी असं वर्णन करता येईल.
ओघवती लेखनशैली ! अतिषय वेगळा विषय . नदीत पोहण्याची आवड असलेल्या लेखकाला नदी काठी भेटलेल्या समाजातील भिन्न स्तरांतील व्यक्तिंचा जीवनप्रवास आणि त्याचा लेखकावर होणारा परिणाम याचे अप्रतिम वर्णन .
मनोज बोरगांवकर द्वारा रचित नदिष्ट एक विचारोत्तेजक मराठी उपन्यास है जो पहचान, संस्कृति और मानव जीवन के अनुभव के विषयों पर प्रकाश डालता है। कहानी सम्मोहक पात्रों के इर्द-गिर्द बुनी गई है जो आधुनिक जीवन की जटिलताओं को दर्शाते हुए व्यक्तिगत और सामाजिक चुनौतियों का सामना करते हैं।
बोरगांवकर का लेखन गीतात्मक और मार्मिक दोनों है, जो मानवीय भावनाओं के सार को दर्शाता है। यह पुस्तक परंपरा और समसामयिक मुद्दों के बीच अंतरसंबंध का पता लगाती है, जिससे यह व्यापक दर्शकों के लिए प्रासंगिक बन जाती है। लेखक की कुशल कहानी पाठकों को बांधे रखती है, हास्य और गंभीरता का प्रभावी ढंग से मिश्रण करती है। वह कालूभैया, किन्नर समुदाय के सगुना और भीकाजी के माध्यम से उपकथाओं को दर्शाते हैं। गाँव का देहाती माहौल और खूबसूरत गोदावरी नदी एक सुखद एहसास दे रही थी।
कुल मिलाकर, नदिष्ट मराठी साहित्य में एक महत्वपूर्ण योगदान है, जो स्थान और संस्कृति की मजबूत समझ को बनाए रखते हुए मानवीय स्थिति में अंतर्दृष्टि प्रदान करता है। कई स्तरों पर प्रतिध्वनित होने वाली समसामयिक कथाओं में रुचि रखने वालों के लिए इसे अवश्य पढ़ा जाना चाहिए।
It's not bad but it's not amazing either. I guess the low rating is a result of the hype that was built around the book. Certain patches are nice though.