इतिहास हे मोलाचे धन आहे याचा सुगावा अजून आपल्या सत्ताधा-यांना लागलेला नाही. इतिहासाकडे सध्या फार मोठे दुर्लक्ष होते आहे. उत्तम ऎतिहासिक कथा सध्या दुर्मिळ होत चालल्या आहेत. धगधगत्या इतिहासाची धग सध्या समाजातून नष्ट होत चालली आहे. इतिहासावरचे साध्या व सोप्या भाषेतले लेखन दुर्लभ झाले आहे. अबालवृध्दांच्या आवडणा-या इतिहासातील नवरसांची मांडणी या कथाद्वारे केली आहे. विजयादशमीला सोनं लुटतात तसे वाचकांनी इतिहासाचे हे कथाधन मुक्तपणे लुटावे आणि इतिहासाच्या अथांग सागरात शांतपणे डुंबावं हाच या कथासंग्रहापाठीमागचा मनसुबा आहे.