त्यांच्यातल्या एकाने बजाला सांगितलं, ‘अरे! शेटजींना विचार ना काय हवं ते! कामाची माणसं ती! मघापासून बसली आहेत ना!’ पण बजा काही बोलायच्या आधी मीच म्हणालो, ‘मळ्यावर दोन रात्री लागोपाठ काय झालं सार्या गावाला माहीत आहे. माझी दोन जनावरं दगावली, पांडुरंगचाही बळी गेला. आता बजाला विचारायला आलोय. का रे बाबा, कोण कोपलं माझ्यावर? कोणी करणी केली का? कोणी वाईटावर आहे का? आमच्या घरच्या कोणाकडून काही आगळीक झाली का? काही कोणाची शांत करायला हवी का? काय भानगड आहे पाहा तरी बजा! ’ आता सगळ्यांच्या नजरा बजाकडे वळल्या. कारण सांगता येत नाही; पण बजा जरासा घुटमळत होता. खरोखरच त्याला यातलं काही कळतं का तो आपला चार पैशांसाठी लोकांना बनवतो मला माहीत नाही. अशा काही शक्ती असतीलच तर त्या इतक्या भलत्याच माणसांच्या
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
खूप वर्षांपूर्वी वाचलेलं हे नकारांचं पहिलं पुस्तक. खूप घाबरल्याचं आठवतंय. नंतर नारायणराव वर्षांची सगळी पुस्तकं वाचली. असं वाटलं होतं की आता हे पुस्तक तेवढं खास वाटणार नाही. After all, लुचाई, स्वाहा, चेटकीण, काळी जोगीण, दस्त किंवा अगदी कृष्णचंद्रमधलं झपाट, यांच्यानंतर या पुस्तकांचं काय मोठं. समर्थ कथा असती तर गोष्ट वेगळी होती.
खूप वर्षांनी मिळालं हे पुस्तक परत (प्रकाशकांचे आभार). आणि परत एकदा कळलं धारपांची जादू काय असते ते. ही अजेयची गोष्टं. अजेयच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. तो योगायोगाने सोनगावात येतो. पण खरंच योगायोग की काही मोठी योजना असते? मग नेहेमीचा चांगल्या वाईटाचा झगडा.. गोष्टं नेहेमीची. पण धारप त्याला beyond comparison च्या पातळीवर नेऊन ठेवतात. प्रसंग अंगावर काटा आणतात. वाळिंब्यांच्या आक्का, पांडूरंग, सगळेच देवाचं नाव घ्यायला लावतात. Horror fans नी नक्कीच वाचावं असं परिसस्पर्श.