मोठमोठ्या वाड्यांबद्दल सर्वांना एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. त्याच्या गूढवलयाचं निराकरण हवं असतं. अन् हा वाडा तर पेशवेकालीन...! काय काय घटना घडल्या असतील त्यावेळी वाड्यात...? तेथे वावरणारी कित्येक माणसं - त्यांचे हेवेदावे - सलोखा की सूडवैर - अन् त्यांचे आत्मे - अजून असतील का वावरत - तेथेच - त्यांना मुक्ती मिळेल...? स्थळ आणि त्या स्थळाशी संबंधित असलेली माणसं एकत्रित आल्यावर काय होतं, काय घडतं, याची प्रचिती त्यांना येत होती. त्यांची उपपत्ती तर्कावर आधारित होती. ती आतापर्यंत पुराव्यानं सिद्ध झाली नव्हती. त्यांच्या तर्काला कसलाही शास्त्रीय आधार नव्हता. पुराव्यानं सिद्ध करण्याची त्यांना संधीपण मिळाली नव्हती. रावते यांच्या वाड्यानं ती अनपेक्षितपणे मिळाली होती.
Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
धारपांनी लिहिलेला भाग inspired वाटला तरी छान होता, मात्र मांडे यांनी केलेला भाग काही आवडला नाही. एकूण पाहता धारप यांना Shirley Jackson च्या The Haunting of Hill House सारखा प्रयोग करण्याची इच्छा असावी.